शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

सुरसुंदरी मनात भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 10:05 AM

देवदर्शनासाठी देवळात जाणाऱ्यांनी समोरच्या देवावर मातेसमान विश्वास ठेवून दृढनिश्चयाने परमेश्वर भक्ती केली तरच इच्छापूर्ती होते - हेच या रूपवतीला सूचवायचे असते. कारण, देवसुद्धा भक्तवत्सलच असतो ना !

- प्रा. डॉ. किरण देशमुख

पद्मिनीपद्महस्तेच नृत्याङी पट्टे पद्मंच पद्मिनी।- म्हणजे, एका हातात कमलपुष्प घेऊन अन्य हाताने नृत्यमुद्रा साधून नृत्य करणारी यौवनिका होय. या रूपातील सुरसुंदरी रहिमाबाद (जि. औरंगाबाद) येथील प्राचीन मंदिरावर आहे.

गूढशब्दा१ - हिचे देहरूप - अभयदा शिशुयुक्ता पद्मनेत्रा साउच्यते । - म्हणजे,  एका हाताने अभयमुद्रा साकारून लहान मुलाला शेजारी घेणारी युवती होय - असे आढळते.२ - पानगावच्या (जि. लातूर) विठ्ठल मंदिरावरील एका शिल्पात गूढशब्दा त्रिभंगात उभी असून, तिच्या डाव्या कमरेवरील स्तनपानोत्सुक बाळाने डावा हात तिच्या डाव्या स्तनावर ठेवला असून, ती उजव्या बाजूच्या उभ्या गोंडस बालकाच्या डाव्या हाताचे बोट पकडून कुठे तरी जाण्याच्या स्थितीत दिसते.३ - उजव्या खांद्यावर गोल बुचड्यात केलेली आकर्षक केशरचना रुळविणारी ही धष्टपुष्ट अवयवाची मनमोहिनी अलंकृत असून, मदनज्वराने देहसौष्ठवाच्या तुलनेत तिची बारीक झालेली कंबर पाहून आपल्याला -वाढे वयाच्यासह भार ज्यांचातो नित्य वाहून जणूं स्तनांचा ।थकोनिया याकमलेक्षणेचीहोईकटी ही कृश फार साची ।। - असे मनोमन वाटते.तिच्या सिंहकटीमुळेच तिची मादकता अधिक आकर्षक झाली आहे. गूढ शब्दांच्या दोन सुंदर प्रतिमा खिद्रापूरच्या (जि. कोल्हापूर) कोपेश्वर मंदिरावर पाहावयास मिळतात.

चित्रिणी१ - नृत्यांगना प्रकारातील कमनीय अंगकांतीची ही आकर्षक मदालसा असून, तिचे रूप -कपाले वामहस्ताच नृत्यभावाच चित्रिणी । - म्हणजे, जी नर्तकी स्वत:चा डावा हात मस्तकावर ठेवून, उजवा हात खाली टोंगळा किंवा मांडीला स्पर्शून स्वत:च्या बेमालूम अंगिकाभिनयाकरणाने नृत्योपासकाच्या हृदयाचा ताबा न कळत घेते, अशी यौवना होय.२ - मंदिर स्थापत्यातील इतर सुरसुंदरीबरोबर हिची ओळख तिच्या उपरोल्लेखित विशेष अंगविक्षेपावरूनच करायची असते. पुत्रवल्लभा - (भाग-१)३ - ‘तू माझी माऊली। मी तुझे लेकरू । नको दुरी धरू। विठाबाई - या संत नामदेवांच्या अभंगाप्रमाणे देव आणि भक्त यांच्यातील घनिष्ठ नाते आई व मुलासारखे प्रेमळ व विश्वासाचे असते. त्याच भावविश्वाचे निदर्शक म्हणजे - पुत्रवल्लभा होय.४ - देवदर्शनासाठी देवळात जाणाऱ्यांनी समोरच्या देवावर मातेसमान विश्वास ठेवून दृढनिश्चयाने परमेश्वर भक्ती केली तरच इच्छापूर्ती होते - हेच या रूपवतीला सूचवायचे असते. कारण, देवसुद्धा भक्तवत्सलच असतो ना !५ - हाच सुरेख भावार्थ स्पष्ट करणाऱ्या या सुरसुंदरीचे रूपवर्णन - ‘चित्ररूपा स पुत्रांगी’ - म्हणजे, जिणे स्वत:च्या कमरेवर मूल घेतले आहे, असे वर्णिले असून, तिचा उल्लेख ‘शिल्प प्रकाश’ ग्रंथात मातृमूर्ती म्हणून - ‘एषामातृसमामूर्ति: बालकादिसुशोभिता ।।’ - असा आढळतो.६ - वरील आशय स्पष्ट करणाऱ्या प्रमाणबद्ध आकारातील पुत्रवल्लभाच्या दोन मूर्ती मार्कण्डीच्या (जि. गडचिरोली) मार्कण्डादेव मंदिरावर असून, एका प्रतिमेत तिने बालकाला डाव्या कमरेवर डाव्या हाताने घट्ट पकडले असून, त्याचा डावा पाय उजव्या हाताने पकडून ते बाळ खाली पडणार नाही याची काळजी घेतलीय. त्या बाळानेही आईच्या गळाहाराला डाव्या हाताने धरले आहे. मातृवात्सल्याचा यापेक्षा अधिक चांगला पुरावा कोणता असू शकतो? भगवंतही वात्सल्याची शाल मातेप्रमाणे भक्तावर निश्चितच पांघरतो, हे खरे.  

टॅग्स :cultureसांस्कृतिकArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण