शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

मांडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 8:30 AM

मांडूबद्दल निर्माण झालेल्या प्रेमातून साकार झालेल्या चित्र-शिल्पांचं प्रदर्शन पुण्याच्या आर्ट टू डे गॅलरीत येत्या बुधवारपासून सुरू होतं आहे. त्यानिमित्ताने या ‘पुनर्मांडणी’चा शोध...

- चंद्रमोहन कुलकर्णी

मांडूवरच्या प्रेमाची चित्रंमध्य प्रदेशच्या मांडवगड येथील परिसराच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तूंच्या ढासळलेल्या कमानी, तुटके घुमट, मोठमोठे महाल, पाणथळ जागा, जागोजागी विखुरलेले दगड, संगमरवराच्या फरश्या, तुटलेल्या खिडक्या, जाळीदार कमानी, लांबलचक भिंती, आकाशाकडे हात पसरून उभे ठाकलेले गोरखचिंचेचे वृक्ष, काटेरी झाडंझुडपं या सगळ्याच्या पुनर्मांडणीचा देखणा घाट ख्यातनाम चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी घातला आहे.. मांडूबद्दल निर्माण झालेल्या प्रेमातून साकार झालेल्या चित्र-शिल्पांचं प्रदर्शन पुण्याच्या आर्ट टू डे गॅलरीत येत्या बुधवारपासून सुरू होतं आहे. त्यानिमित्ताने या ‘पुनर्मांडणी’चा शोध...दगडादगडाखाली सापडतातइतिहासातल्या कहाण्यांच्या मजकुरामधले स्वल्पविरामआणि ढासळलेल्या एकेका कमानींखालीपरिच्छेद सुरूहोतात पत्थरांची ड्रॉप लेटर्स घेऊन.मांडू.

मध्य प्रदेशच्या इतिहासाचे जागोजागी विखुरलेले तुटके फुटके अंश. सत्ताधीशांच्या प्रेमकहाण्यांचे प्रतिध्वनी वाहतात इथले वारे. जीव दडपून जाईल असे जहाजाच्या आकाराचे महाल झोपाळ्यांचे खांब आणि हत्तींचे भलेमोठे पाय रोवून उभे इथे महाल.आकाशाकडे बाहू पसरून उभे ठाकलेले गोरखचिंचेचे महावृक्ष.वाळक्या देहाच्या काटक्याकुटक्याआणि कबरींना सोबत करतात इथे बेवारशी भटकी कुत्री.कोसळलेलं नक्षीकामफुटका उजेड उरी बाळगणारे तुटके झरोकेआणि फडफडत्या पंखांनी जुने निरोप पोहचवणारी गिर्रेदार पाखरं.खड्ड्याखुड्ड्यांच्या वळणवाटा,दगड दगड दगड दगडविटा विटा विटा विटासंगमरवराच्या भिंतीवरची,प्रियतमेच्या कपाळावरच्या झुल्फांप्रमाणे दिसणारीउर्दू लिपीतली अगम्य अक्षरं**खूप मोठ्या आकाराचं प्रचंड काहीतरीढासळल्याची भावना अंगभर पसरलेले आपणहताश होऊन बसकण मारतो एका गोरखचिंचेखालीजुन्या पाषाणाचे हुंकार ऐकू येतात आपल्याला.आपल्या हातातल्या कागदावर उमटू लागतात रेषांची भेंडोळीकाळी पांढरी काळी पांढरी.आपल्या काळापासून मैलोगणती दूर एकटे आपण.आपण पुन्हा उलगडू पाहतो इतिहासातल्या कहाण्यांचे अध्याय.इतिहासाच्या पुस्तकाची पानं उलटत उलटतस्थापत्यशास्त्राच्या एकेक पायºया उतरत उतरतआपण पोहोचतो महाप्रचंड विहिरीच्या तळाशी,थंडगार.हिरव्यागार जर्द पाण्यात विरघळून जातो तुमचा वर्तमानकाळलालतांबडे मासे कुरतडू लागतात तुमच्या हातापायांचे तळवेआणि तुमची त्वचा आणि तुमचं नावगावपत्ता.तुमचा वाहन परवाना, तुमचं क्रेडिट कार्ड, आधारकार्ड.तुटतं तुमचं नेटवर्क, वायफाय नष्ट होतं.ओळखं तुमची बरबाद होते, मातीत मिसळता तुम्ही.**तुम्ही रंगीत कागद हातात घेता,घेता तुम्ही काळी शाई आणि घेता तुम्ही पांढरी शाईपुनर्रचना करता स्थापत्यशास्त्राचीपुन्हा मांडणी करतापुन्हा न्याहाळता दगड अन् दगड मांडवगडाच्या जमिनीवरचा,ढकलत ढकलत आणता मोठमोठे आकारतुम्ही अंगाखांद्यावरनं वाहून आणताआणि पुन्हा ठेवता जागेवर,तुम्हाला हव्या असलेल्या जागेवर.भिंतीच्या भिंती उभारता तुम्ही.भिंतीच्या भिंती पाडता परत तुम्ही.एका नव्या, ढासळलेल्या शहराची पुनर्रचना करता तुम्ही.पुनर्मांडणी करता तुम्ही मांडूची,पुनर्मांडणी.मांडूची पुनर्मांडणी. 

टॅग्स :artकलाpaintingचित्रकला