जपानचं गारुड!

By admin | Published: April 2, 2016 02:38 PM2016-04-02T14:38:06+5:302016-04-02T14:38:06+5:30

जपानमध्ये सगळंच वेगळं. तिथले हवामान खाते ‘अंदाज’ सांगत नाही. पाच वाजता पाऊस पडणार म्हणजे पाच वाजताच पडणार. 5.10 ला थांबणार म्हणजे थांबणारच. सार्वजनिक ठिकाणो स्वच्छ असतात. वेळोवेळी कचरा काढलाच जातो. फुले कुणी तोडत नाहीत. तसा बोर्डही नसतो. दुकानातले ‘सेल’, जाहिराती ख-याच असतात. वस्तू उत्तमच मिळतात. दर्जामध्ये कधीही खोट नसते. सर्व गाडय़ा वेळेवर धावतात!

Japan's Garuda! | जपानचं गारुड!

जपानचं गारुड!

Next
- सुलक्षणा व:हाडकर
 
गाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी एक देश मनात कायमचाच राहील माङया, त्याचे गारुड कधी संपणार नाही!
- जपान!
फार कमी काळ राहिले मी इथे, पण तो देश माझ्या मनात, स्वभावात आणि सवयीतही भिनला आहे.
जपान म्हटले म्हणजे मला एक शब्द आठवतो : कवायी. (Kawaii)
जपानमध्ये सगळे कवायी असते. (म्हणजे ‘क्यूट’च्या जवळचे.) जशी ‘मिनी’ किंवा ‘रिलाकुमा’ (आराम करणारा पांडा) आहे तसे. 
कोणत्याही वयातील स्त्रिया तिथे बाहुलीसारख्या नाजूक असतात. नखे छान छान रंगवलेली, बोटोक्स करून चेह-याला तरु ण प्रसन्न ठेवणारी स्त्री, ऋतुमानाप्रमाणो कपडे, डोक्यावर ब्रिटिश राजघराण्यातील स्त्रियांसारख्या टोप्या, कलाकुसरीचे, पारदर्शी हातमोजे, स्टॉकिंग्ज सगळे कसे अगदी आकर्षक चित्रप्रमाणs.   
जपान आपल्यावर संस्कार करतो. तिथल्या सवयी तुम्हालाही जडून जातात. जगाच्या कोप:यात कुठेही जा, जपान तुम्हाला सोडत नाही. जपानने लावलेल्या सवयी तुमच्याबरोबर येतात, मग दुस:या देशात गोंधळ उडतो. उदाहरणार्थ सांगायचे तर-
तुम्ही वाण सामानाच्या दुकानात जाता तेव्हा तुम्हाला वाटते की जपानमध्ये वाजते तसे म्युझिक इथे का वाजत नाही? जपानमध्ये जसे प्रत्येक दुकानात वाजते तसे. 
पहिल्यांदा हेअर कट केला तर कुठल्याही पार्लरमध्ये त्यावर घसघशीत सूट का देत नाहीत? तो आवडला नाही तर पूर्ण पैसे परत का मिळत नाहीत?
घराबाहेर जाताना प्रत्येक वेळेस मुख्य दरवाजाला कुलूप का लावावे लागते? नुसते ओढून घेतले तर चालत का नाही?
 वेंडिंग मशीनमधून अंडी, दूध, न्यूजपेपर्स, पाणी अशा सगळ्या जीवनावश्यक गरजेच्या वस्तू का मिळत नाहीत? 
किचनमध्ये बोलणारे राईस कुकर, बोलणारे मायक्रोवेव्ह का नसतात?
- असे किती प्रश्न!
तुम्ही जपानमध्ये राहून आलात, की तुमच्या सवयी बदलतात.
 तुमच्या बॅगमधील अर्धी जागा तुम्ही लोकांना- ‘ओमियागे’- भेटवस्तू देण्यासाठी ठेवता. आणि त्या सर्व भेटवस्तू अत्यंत सुरेखरीत्या पॅक करता. 
जुजबी ओळख असलेल्यांशी बोलतानासुद्धा आदर व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांच्या नावाच्या पुढे ‘सान’ लावता. 
 हात मिळवतानादेखील तुम्हाला वाकावेसे वाटते. अगदी फोनवर बोलतानादेखील तुम्ही नकळत वाकता. 
 पोलीस तुम्हाला मित्र वाटतात. 
 तुमच्या सायकलवर ठेवलेले सामान लॉक करावे लागते याचा तुम्हाला वैताग येतो. कारण जपानमध्ये तुम्ही ते तसेच टाकून जात असता आणि कुणीही त्याला हात लावत नाही. 
 तुम्ही प्रवासात कॉमिक्स वाचण्याचा प्रयत्न करता. शेजारची व्यक्ती तुमच्याकडे ‘स्पेशल’ किंवा ‘मंद’ म्हणून पाहते. तुम्ही गालातल्या गालात हसून तिची गंमत करता. 
 तुमच्याकडे प्रत्येक ऋतूप्रमाणो छत्र्या असतात. आणि खूप सा-या हॅट्स. 
 सॅण्डविचमध्ये अवाकाडो, नूडल्स असणो तुम्हाला नॉर्मल वाटते. सोयाबीन अथवा ग्रीन टीची कॉफी किंवा ग्रीन टीचे आइस्क्री ीम तुम्हाला आवडायला लागते. 
तुम्हाला वज्रासनात अर्धा तास बसता येते. जमिनीवर बसणो तुमच्यासाठी सहज असते. 
जपानी स्त्रियांप्रमाणो तुम्हाला प्रत्येक वाहिनीवर खाद्यविषयक कार्यक्र म पाहायचे असतात. तुम्हाला जिथे तिथे रांगेत उभे राहण्याची सवय असते. अगदी ट्रेनच्या डब्यातसुद्धा चढताना तुम्ही अपेक्षा करता की लोक रांगेत उभी राहतील आणि शांतपणो चढतील. किंवा ट्रेन एक मिनिट जरी उशिरा आली तरी तुम्हाला चुकल्या चुकल्यासारखे वाटते. पत्ता विचारण्यासाठी तुम्ही पोलिसांना शोधता. थंडीत तुम्हाला सजिर्कल मास्क घालायचा असतो. साधी सर्दी झाली तरी तुम्ही तुमचा मास्क घालून बाहेर पडता. 
टॅक्सीचा दरवाजा आपोआप का उघडत नाही म्हणून तुम्ही चिडता. त्याच्याकडे सुटय़ा पैशांचा डब्बा कसा नाही? तो हातमोजे घालून ड्राइव्ह का करीत नाही?- असले प्रश्न तुम्हाला नकळत पडतात. 
साकुराच्या आठवणींनी तुम्ही हळवे होता. फुलांचे बहर पाहणो तुमचा आवडता छंद असतो. मग तुम्ही गुलमोहोराच्या किंवा पळसाच्या झाडाखाली उभे राहता. येणारे-जाणारे अशा नजरांनी बघतात तुमच्याकडे, की शेवटी हा भलता छंद तुम्हा आवरता घेता.  
तुम्ही तुमच्या सायकलला (मामाचारी) खूप जवळची मैत्रीण मानता. मुलांना शाळेत नेण्यापासून भाजी आणण्यासारखी अनेक कामे तुम्ही सायकलवर केलेली असतात.  
एखादी व्यक्ती उगीचच इंग्लिश बोलून आपले काम लवकर करून घेत असेल तर तुम्हाला आवडत नाही. मराठी किंवा हिंदी बोलणा:या व्यक्तींवर अन्याय होतो असे तुम्हाला वाटते. आणि तुम्हाला इंग्लिश येत असतानादेखील तुम्ही तुमच्याच मातृभाषेत बोलून डेस्कवरील माणसाला समजावता की असे वागणो अयोग्य आहे. 
रस्ता ओलांडताना चारही बाजूंना बघावे लागते त्याचे टेन्शन येते. जपानमध्ये कुणी पाहत नसले तरी किंवा रात्रीच्या वेळेस गाडय़ा नसल्या तरी गाडय़ा सिग्नलला नियमाप्रमाणो थांबतात. 
 जपानहून परतल्यावर भारतात आले की काहीतरी मिसिंग असते. हे मलाच नाही तर अनेकांना वाटते. मेयोनीज न टाकता पिझ्झा कसा खायचा हा गोंधळ उडतोच. दिवसभराच्या थकव्यानंतर ओनसेन शोधात फिरावेसे वाटते.    
गरोदर बाईला जपानमध्ये एक गुलाबी बिल्ला मिळतो. तो ती तिच्या पर्सवर लावते. त्यामुळे प्रवासात, इतर ठिकाणी तिला प्राधान्य मिळते. आपल्याकडे जोपर्यंत ती 8-9 महिन्यांची गरोदर आहे याची खात्री पटत नाही तोपर्यंत तिला चौथी सीट तरी द्यावी का, असा गहन सामाजिक प्रश्न पडतो लोकांना. तिला, ‘कितवा महिना?’ असा प्रश्नसुद्धा विचारला जातो जागा देण्याआधी.  
 वृद्ध हसतमुख असतात. सायकल चालवतात. जिममध्ये जातात. मज्जा करतात. 
प्रत्येक वस्तूचे रिसायकलिंग कसे होईल हा विचार सर्वप्रथम मनात येतो. घरातील लहानसहान शिवण-टिपणाची कामे तुम्ही स्वत:च करता. तुम्ही गृहिणी आहात हे सांगताना तुमची मान उंचावलेली असते. 
रेल्वेच्या डब्यातील 75 रुपयात गर्भपाताच्या जाहिराती पाहून जपानमधील गर्भपाताला दीड लाख द्यावे लागतात हे आठवते आणि बाळाला जन्म दिल्यास काही लाख सरकारकडून मिळतात हेसुद्धा आठवते.
आम्ही जपानहून चीनमध्ये राहण्यास गेलो. सुटीत भारतात आलो. चीनहून ब्राझीलमध्ये आलो; परंतु जपान आणि तिथल्या या सवयी जाता जात नाहीत. सामाजिक पातळीवर आम्ही काही करू शकत नाही; परंतु वैयक्तिक पातळीवर मात्र आम्ही जपानीच आहोत. आजही आमच्या वाढदिवसाला आम्ही तिघे म्हणजे माझा नवरा, लेक आणि मी जपानी सुशी खातो..आमच्या घराच्या सजावटीत जपानी मिनिमिलीझम आहे. माङया बोलण्यामध्ये जपानी माणसासारखे डीटेलिंग असते. 
जपान नावाचे गारुड जाता जात नाही हे खरे.
 
दुर्मीळ!
‘‘सार्वजनिक ठिकाणी अथवा रेल्वेस्थानकावर तुमची एखादी वस्तू हरवली तर दुस:या दिवशी ती तिथेच व्यवस्थित मिळू शकते. भारतात अशी शक्यता दुर्मीळ आहे. 
माझा आयफोन टोकियोमध्ये तीनदा हरवला होता. प्रत्येक वेळेस स्टेशन मास्तरने माझ्या घरच्या फोनवर फोन करून मला ओळखपत्रे दाखवून तो घेऊन जाण्यास सांगितले. टेलिफोन कंपनीकडून त्यांनी माझा घरचा क्रमांक मिळवला. 
सुटय़ा पैशांची माझी वेगळी पर्स आहे. बाहेर जाताना मी नेहमी 100 रु पयांची चिल्लर बरोबर नेते. ही खास जपानी माणसांची सवय!’’
 
(ब्राझीलमधील रिओ-दि-जानेरिओ येथे वास्तव्याला असलेल्या लेखिका मुक्त पत्रकार आहेत)
sulakshana.varhadkar@gmail.com

 

Web Title: Japan's Garuda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.