नाते गुरू- शिष्याचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:32 AM2018-12-30T00:32:15+5:302018-12-30T00:34:19+5:30

शिक्षक पूर्वी गुरुजी, नंतर मास्तर आणि आता सर किंवा टीचर म्हणून समाजात ओळखला जातो. गु = गुण, रु = रुजविण्याची, जी = जिद्द ‘गुण रुजविण्याची जिद्द’ म्हणजे गुरुजी. मास्तर या शब्दातही असाच अर्थ दडलाय. मा म्हणजे माँ म्हणजेच आईच्या स्तरावर जाऊन समजून घेणारी व्यक्ती. आजकाल ‘सर’ शब्दाने शिक्षक ओळखला जातो. शिक्षक समाजाचे भवितव्य घडवीत असला तरी त्याचे भवितव्य कसे असते, हे समजून घेण्याची उत्सुकता आपणास असेल म्हणूनच हा लेखन प्रपंच.

Relationship Guru - disciple! | नाते गुरू- शिष्याचे!

नाते गुरू- शिष्याचे!

googlenewsNext
ठळक मुद्देसावित्रीबाई फुले जयंती विशेष!

राहुल भडांगे/लोकमत न्यूज नेटवर्क
शिक्षक पूर्वी गुरुजी, नंतर मास्तर आणि आता सर किंवा टीचर म्हणून समाजात ओळखला जातो.
गु = गुण, रु = रुजविण्याची, जी = जिद्द
‘गुण रुजविण्याची जिद्द’ म्हणजे गुरुजी. मास्तर या शब्दातही असाच अर्थ दडलाय. मा म्हणजे माँ म्हणजेच आईच्या स्तरावर जाऊन समजून घेणारी व्यक्ती. आजकाल ‘सर’ शब्दाने शिक्षक ओळखला जातो. शिक्षक समाजाचे भवितव्य घडवीत असला तरी त्याचे भवितव्य कसे असते, हे समजून घेण्याची उत्सुकता आपणास असेल म्हणूनच हा लेखन प्रपंच.
शिक्षक म्हणून समाजात खूप मानसन्मान मिळतो. पूर्वी एवढा मान सन्मान आज नसला तरी आजच्या युगात इतरांना मिळणाऱ्या मान सन्मानापेक्षा शिक्षकाला मिळणारा मान सन्मान मोठा व जास्त आहे याचे खूप समाधान आम्हा शिक्षकांना आहे. शिक्षक नोकरीला लागल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंत समाजात सर्वांच्या आदरास पात्र ठरतो. शिक्षण म्हणजे भविष्य आणि ते घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकाची असते. अनेक शिक्षक त्या जबाबदारीनुरूप कामही करतात. मुलांना शिकते करतात. त्यांच्या अडचणी सोडवितात. त्यांना शिकण्यात पदोपदी मदत करतात. शिक्षक मुलांचे मित्र आणि मार्गदर्शक असतात. पालकांएवढीच ते मुलांची काळजी घेत असतात. किंबहुना शाळेतील ते मुलांचे पालकच असतात. मुलांनाही शिक्षकांवर खूप विश्वास असतो. एखादी चुकीची गोष्ट शाळेत सांगितली किंवा शिकविली आणि घरी येऊन पालकांनी कितीही विश्वासाने ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तरी शिक्षकांनी सांगितलेलेच बरोबर असते एवढा विश्वास मुले शिक्षकांवर ठेवत असतात.
शाळा या आधुनिक गुरुकुलात शिक्षक नावाचे गुरु आपल्या शिष्यांचे भवितव्य घडविण्याचे अत्यंत पवित्र कार्य करीत असतात. आजची मुले उद्याचे भवितव्य आहे. म्हणून मुले घडविणे म्हणजे देश घडविणे होय. देश घडविण्याचे, देश पुढे नेण्याचे महान आणि अद्वितीय कार्य शिक्षक करीत असतात. शिक्षकास आजच्या समाजातील पगारी समाजसेवक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काही मूठभर शिक्षक वरील वर्णनास पात्र नसतीलही. पण बहुतांश शिक्षक देश घडविण्याचे आपले काम अतिशय इमानेइतबारे करीत आहेत.

Web Title: Relationship Guru - disciple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.