शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

‘ईडी’च्या जाळ्यात जीएसटी; केंद्र सरकारचं नवं परिपत्रक काय सांगतय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 10:17 AM

डीसारख्या बहुतांशी सरकारी यंत्रणा कोणत्या तरी कायद्याच्या आधारे स्थापन झालेल्या असतात, हे फार थोड्या लोकांच्या लक्षात येतं

गेल्या काही वर्षांत आपल्या सगळ्यांना माहीत झालेलं एक महत्त्वाचं सरकारी खातं म्हणजे ईडी अर्थातच सक्तवसुली संचालनालय. विषय भ्रष्टाचाराचा असो, कर्जबुडव्यांचा किंवा अगदी अमली पदार्थांशी निगडित. ईडीचं नाव त्यात येतंच येतं. 

अजित जोशी, चार्टर्ड अकाउंटंट

ईडीसारख्या बहुतांशी सरकारी यंत्रणा कोणत्या तरी कायद्याच्या आधारे स्थापन झालेल्या असतात, हे फार थोड्या लोकांच्या लक्षात येतं. आयकर खातं आयकर कायद्यानुसार, तसंच ईडी ही यंत्रणा गैर मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचे व्यवहार रोखणाऱ्या कायद्याच्या तरतुदीनुसार स्थापन झालेली आहे. बहुतांश सर्वच गुन्ह्यांत हे घडत असल्याने सगळीकडे ईडीला स्थान असणं स्वाभाविकच आहे. आपली सर्वदूर पसरलेली मुळं अधिकाधिक भक्कम करत ईडी आता जीएसटी व्यवहारावरही लक्ष ठेवणार आहे. ७ जुलैला एक परिपत्रक काढून सरकारने हे अनिवार्य केलं की, जीएसटी अधिकाऱ्यांना आता जीएसटीच्या नेटवर्कवर त्यांच्याकडे आलेली माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना गरज पडल्यास द्यावी लागेल. यात ही माहिती ईडी अधिकाऱ्यांनी मागितली तरी द्यावी लागेल आणि जीएसटी अधिकाऱ्यांना वाटल्यास ते स्वत:हूनही अशी माहिती ईडीला देऊ शकतील. याकरता कोणत्याही प्रक्रियेची किंवा करदात्याच्या परवानगीची आवश्यकता लागणार नाही. सरकारने एकूणच गुन्हेगारी आणि त्यात खासकरून आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी जे प्रयत्न चालवलेले आहेत, त्याचा हा एक भाग आहे.

खरंतर अत्यंत स्तुत्य असाच हा प्रयत्न आहे, असं वरवर पाहता वाटून जातं. मात्र, तरीही या निर्णयाचे टीकाकार खूप आहेत. त्यांच्याकडेही त्यांची काही कारणं आहेत. एकतर पीएमएलएअंतर्गत आत्तापर्यंत दाखल केलेल्या ५,९०६ तक्रारीपैकी १,१४२ प्रकरणांत चार्जशिट फाइल झालेली आहे आणि त्यातल्या अवघ्या २५ केसेसमध्ये निकाल लागलेला आहे. 

जीएसटी नोंदणी किचकटसाधी नोंदणी मुश्किल झालेली आहे. प्रक्रियेची किचकट गुंतागुंत, दगा देऊ शकणारी वेबसाइट आणि अधिकाऱ्यांना मिळालेले अनिर्बंध अधिकार याने प्रामाणिक करदाते त्रासलेले आहेत. मध्यंतरी काही सीएंना अटक झाल्यावर पहिल्यांदाच आंदोलन करण्याची वेळ सीए समुदायावर आलेली होती. 

फेक कंपन्या उघडून घाेटाळे‘पीएमएलए’मध्ये कारवाई सुरू झाली की, एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावणे, अटक, मालमत्ता गोठवणे असे अनेक मार्ग ईडीला वापरता येतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी गुन्हा सिद्ध होण्याची आवश्यकता नाही. 

थोडक्यात सरकारी यंत्रणेला एखाद्या व्यक्तीला त्रास देण्याचं हत्यार म्हणून पीएमएलए हा कायदा प्रभावीपणे वापरता येतो आणि तसा तो वापरला जातो आहे, असा आरोप आहे. 

दुसरीकडे जीएसटी आणून सहा वर्षांहून अधिक काळ गेला तरी त्या कायद्याच्या अंमलबजावणीतल्या अडचणी संपलेल्या नाहीत. गेल्या वर्षभरातच फेक कंपन्या उघडून शेकडो कोटी रुपयांचे घोटाळे जीएसटीमध्ये झालेले आहेत. 

साहजिकच आता ईडीच्या कक्षेत हे सगळं आलं तर त्याचा गैरवापर तर होणार नाही ना? अधिकारी अधिक मुजोर होणार नाहीत ना? मुद्दाम किंवा अज्ञानातून त्यांचे गैरअर्थ काढून आपल्याला सतावणार नाहीत ना, या प्रश्नांनी करदाते चिंतेत आहेत.  

देशात होणारे जवळपास सर्व व्यवहार जीएसटी नेटवर्कवर नोंदलेले आहेत. ईडीच्या धडाकेबाज कारवाईने गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचार किती कमी झाला? आर्थिक गुन्हे किती घटले? आणि गुन्हेगारांना किती शिक्षा झाली, ही सर्व माहिती उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळेल. 

टॅग्स :GSTजीएसटीGST Officeमुख्य जीएसटी कार्यालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय