शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

वऱ्हाडाचा अमूल्य ठेवा उद्ध्वस्त वास्तू समृद्ध इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

या पुस्तकात वऱ्हाडातील स्थापत्य शैलीचा अद्भुत नमुना असलेल्या गाविलगड, नरनाळा, असदगड, भैरवगड, मैलगड किल्ल्यांचे दर्शन घडते. अनेक पुरातन मंदिरात आजही प्राचिन, मध्ययुगीन मूर्तीकलेचे नमुने पाहायला मिळतात. काही ठिकाणची मूर्तीकला ही लक्षवेधी आहे, तर काही गावातील शेकडो वर्षांपासूनची मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देकला- संस्कृती - राजू चिमणकर

वऱ्हाडातील किल्ले, ऐतिहासिक वास्तुंची दुर्मिळ माहिती असलेले पत्रकार, इतिहास संशोधक विवेक चांदुरकर यांचे उद्ध्वस्त वास्तू; समृद्ध इतिहास हे वऱ्हाडाचा अमूल्य ठेवा जपणारे पुस्तक अमरावतीच्या मीडिया वॉच पब्लिकेशनने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात वऱ्हाडातील स्थापत्य शैलीचा अद्भुत नमुना असलेल्या गाविलगड, नरनाळा, असदगड, भैरवगड, मैलगड किल्ल्यांचे दर्शन घडते. अनेक पुरातन मंदिरात आजही प्राचिन, मध्ययुगीन मूर्तीकलेचे नमुने पाहायला मिळतात. काही ठिकाणची मूर्तीकला ही लक्षवेधी आहे, तर काही गावातील शेकडो वर्षांपासूनची मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या मंदिरांचा जिर्णाेद्धार होऊन हा ऐतिहासिक वारसा जपण्याची लेखकाची तळमळ पुस्तकातून दिसून येते.ऐतिहासिक वास्तुंचे डॉक्यूमेेंटेशनच या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अमरावती विभागातील (वºहाड) सर्वच छोटे, मोठे किल्ले, प्राचीन- हेमाडपंती मंदिरे, मूर्ती, ऐतिहासिक वास्तू, मशीदींची माहिती ही पुस्तिका मार्गदर्शिका ठरणारी आहे.नैसर्गिकदृष्ट्या सधन व संपन्न असलेल्या वºहाडावर मौर्यापासून तर इंग्रजांपर्यंत अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले. त्यांच्या काळात अनेक किल्ले, ऐतिहासिक वास्तुंचे बांधकाम केले. त्यामुळे वºहाडाला संपन्न असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.महाराष्ट, मध्य प्रदेशच्या सीमेवर वसाली गावाजवळील एका डोंगरावर एक किल्ला आहे. डोंगर दऱ्यांमध्ये दडलेल्या या किल्ल्यांचा शोध लेखकाने घेतला आहे. या किल्ल्याबाबत पुरातत्व खाते, इतिहास संशोधकांनाही माहिती नव्हती. या पुस्तकाच्या माध्यमातून असे काही किल्ले व मंदिरांची माहिती समोर आली आहे. वऱ्हाडात संपूर्ण दगडी बांधकाम असलेले चालुक्यकालीन, यादवकालीन हेमाडपंती मंदिरे व अत्यंत सुबक मूर्तीकला दर्शविणाऱ्या अनेक मूतीर्ही आहेत. बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यात तर अशा मंदिरांचा खजिनाच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोथडी, सातगाव, साकेगाव, धोत्रा नंदई, अमडापूर या गावातील मंदिरांसह व यवतमाळ जिल्ह्यातील मनपूर, लोहारा, तपोना, पिंप्री कलगा या गावांमधील मंदिरांचा इतिहास मांडला आहे. आपल्या गावात, आपल्या भागात असलेल्या या वास्तुंचा इतिहासच आपल्याला माहिती नाही. या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. मंदिराच्या निमितीर्साठी अनेकांनी कष्ट केले आहेत; मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांची सातवी पत्नी ही बुलडाणा जिल्ह्यातील करवंड येथील इंगळे घराण्यातील होती. अजूनही त्या ठिकाणी मोठी गढी आहे; मात्र गावातील व बुलडाणा जिल्ह्यातील नागरिक या माहितीपासून अनभिज्ञ आहेत.लोणार हे जगप्रसिद्ध ठिकाण वऱ्हाडात आहे. जगात उल्कापातामुळे तयार झालेले केवळ दोनच खाºया पाण्याचे सरोवर आहेत. जगभरातून अभ्यासक या ठिकाणी अभ्यासाला व पाहायला येतात. या सरोवराचा पौराणिक व वैज्ञानिक इतिहास या  पुस्तकात दिला आहे. तसेच सिंदखेड राजा येथे संपूर्ण देशाचे स्फूर्तीस्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची माता जिजामाता यांचे माहेर आहे. या पुस्तकात सिंदखेड राजा येथील इतिहास व ऐतिहासिक वास्तुंची सखोल माहिती दिली आहे. प्रत्येक वास्तूच्या बांधकामामागे काही लोककथा सांगण्यात येतात. यामध्ये चमत्कारीकता जास्त असते. या लोककथांचाही उल्लेख या पुस्तकात आहे. तसेच संशोधन करून या वास्तूंच्या बांधकामाचा सत्य इतिहासही पुस्तकातून मांडला आहे. अत्यंत साध्या, सरळ भाषेत पुस्तकाची मांडणी केली आहे. वºहाडात राहणाºया प्रत्येकाच्या घरात हे पुस्तक असणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या भागातील इतिहास आपल्याला वाचायला मिळणार आहे. तसेच एखाद्या वेळी पर्यटनाला जायचे असले तर हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. पर्यटनाला कुठे व केव्हा जायचे याची माहिती या पुस्तकातून मिळणार आहे. वऱ्हाडातील ऐतिहासिक वास्तुंवर आतापर्यंत खूपच कमी लिखाण झाले आहे. त्यामुळे या वास्तूंचा इतिहास समोर येणे आवश्यक आहे. हे पुस्तक वºहाडातील पर्यटनाला चालना देणारे ठरणार आहे.

टॅग्स :historyइतिहास