शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

मुंबई मेरी जान

By admin | Published: January 28, 2017 4:25 PM

साडेपाच दशकांपूर्वी आॅस्ट्रेलियाचा एक माणूस मुंबईत येतो, मुंबईच्या प्रेमात पडतो. या प्रेमातूनच मुंबईचा अभ्यास करतो आणि त्यावर पीएचडीही मिळवतो! मुंबईचा त्यांचा अभ्यास एवढा दांडगा आहे की, मुंबईच्या गल्लीबोळा आजही त्यांना तोंडपाठ आहेत. आॅस्ट्रेलियाच्या या इतिहासकाराचं नाव आहे जीम मेसोलस.

- जीम मेसोलसशब्दांकन : ओंकार करंबेळकर

साडेपाच दशकांपूर्वी आॅस्ट्रेलियन इतिहासकार जीम मेसोलस अभ्यासासाठी मुंबईत आले. स्वातंत्र्यानंतर या शहराची झालेली वाढ आणि विकास त्यांनी टिपला. मुंबईत शिष्यवृत्तीसाठी आल्यानंतर त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आणि त्यानंतर ते सिडनी विद्यापीठामध्ये इतिहास शिकवू लागले. गेली अनेक वर्षे ते मुंबईचा अभ्यास, वाचन, लेखन करत आहेत. मुंबईचा ते एक चालता बोलता कोशच आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई विद्यापीठाचा इतिहास विभाग, लेस्टर विद्यापीठ आणि लंडनच्या द स्कूल आॅफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडिजतर्फे ‘पॉवर, पब्लिक, कल्चर अँड आयडेंटिटी - टूवर्ड्स न्यू हिस्टरिज आॅफ मुंबई’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद जीम मेसोलस यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. जगभरातील विविध देशातील इतिहासतज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते. यानिमित्ताने मुंबईत आलेल्या जीम मेसोलस यांनी त्यांच्या मुंबईबद्दलच्या भावनांना ‘लोकमत’शी बोलताना पुन्हा एकदा उजाळा दिला.

मी पहिल्यांदा मुंबईत आलो त्याला आता यावर्षी ५६ वर्षे पूर्ण होतील. भारत सरकारनं कॉमनवेल्थ एक्स्चेंज योजनेखाली मला शिष्यवृत्ती दिली आणि मला मुंबईत येता आलं. तेव्हा माझ्यासाठी मुंबई अगदीच नवी होती. युरोपला जाणारी जहाजं मुंबईत थांबून जायची. त्या जहाजातील लोकांकडून जी काही थोडीफार माहिती मिळायची तितकीच माहिती मला होती. पण नंतर मी या शहराच्या प्रेमातच पडलो. मी मूळचा सिडनीचा असल्यामुळे मुंबईशी लवकर समरस होऊ शकलो. कारण या दोन्ही शहरांमध्ये प्रचंड साम्य होतं. आजही आहे. एकतर ही दोन्ही शहरे महासागराच्या काठावर आहेत आणि उत्तम बंदराची शहरं म्हणून नावाजलेली आहेत. दोन्ही शहरांमध्ये ट्रेन धावायच्या, दोन्ही शहरांच्या आजूबाजूस असणारे डोंगरही कदाचित एकाच उंचीचे असावेत. या भौगोलिक समानतेमुळे मुंबई मला लगेच आवडायला लागली. पण मुंबई आणि सिडनीमध्ये सर्वात मोठा फरक होता तो म्हणजे लोकसंख्येचा. त्यावेळेस मुंबईची लोकसंख्या त्यावेळच्या आॅस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येइतकी होती. आजही बऱ्यापैकी तेच प्रमाण आहे. मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात आल्यानंतर भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मुलांशी मला भेटायची संधी मिळाली. माझ्यासाठी हे सगळं एकदम नवीन आणि अपूर्व होतं. या शहरामध्ये संशोधनाचं काम करायचं म्हणजे लोकांना भेटावं लागणार होतं. मग मी भारतीय मित्रांबरोबर शहरात फिरायला सुरुवात केली. तेव्हा मुंबई आजच्या शहरापेक्षा खूपच वेगळी होती. कल्याण, ठाणे ही दोन वेगवेगळी शहरं होती. आता सगळी एकमेकांना जोडली जात आहेत. अंधेरी, वांद्रे आणि गोरेगाव या जागा शहराच्या बाहेर होत्या, आता मुंबईच्या मध्यभागी वांद्रे आलंय. बीकेसी तर मुख्य कामाचं ठाणं झालंय. पण तरीही आम्ही सर्वत्र जात असू. वडाळ्याची मिठागरं, वसईचा किल्ला असा मी फिरायला जात असे. त्यामुळे शहराची भरपूर माहिती मला मिळाली.आज मुंबई भरपूर बदलल्यासारखी वाटत असली तरी फोर्ट परिसरामध्ये फारसा बदल झालेला नाही. इथल्या जुन्या इमारती, कॉफी शॉप्स मला आजही पन्नास दशके मागे घेऊन जातात. विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये किंवा अर्काइव्हजमध्ये संदर्भ शोधणारी आम्ही मुलं दुपारी अशा कॉफी शॉप्समध्ये जात असू. त्यावेळेस एम. एफ. हुसेन, किरण नगरकर, अरुण कोलटकरांसारखी प्रसन्न व्यक्तिमत्त्वं तिथे हमखास दिसायची. पण तेव्हा मी अगदीच लहान असल्यामुळं त्यांच्याशी बोलायला भीती वाटायची. फोर्टमध्ये आधुनिक विचारांचे लेखक, चित्रकार, संगीतकार सहज दिसायचे. त्यावेळेला हे सगळं मस्त वाटायचं. हे नव्या विचारांचे लोक, कलाकार संस्कृती आणि राजकारणावर चर्चा करत. या परिसरात बॉलिवूडमधले अभिनेते-अभिनेत्रीही येत. अल्काझींची नाटकं पाहणं, आनंदधाम फिल्म सोसायटीच्या फिल्म पाहणं, शास्त्रीय संगीत ऐकणं.. असे उपक्रम चालायचे. अशा प्रकारचे भरपूर कार्यक्रम तेव्हा होत असत. आता चर्चगेटला जेथे इंडियन मर्चंट चेंबर्स आहे त्याच्या वरच्या मजल्यावर शास्त्रीय संगीताच्या मैफली होत. इथल्या अनेक रेस्टॉरंट्समध्ये दुपारी जॅझ ऐकायला मिळे. जॅझ आणि वेस्टर्न म्युझिक ऐकणं हा सर्वात आनंदाचा काळ असे. तो सगळाच काळ एकदम भारावलेला होता. माझा मित्र आणि लेखक नरेश फर्नांडिसने या जॅझ आणि एकूणच त्या काळाबद्दल भरपूर लेखन केलंय. सुदैवाने मला ते सगळं अनुभवायला मिळालं.ज्या ज्या वेळेस मी मुंबईत येतो तेव्हा नवं काहीतरी पाहायला मिळतं. बदलत्या गतीप्रमाणं बदलणारं हे शहर आहे. नवी उपनगरं वेगाने तयार होत आहेत. आता विकसित झालेले अनेक रस्ते पन्नास वर्षांपूर्वी नव्हते. फ्लायओव्हर्सचा विचारही आम्ही केला नव्हता. शहराची वाढ आता आडवी उभी झाली असली तरी मला आवडणारा फोर्ट परिसर बऱ्यापैकी तसाच आहे. इथल्या जुन्या इमारती, गॉथिक शैलीतील वास्तू या साऱ्यांचं चांगल्या पद्धतीने जतन आणि वापर होत आहे. नुकताच मी काळा घोडा आणि हॉर्निमन सर्कलचा परिसर परत एकदा पाहिला. इथल्या इमारती ज्या पद्धतीने जपण्याची एक नवी लाट आली आहे ती मला एकदम सुखावणारी वाटते. अनेक देशांमध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या खुणा पुसण्याचा प्रयत्न केला गेला, पण मुंबईने या इमारती योग्य पद्धतीने जपल्या आहेत. शहराच्या स्थानिक इतिहासाच्या दृष्टीने ही महत्त्वाची केंद्रे आहेत. सिंगापूरसारख्या देशांनी याबाबतीत चांगले काम केले आहे, त्यांचा आदर्श येथे घ्यायला हरकत नाही. मुंबईत छापल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रातील जाहिरातींचाही मी अभ्यास केला आहे. चाळीस वर्षांमध्ये शहराच्या आर्थिक-सांस्कृतिक जडणघडणीचा आरसाच या जाहिराती दाखवतात. मला यातूनही मुंबई समजत गेली. त्याकाळी हे शहर फक्त कापडगिरण्या आणि आयातनिर्यातीवर भर देणारं होतं. त्यानंतर आर्थिक क्षेत्रात बदल झाला. कापडगिरण्या मागे पडल्या. आता वर्तमानपत्रात हॉटेलं, फिटनेस स्टुडिओ, नवी इलेक्ट्रॉनिक उपकरणं, घरात लागणाऱ्या वस्तू, मोबाइल, लॅपटॉपच्या जाहिराती येतात. ही सगळी आपल्यातील बदलाची सूक्ष्म लक्षणं असतात.मुंबई मला आणखी एका कारणाने मोहात पाडते ते म्हणजे मुंबईचं बहुसांस्कृतिक, बहुभाषिक रूप. मी भारतातील इतर शहरांमध्येही फिरलो आहे पण मुंबईमध्ये हे कॉस्मोकल्चर जास्त आहे. खरं तर तोच मुंबईचा आत्मा आहे. हे बहुसांस्कृतिकत्व आपल्या सगळ्यांना बांधून ठेवतं. भारताच्या दृष्टीने विचार केला तर ते एकदम अपूर्व आहे. मुंबई मराठीबहुल असली तरी इतरांना आधीपासूनच सामावून घेत आली आहे. पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा आजच्या इतकी मनोरंजनाची साधनं नव्हती. तेव्हा शहरातले पारशी, ज्यू, बोहरा, मुस्लीम किंवा इतर अनेक जातिधर्माचे लोक संध्याकाळी सूर्यास्त पाहायला समुद्रकाठावर जमत. मला ते मनापासून आवडलं होत. आजही सूर्यास्त पाहण्यासाठी या वेगवान शहरातले लोक समुद्रकाठावर आलेले दिसतात. हे बहुसांस्कृतिकत्व मुंबईला जागृत ठेवतंय असं मला वाटतं. दहशतवादी हल्ल्यानंतरसुद्धा मुंबईकरांनी ज्या पक्वपणे वर्तन केलं ते मला आवडलं. बॉलिवूडचं इथं असणं हेसुद्धा या शहराच्या वैशिष्ट्यात भर टाकणारं आहे. मुंबई नावाची संकल्पना बॉलिवूडने सतत नव्या पद्धतीने शोधली आहे. लोकांना जोडणारा तो एक दुवाच आहे. बॉलिवूडपाठोपाठ या शहराला एकजिनसीपण येतं ते लोकल प्रवासामुळे. दररोज सात ते आठ दशलक्ष प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे शहराला एकदम वेग आणि जिवंतपणा आला आहे. झोपडपट्टी हा जगभरातील शहरांचा प्रश्न येथेही आहे. पण मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसनासारखे जे प्रकल्प राबवले गेले किंवा आजही ते सुरू आहेत, त्याचे महत्त्व मला अनन्यसाधारण वाटते. लोकांना सुस्थितीत राहायला मिळणे फारच आवश्यक आहे.मुंबईत मी अनेकदा आलो आहे, राहिलो आहे. आजही दरवर्षी माझी मुंबईला भेट असतेच. त्या अर्थाने मी स्वत:ला मुंबईकरच मानतो. मुंबई हे माझं घरच आहे. इथल्या वातावरणानं मला कायम भारलं आहे आणि ऊर्जा दिली आहे. सिंगापूरप्रमाणे इमारतींच्या वर जॉगिंग ट्रॅक्स तयार व्हावेत..आजच्या मुंबईच्या समस्यांचा विचार करायचा झाला तर काही समस्या माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्यापैकी पहिली म्हणजे प्रदूषण. हवाप्रदूषण आणि जलप्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईकरांनी तातडीने प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. या शहरात राहणाऱ्या लोकांना शुद्ध आणि चांगले पाणी सध्या मिळते त्यापेक्षा अधिक काळ मिळाले पाहिजे, त्यासाठी योग्य विचार आतापासून करायला हवा. मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता लोकांना फिरण्यासाठी मोकळी जागा हवी. आता ती या गजबजलेल्या शहरात मिळणे अवघड वाटते. त्यामुळे सिंगापूरप्रमाणे इमारतींच्या वरतीच अशा मोकळ्या जागा तयार करता येऊ शकतील. सिंगापूरमध्ये तीन इमारती एकमेकांजवळ बांधून त्यांच्यामधील जागेमध्ये उंचावरच जॉगिंग ट्रॅक्स किंवा फिरण्यासाठी बागा तयार केल्या आहेत. मुंबई त्यापेक्षा वेगळी नाही. हा प्रयोग येथे शक्य आहे. या जागेला पब्लिक स्पेसही म्हणता येईल आणि त्या निमित्ताने नवा रोजगारही उपलब्ध करू शकू. उंच इमारतींच्या रुफ टॉप्सला पब्लिक स्पेसचा दर्जा मिळायला हवा.मुंबईच्या हवेतच संधीविजेच्या पुरवठ्याबाबत मुंबई नशीबवान आहे पण सौरऊर्जा हा भविष्यातील पर्याय व्हावा. या समस्यांबरोबर मला आणखी एक धोका वाटतो तो ग्लोबल वॉर्मिंगचा. ज्या पद्धतीचे भाकित ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी केले आहे, त्याचा विचार करता मुंबईला या संकटाचा धोका आहे. पुढील काही वर्षांचा विचार करुन महानगरपालिका आणि तत्सम संस्थानी मुंबईला वाचविण्याचे प्रयत्न आतापासूनच सुरु केले पाहिजेत. मुंबईत राहायचं म्हणजे तुम्हाला प्रयत्नांची आणि सतत ऊर्जेची गरज असते. ते प्रयत्न करण्यासाठी ऊर्जा आणि संधी तुम्हाला मुंबई देते. मला तर वाटतं या शहराच्या हवेतच संधी आहे. फक्त ती ओळखून तुम्हाला प्रयत्न करता आले पाहिजेत.सामाजिक जडणघडणीचा वेधजीम मेसोलस यांनी गेल्या साडेपाच दशकांमध्ये मुंबईचा अत्यंत सखोल अभ्यास केला आहे. इथल्या चाळी, मोहल्ले, सण-समारंभ, सामाजिक, राजकीय चळवळी त्यांनी जवळून पाहिल्या आहेत. मुंबईच्या सामाजिक जडणघडणीचा त्यांनी वेध घेतला असल्यामुळे आगामी पिढ्यांनाही या स्थित्यंतराचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. नागरी इतिहासाचे धागेदोरे आणि मुंबईतील लोकांमध्ये असणारे सामाजिक बंध त्यांनी आपल्या लेखनामध्ये टिपले आहेत. त्यामुळे एकूणच मुंबईतील बदल अभ्यासण्यासाठी जीम मेसोलस यांचे लेखन वाचणे अत्यावश्यक ठरते.- प्रा. मंजिरी कामत इतिहास विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ