शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

 निमित्त - गोंधळलेल्या लैंगिक मानसिकतेचे दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 06:00 IST

आठवीत असताना मिशा फुटू लागल्या आणि आपण जवान व्हायला लागलो... अशा अगदी थेट सूचक वाक्याने....

- डॉ. सीमा घंगाळे- ‘पुणे नाट्यसत्ताक’मध्ये झालेल्या ‘वाफाळलेले दिवस’ या प्रतीक पुरी यांच्या कादंबरीच्या संपादित भागाचे अभिवाचन नुकतेच झाले. योग्य वेळी, योग्य मार्गाने लैंगिक शिक्षण न मिळाल्याने मुलांची झालेली अर्धवट आणि गोंधळलेली लैंगिक मानसिकता उभी करताना लेखक-दिग्दर्शकाने लैंगिकतेचे सगळेच बळीचे अन् कळीचे मुद्दे सुयोग्यरीत्या मांडले आहेत. त्याचे रसग्रहण... आठवीत असताना मिशा फुटू लागल्या आणि आपण जवान व्हायला लागलो... अशा अगदी थेट सूचक वाक्याने कादंबरीची अन् अभिवाचनाची सुरुवात होते. तेथेच लेखकाच्या कोणत्याही काल्पनिक कथेत न अडकता नेमक्या विषयाला हात घालण्याचा निर्णय लक्षात येतो अन् हे प्रकरण भलतंच बोल्ड वाटू लागतं. ...निमित्त होतं ‘पुणे नाट्यसत्ताक’मध्ये झालेल्या ‘वाफाळलेले दिवस’ या प्रयोगाचे. ‘वाफाळलेले दिवस’ या प्रतीक पुरी यांच्या कादंबरीचा लिखित ऐवज वाचनाच्या मंचीय सादरीकरणातून दिग्दर्शक राहुल लामखेडे यांनी प्रेक्षकांसमोर आणला आहे. कोणत्याही पारंपरिक किंवा प्रचलित रंगमंच न वापरता केवळ सूचक प्रकाशयोजना आणि हिंदी सिनेमातील काही निवडक गाणी नेमकेपणे वापरून अतिशय गंभीर विषय आणि तितकाच गंभीर प्रश्न प्रेक्षकांना विचारण्याचे काम या विनोदी सादरीकरणातून दिग्दर्शकानं केला आहे. मंचावरील सगळी पात्रं कादंबरीतील लेखनाचे वाचन करीत असली तरी हे प्रमाणबद्ध वाचनासारखं थेट नाही. आपल्या अभिनयातून आणि डोळ््यांच्या अतिशय संयत हालचालीतून वरवर दिसणाºया विनोदी प्रसंगातला गर्भित आणि गंभीर विषय प्रेक्षकांसमोर ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. वर वर पाहता हा प्रयोग म्हणजे वयात येणाºया मुलाचे शारीरिक आणि भावनिक बदलांचे स्थित्यंतर लक्षात घेऊन उडालेल्या गोंधळाचे चित्रण भासते. पण कादंबरीकारानं वयात येणाºया आठवीतील मुलाचा ‘फिलॉसॉफिकल वांदा’ समोर ठेवून लैंगिकता आणि लैंगिकतेचे सामाजिक संदर्भ आणि हे संदर्भ मुलगी आणि मुलगा यांच्याबाबतीत कसे वेगळे किंवा कधी कधी बरोबर विरुद्ध असतात, यावर निर्भीड भाष्य केलं आहे. यामुळेच ‘किशोरवयीन मुलांसाठी’ या वर्तुळातून बाहेर येऊन कादंबरीचा परीघ वाढत जातो तो थेट लैंगिकतेबद्दलच्या समाजाच्या असणाºया ढोंगी आणि दांभिक संदर्भापर्यंत. आजही लैंगिकतेबद्दल उघडपणे बोलणे, विचारणे, चर्चा करणे हे व्यभिचारसदृश किंवा किळसवाणे ठरवले जाते. या धोरणामुळेच किशोरवयीन मुला-मुलींना याबद्दल योग्य आणि पद्धतशीर मार्गदर्शन मिळत नाही अन् सेक्स ही कधी दमन, तर कधी विकृती बनून जाते. यामध्येही मुले आपल्या समवयस्कांमध्ये ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. पण मुलींना मुलींसोबतच असे अनुभव वाटून घेताना लाज वाटते. स्वत:च्या शरीराबद्दल, शरीरातील बदलाबद्दल एक तर बोलू दिले जात नाही किंवा या चर्चा घाणेरड्या आहेत-असतात असे बिंबवले जाते. दिग्दर्शक राहुल लामखेडे यांनी लेखक प्रतीक पुरी यांच्या मदतीने कादंबरीचा संपादित भाग मंचावर आणला. त्याला प्रेक्षकांचा सुहास्य प्रतिसाद लाभला. वयात येणाºया मुलांचे प्रथमपुरुषी निवेदन स्वत: दिग्दर्शकाने सादर केले आहे. त्यातून प्रेक्षकाला त्यांनी भरपूर हसवले. त्याचबरोबर दांभिक समाजाच्या खोट्या लैंगिक संदर्भांना सणसणीत चपराक दिली आहे. सर्व प्राण्यांप्रमाणेच माणसांमध्येही सामान्य आणि तहान-भूक-निवारा याप्रमाणे लैंगिकताही अनिवार्य गरज असताना त्याचे झालेले अवघड ‘ग्लोरिफिकेशन’ दिग्दर्शकाने विनोदी शैलीतून समोर ठेवले आहे. वयात येणारा मुलगा (नायक) त्याला आवडणारी मुलगी शिल्पा निंबाळकर (नायिका) यांच्याभोवती हे अभिवाचन फिरून फिरून येत असले तरी लैंगिकतेला उगाचच गुंतागुंतीचे करणारे बरेचसे प्रसंग दिग्दर्शकाने मांडले आहेत. नैतिक-अनैतिकतेच्या परंपरावादी समाजमान्यता आपल्या मुलांच्या गळी उतरवताना आपण नात्यामधली ती आपलेपणाची भावनाच पुसून टाकतो अन् आधीच गोंधळलेल्या आपल्या किशोर-कुमार तरुणाईला अजूनच एकटं पाडतो. आपल्या सगळ््या पात्रांतून आणि प्रसंगांतून हे अभिवाचन असे नेहमी अनुत्तरित राहिलेले (...की ठेवलेले?) प्रश्न समोर आणते. हा प्रयोग कुठेही धडे-सल्ले देत नाही. बरोबर की चूक या गुंत्यात न पडता नैसर्गिक सत्य दांभिकतेमुळे कसे काळवंडले आहे, हे कादंबरीकाराने मांडले आहे. दिग्दर्शक त्याच्या प्रभावी वास्तववादी सादरीकरणातून आपल्याला अधिक अंतर्मुख करतो. ...आणि म्हणूनच ही अप्रतिम कलाकृती तरुण मुले अन् त्यांच्या पालकांनी जरूर पाहावी.  

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतTheatreनाटक