शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

वडापाव... बस्स..! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 2:33 PM

बाळासाहेबांच्या आवाहनातून प्रेरणा घेत अशोक वैद्य यांनी बटाटावडा आणि पोहे यांचा स्टॉल टाकला. तोवर उडपी आणि दाक्षिणात्य पदार्थांची रस्त्यावर विक्री होत असे.

मुंबईच्या कोणत्याही फुटपाथवरून तुम्ही जात असला तरी ठराविक अंतरावर चर्रर्र करत तेलाच्या कढईत डुंबणारे वडे अन् त्याचा घमघमाट तुम्हाला मोहात पाडतोच. बरं म्हटलं तर, चव चाळवण्यासाठी सहजच खाल्ला अन् म्हटलं तर पोटभरीसाठीही खाल्ला. रुचकर चवीचा, चालताना किंवा रेल्वे किंवा बसमधेही असला तरी खायला सोपा अन् तरीही स्वस्त, त्यामुळेच मुंबईकरांच्या फास्ट-फूड पदार्थांच्या यादीत आजही वडापाव हा अव्वल क्रमांकावर आहे. वडापावच्या इतिहासाची पावले दादर स्थानकाबाहेर १९६६ पासून आजवर अव्याहत सुरू असलेल्या अशोक वैद्य यांच्या वडापावच्या गाडीपाशीच थबकतात. नोकरधंद्याच्या निमित्ताने दादरला येणाऱ्या लोकांच्या रोजच्या हक्क्याच्या नाश्त्याचे ते ठिकाण आहे, तर काही जण मुद्दाम याची चव चाखण्यासाठी दादरपर्यंत येतात. ...तर, वडा-पावची औपचारिक नोंद ही अशोक वैद्य यांच्या गाडीपासून सुरू होते. १९६०च्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी घेतल्यानंतर, मराठी मुलांना उद्योगधंदा सुरू करण्याचे आवाहन केले. बाळासाहेबांच्या आवाहनातून प्रेरणा घेत अशोक वैद्य यांनी बटाटावडा आणि पोहे यांचा स्टॉल टाकला. तोवर उडपी आणि दाक्षिणात्य पदार्थांची रस्त्यावर विक्री होत असे. लाखोंच्या संख्येने मुंबईत काम करणाऱ्या गिरणी कामगारांना तसा आधार हा त्या दाक्षिणात्य पदार्थांचाच होता. मात्र, अशोक वैद्य अन् त्याच दरम्यान सुधाकर म्हात्रे यांनी बटाटेवड्याची विक्री सुरू केल्यानंतर त्याला कामगारांची पसंती लाभली. नव्या व्यवसायाचा जम बसू लागलेला असतानाच एके दिवशी अशोक वैद्य यांना पावामधे चटणी अन् वडा भरण्याची संकल्पना सुचली आणि त्यांनी प्रयोग म्हणून ‘वडा-पाव’ या नावाने त्याची विक्री सुरू केली. या नव्या पदार्थाची चव मुंबईकरांना इतकी भावली की अक्षरशः त्यावर उड्या पडू लागल्या अन् बघता बघता वडा-पाव हा प्रकार वैद्यांच्या गाडीवरून संपूर्ण मुंबईत पसरला. वडा-पाव, मराठी माणूस आणि शिवसेना हे एक समीकरणच सरत्या चार-साडेचार दशकांत होऊन गेले आहे. १९७०च्या दशकानंतर एकीकडे जेव्हा मुंबईत गिरणी कामगारांची वाताहत होण्यास सुरूवात झाली त्यावेळी, अनेक गिरणी कामगारांनी नाक्या-नाक्यावर वडापावचे ठेले सुरू केले. शिवसेनेनेही याला मोठ्या प्रमाणावर संरक्षण दिले. त्यामुळे वडापाव हा राजकारणाच्या कढईतून बाहेर आलेला एक रुचकर पदार्थ आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. २००९ मधे शिवसेनेने शिववडा सुरू करत याला राजकीय कोंदण दिले.  

कालौघात वडा-पाववर अनेक प्रयोग होऊ लागले. कीर्ती महाविद्यालयाच्या बाहेर प्रसिद्ध असलेल्या अशोक वडापावने पहिल्यांदा वडापावमधे वड्यासोबत तळला गेलेला बेसनाचा चुरा भरत त्याची लज्जत वाढविल्याचे बोलले जाते. अनेकांनी हिरव्या व लाल चटणीसोबत, खजुराच्या गोड चटणीचाही त्यात अंतर्भाव केला. फूड इंडस्ट्रीमधील कंपन्यांनी वडापावचे ब्रँडिंग करत त्याच्या विक्रीस सुरुवात केली. हे करताना चीज वडापाव, पनीर वडापाव, स्टफ वडापाव, सॅन्डविच वडापाव, बेक्ड- वडापाव असे प्रयोग केले. काही प्रमाणात लोकांनी या प्रकारांनाही पसंती दिली. पण मूळ वडापावची शान आजही अबाधित आहे. 

१९७१ मधे वडापावची किंमत 10 पैसे इतकी होती. चलनाचे मूल्य ज्या प्रमाणात वाढले त्याच प्रमाणात विचार केला तर वडापाव आजही 8 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत असा स्वस्ताईच्या किमतीत उपलब्ध आहे. 

आजच्या घडीला मुंबईत 20 हजारांपेक्षा जास्त ठिकाणी वडापावची विक्री होते. मुंबईत रोज किमान 20 लाख वडापाव खाल्ले जातात, अशी माहिती आहे. वडापाव हा इतका लोकप्रिय आहे की, 23 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक वडापाव दिन’ म्हणून साजरा केला जातो. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे