धगधगत्या चुली
By Admin | Updated: September 5, 2015 15:33 IST2015-09-05T15:33:04+5:302015-09-05T15:33:04+5:30
धुरामुळे, घरगुती वायुप्रदुषणामुळे भारतात दरवर्षी तब्बल दहा लाख नागरिक मृत्यूमुखी पडतात. एकीकडे हे वास्तव तर दुसरीकडे खेडय़ापाडय़ांतल्या 70 टक्के घरांतआजही चुलीशिवाय ‘पान’ उठत नाही. स्वयंपाकघरात आज एलपीजी गॅसपासून तर बायोगॅस, सौरऊर्जेर्पयत अनेक पर्याय सहज उपलब्ध आहेत. तरीही असं का?.

धगधगत्या चुली
>प्रियदर्शनी कर्वे
चुलीवरच्या भाकरी’ किंवा ‘चुलीवरचा स्वयंपाक’ हे आजही अस्सल खवय्यांसाठी तोंडाला पाणी सुटायला लावणारं रसायन आहे. चुलीला भारतीय खाद्यसंस्कृतीत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आजही भारताच्या ग्रामीण भागातील ‘पान’ चुलीच्या धुराशिवाय उठत नाही. भारतीय परंपरेत अनेक बाबीत ‘चुलीचा मान’ पहिला आहे. या सा:या गोष्टी ख:या असल्या, तरीही घरगुती धुरामुळे भारतात दरवर्षी तब्बल दहा लाख नागरिक मृत्यूमुखी पडतात हेही तितकंच टळटळीत वास्तव आहे.
खरंतर स्वयंपाकघरात आज एलपीजी गॅसपासून तर बायोगॅस, सौरऊर्जेवरच्या उपकरणांनी ठाण मांडलं असलं, तरीही बहुतांश ग्रामीण भागात आजही चुलीचाच प्रामुख्यानं वापर होतो आणि त्याचं प्रमाण तब्बल 67 टक्के इतके आहे.
भारतात आजही चुली टिकून आहेत, नव्हे त्या स्वयंपाकघरातलं एक महत्त्वाचं साधन आहेत आणि यामागे अनेक कारणं आहेत.
ग्रामीण भागातील चूल अजूनही का सुटत नाही?
काय आहेत त्यामागची कारणो?
जवळजवळ फुकटात आणि सहजपणो उपलब्ध होणारा लाकूडफाटा, गॅसची किंमत आणि त्यासाठी करावी लागणारी यातायात हेदेखील गावोगावच्या चुली जिवंत असण्याचं प्रमुख कारण आहे.
भारतातील कुठल्याही प्रदेशातील कुठलेही गाव, वाडी-वस्ती घ्या, प्रत्येक गाव आपली भौगोलिक-सांस्कृतिक भिन्नता जपत वेगळे दिसेल; मात्र तरीही गावात जगण्याच्या काही त:हा सारख्याच दिसतील. कुठल्याही गावातील बहुतेक घराच्या अंगणातून, पडवीतून, घराच्या समोरच्याच असणा:या एखाद्या छोटय़ा खोलीतून धूर येताना दिसेल. चुलीत जळणा:या लाकडांचा हा धूर. आजही ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी आपल्याला चुली पेटताना दिसतात.
शहरी भागातल्या लोकांना तर चुलीवरच्या जेवणाचं प्रचंड आकर्षण. त्यामुळे भरमसाठ पैसे मोजून खास चुलीवरच्या जेवणाच्या पंगती शहरी भागात आजकाल ब:याच ठिकाणी उठतात. खेडोपाडीच्या नातेवाइकांकडे ही शहरी मंडळी गेली तरी त्या आणि तशाच जेवणाची फर्माईश आपसूकच होते. विशेष म्हणजे, आपली ही इच्छा पूर्ण करणो त्यांना शक्यही असते, कारण आजही खेडोपाडी चुली पेटतातच.
भारतासारख्या वैविध्यपूर्णतेने नटलेल्या आणि विविध संस्कृतीने व्यापलेल्या देशात तर गाव बदलले की खाण्याच्या पद्धती बदलतात. मात्र देशात इतकी विविधता असतानाही ‘चूल’ हा प्रकार मात्र प्रत्येक ठिकाणी सामायिक आहे.
जगण्यासाठी अन्न-पाणी ही प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे. त्यापैकी प्राणी-पक्षी हे निसर्गात उपलब्ध असलेल्या गवत, झाडी-झुडपे, धान्य, फळे, कंदमुळे यावरच आपली गुजराण करतात; मात्र केवळ माणूसच असा प्राणी आहे, जो बहुतांश वेळा शिजवलेलेच अन्न खातो; शिवाय स्थळ-काळानुसार, ऋतुमान, आनंद-दु:खाच्या परिस्थितीनुसार अन्न शिजविण्याच्या पद्धती, अन्नाचे प्रकार, चवी यांतही बदल होत असतात.
इतका सगळा बदल होत असताना, तातडीने अन्न शिजविण्यासाठीचे इंधन मात्र सर्वदूर पोहचलेले नाही. सगळ्या प्रकारच्या विविधतेत गावपाडय़ांवर आपल्याला चुली हा प्रकार समान दिसेल. किंबहुना गावात चुली नाहीतच असे चित्रच अजून तरी नाही.
आज गावोगावी एलपीजी इंधन म्हणजेच गॅस सिलिंडर पोहचलेत, त्याची उपलब्धताही इतकी अवघड राहिलेली नाही, तरीही एलपीजीने चुलींची जागा घेतलेली नाही.
चुलीवर स्वयंपाक करण्यामुळे आरोग्यावर होणा:या दुष्परिणांमाविषयी आजही म्हणावी तशी जागरूकता नाही. काही प्रमाणात महिलांना त्याची माहिती असली तरी जाण नाही. शिवाय स्त्रियांचे कुटुंबातील स्थान व त्यांच्या आरोग्याची किंमत या गोष्टीवरही एलपीजीचा वापर घरात करायचा की नाही हे ठरते. एकूणच घर-कुटुंबासाठी आपल्या आरोग्याची किंमत लावायला स्त्रिया तयार असतात. त्यामुळेच ग्रामीण भागात चुलींचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. चुलीवर स्वयंपाक केल्यानं आरोग्यावर होणारा दुष्परिणाम, त्यासाठी कराव्या लागणा:या दवाखान्याच्या फे:या, लागणारा पैसा आणि ‘सरपणाची किंमत’ अशी सांगड घालून जर महिलांना, ग्रामीण भागातील नागरिकांना दाखवली तर त्यामुळे चुलीवरच्या स्वयंपाकाचं प्रमाण काही प्रमाणात कमी होऊ शकेल.
ग्रामीण भागात ज्यांच्या घरात सिलिंडर पोहचलेत तिथले चित्र काय आहे हेही समजावून घ्यायला हवे. तिथेही सिलिंडर पुरवून वापरण्याकडेच कल असतो. सिलिंडरची किंमत आणि तो घरात आणण्यासाठी कराव्या लागणा:या दगदगीचा विचार करता, पै-पाहुणो आल्यावर चहा-पाणी करण्यापेक्षा जास्त आणि ‘आमच्याकडे गॅस आहे’ हे दाखवण्यापेक्षा जास्त काही त्याचा उपयोग होत नाही हे ब:याच ठिकाणी आजही वास्तव आहे. समजा भारतातील 1क्क् टक्के लोक गॅस सिलिंडर वापरू लागले तर तितक्या प्रमाणात आपण ते पुरवू शकणार आहोत का? गॅस सिलिंडरचा प्रचार-प्रसार करताना याचाही विचार व्हायलाच हवा. मुळात सरपण ते एलपीजी याच्यामध्ये अन्य कोणते ठोस पर्यायच नाहीत. केरोसिन होता, पण आता तेही हव्या तेवढय़ा प्रमाणात मिळत नाही. आणि मिळालं तरीही त्याचा वापर दिवाबत्ती वगैरेर्पयतच मर्यादित आहे.
आज स्वयंपाक करण्यासाठी विविध प्रकारची इंधने वापरली जातात. एलपीजी, वीज, बायोगॅस, सौरऊर्जेवरची उपकरणं इत्यादि. प्रत्येक ठिकाणी एलपीजीच असेल असे होणार नाही. ती अपेक्षा करणोही चूक आहे. काही प्रमाणात आपण जर पर्यायी इंधनाचा वापर केला तर त्याचा स्वीकारच व्हायला हवा. भारतासारख्या देशात त्याला पर्याय नाही. स्वयंपाकासाठी चूलच का, ग्रामीण भागातून चूल अजूनही हटली नाही यामागे आर्थिक, सामाजिक कारणं जशी आहेत, तशीच परंपरा आणि चव या कारणांनीही ग्रामीण भागातील चूल अजूनही धगधगते आहे. चुलीवरचा स्वयंपाक जितका रुचकर लागतो तितका गॅसवरचा स्वयंपाक नाही वाटत या मानसिकतेनंही चुलीला महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात केवळ ‘इंधन ऊज्रेचा’ विचार न होता एकूण ‘कुकिंग एनर्जी’चा साकल्याने विचार होणो गरजेचे आहे. आपले अंतिम लक्ष्य ‘स्वयंपाक’ हेच असेल, तर मग तो कोणत्या मार्गाने व कशा प्रकारे सहजसाध्य करता येईल हे पाहणो गरजचे आहे. आता चुली कितीही सुधारल्या तरीही त्या एलपीजीच्या जवळ जाण्यावर मर्यादाच येणार. त्यासाठी मग एकाच चुलीत सरपण आणि एलपीजी असे दोन्हीही वापरता येतील असे तंत्रज्ञानाद्वारे सहज शक्य आहे.
दाक्षिणात्य भागात भात-मासे हा मुख्य आहार असतो. तेथे अनेक प्रकारच्या स्वयंपाकात मुख्यत्वेकरून ‘उकळणो’ हाच मुख्य भाग आहे. उकळण्याची ही प्रक्रिया कोणत्या ऊर्जास्रोतातून चटकन आणि कमी प्रदूषणात होऊ शकेल हे पाहिले की झाले! त्या उलट उत्तर भारतात भाजीपोळी, भाकरी, वरण, भात असे साग्रसंगीत जेवण असते. हे अन्नपदार्थ कोणत्या प्रकाराने चांगल्या प्रकारे शिजू शकतात याचा विचार होणो आवश्यक आहे. दुर्दैवाने आपल्याकडे आपण ऊर्जास्रोतांसाठी उकळणो ही एवढीच प्रक्रिया पाहतो. कोणतेही इंधन प्रकार वापरले तरी किती घरात किती प्रदूषण होत आहे, मग त्यासाठी वापरण्यात येणारी पद्धती व तंत्रज्ञान हा मुद्दा गौण ठरतो. त्यामुळेच स्वयंपाकासाठी कमीत कमी प्रदूषण असणा:या तंत्रज्ञानाचा वापर करणो गरजेचे आहे.
गॅस नको, चूलच हवी!
उपलब्ध इंधनांमध्ये एलपीजी हे स्वच्छ व आरोग्यास अपायकारक नसणारे इंधन आहे तरीही चूलीच का दिसतात याची तीन मुख्य कारणं.
एक तर एलपीजी गॅस सिंलेंडरची किंमत. दुसरं, या गॅस सिलेंडरचा विश्वासू पुरवठा आणि तिसरं, आपल्या अंगणातच फुकट उपलब्ध असणारा लाकूडफाटा. ग्रामीण, दुर्गम भागात, गंॅस सिलेंडरची किंमत आजही बहुतेक घरांना परवडत नाही. एकाचवेळी 5क्क् रूपयांना खोडा घालणो दुर्गम भागात सहजशक्य नसते. शिवाय सिलेंडर आणायचा म्हटलं की, शेतावर-कामावर गेलेल्या पुरूषांनाच आपली रोजीरोटी सोडून ते आणावं लागणार. तरच सिलेंडर घरात येणार!
सिलिंडरचं वितरण आता पुर्वीपेक्षा खूप सुसह्य झालं असलं तरी सिलिंडर घरात आणण्याची कटकट संपलेली नाही. ब:याचदा प्रत्येक गावात गॅस एजन्सी नसते. ती कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी असते. त्या ठिकाणी जाऊन सिलेंडर आणायचा म्हणजे कामाचा एक दिवसाचा खाडा! शिवाय तालुक्याच्या ठिकाणी गेले तरी लगेचच सिलेंडर मिळेल याचीही खात्री नाही. त्यामुळे गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी कराव्या लागणा:या या दगदगीपेक्षा ते टाळणं अनेकांना जास्त सोयीचे वाटते. शिवाय जर माङया अंगणात-दारातच मला वाळलेले गवत, लाकूडफाटा, शेतातील टाकाऊ माल उपलब्ध होणार असेल, तो चूलीवर जाळून माङया अन्नाची सोय होणार असेल तर कशाला हवी सिलिंडरची दगदग असाही विचार ग्रामस्थांमध्ये असतोच.
मुळात चूल पेटवण्यासाठी म्हणून काही ते लाकडं तोडत नाहीत किंवा त्यासाठी मुद्दाम पालपाचोळा गोळा करायचा अशा हेतूने ते वेळ दवडत नाहीत. त्यांच्या रोजच्या कामकाजातच येता जाता ते आसपासचा लाकूडफाटा सहजरित्या गोळा करून आणू शकतात. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाही आणि सहज उपलब्धता या तीन मुख्य कारणांमुळे गावकरी चूलीवर अधिक अवलंबून असतात.
पाईपलाइन आणि प्रिपेड!
खरंतर, एलपीजी हे तुलनेने स्वस्त आणि बहुतांशी स्वच्छ इंधन आहे. ग्रामीण भागात ते पुरविण्यासाठी पाईपलाईन हा चांगला उपाय होऊ शकतो. पाईपलाईनने गॅस पुरवठा ही ग्रामीण भागाची मोठी निकड असतानाही शासन ती सुविधा शहरांत राबविण्यासाठी आटापिटा करत आहे. सिलेंडर पुरविण्यात जिथे अडथळा आहे, असुविधा आहेत अशा भागांत तर हा उपाय निश्चितच मोठे काम करू शकेल. शिवाय नागरिकांना जरी एकाचवेळी 4क्क्-45क् रूपये ही किंमत मोजणो अवघड असले तरी दिवसाला 2क्-3क् रूपये देणो हे तितकेसे अवघड नाही. गावात एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी टॅंकर बसवून पाईपलाईनद्वारे गावात गॅस पुरवायचा. प्रीपेड किंवा पोस्टपेड मीटरप्रमाणो ही सोय करता येऊ शकते. वापरणा:याला ठाऊक असते, जितक्या रूपयांचे रिचार्ज केले, तितकाच वापर करायचा! या प्रक्रियेत एकदाच मोठया प्रमाणात खर्च होईल मात्र यामुळे आर्थिक दुर्बल घटकांनाही एलपीजीचा वापर करता येणो शक्य आहे.
7क् टक्के घरांत आजही चूलच!
केंद्रीय सांख्यिकी विभागाने नुकतीच एक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार भारतातील ग्रामीण भागातील 67 टक्यांहून अधिक घरांत आजही अन्न शिजविण्यासाठी चूलींचाच वापर होतो. याचा अर्थ आजही लाकूडफाटा हेच त्यांचे मुख्य इंधनस्त्रोत आहे. खरेतर गाव- खेडेगावात फिरताना, जे दिसतं ते पाहता; सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीपेक्षाही चुलींचं प्रत्यक्षातील प्रमाण जास्तच असण्याची शक्यता आहे.
केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील बहुतांश ग्रामीण भागात आजही कोळसा किंवा लाकूडफाटा यावरच स्वयंपाक करतात. चूलीवरचे अवलंबन मागील 2क् वर्षात केवळ 12 टक्क्यांनी कमी झाले आहे. 1993-94 रोजी ग्रामीण भागात एलपीजी गॅस वापरण्याचे प्रमाण हे केवळ 2 टक्के होते. मात्र अद्यापही त्यात लक्षणीय वाढ झालेली नसून 2क्11-12 च्या सव्रेक्षणानुसार 2 टक्यांवरून 15 टक्कयांवर गेली आहे. आजही जवळपास 1क् टक्के ग्रामीण घरे शेणाच्या गोव:यांवर आपला स्वयंपाक करतात. 1993 -94 पासून गोव:या वापरात 11.5 टक्यांनी घट झाली आहे.
(लेखिका ‘समुचित एन्वायरो टेक’च्या संचालक आहेत.)
(शब्दांकन: हिनाकौसर खान- पिंजर)