शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

मूल्यशिक्षणाचा आनंदी आणि कृतिशील प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 1:00 AM

कुठलीही जोरजबरदस्ती करून मूल्यशिक्षण देता येत नाही. त्यासाठी हवं मुक्त वातावरण आणि संधी. हाच दृष्टिकोन समोर ठेवून शांतिलाल मुथ्था फाउण्डेशननं मूल्यवर्धन कार्यक्रमाची आखणी केली. नवनवीन संकल्पनांचा वापर केला. या बालस्रेही प्रयोगानं असंख्य शाळांमधील हजारो विद्यार्थी मूल्यशिक्षणाचे धडे स्वत:हून गिरवताहेत.

- रमेश पानसे

मूल्ये शिकवली जात नाहीत, तसेच ती लादताही येत नाहीत. मुक्त वातावरणातून मुले मूल्ये शोषून घेत असतात. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असते. या संधी दिल्या तर मुले त्या आनंदाने स्वीकारतील, वापरतील आणि त्यांतून आपोआपच त्यांच्यामध्ये समाजहिताची मूल्ये रुजतील. या विश्वासाने आणि विद्यार्थी प्रत्यक्ष कृतिशील अनुभवातून चांगले आणि वाईट याचा निर्णय स्वत: घेऊ शकतील, हा दृष्टिकोन समोर ठेवून, महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते शांतिलाल मुथ्था यांनी, २००९ सालापासून, बीड जिल्हा परिषदेच्या ५०० शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्र माची प्रायोगिक; पण हेतुपूर्ती करणारी अशी अंमलबजावणी केली. यासाठी त्यांनी डी.एड. झालेल्या स्थानिक व्यक्तींची खासगी शिक्षक म्हणून पगारावर नियुक्ती केली. या शिक्षकांना वेळोवेळी मूल्यशिक्षणाचे प्रशिक्षण दिले आणि प्रत्यक्ष शाळांमधून ३५००० विद्यार्थ्यांपर्यंत, सातत्याने, विविध उपक्र मांद्वारे मूल्यवर्धन यशस्वीपणे पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरवर्षी अनुभवाने मूल्यवर्धन अभ्यासक्र मात आवश्यक वाटतील असे बदलही करण्यात आले. हा अनुभव विद्यार्थ्यांच्या मूल्यवर्धनाच्या दिशेने, नव्याने पावले टाकता येतील असे वाटावे, इतका समर्थ होता. सहा वर्षांच्या या कालावधीमध्ये ‘एनसीइआरटी’, केंब्रिज युनिव्हर्सिटी व अमेरिकेतील काही तज्ज्ञ यांच्याकडून या कार्यक्र माचा काय प्रभाव पडला याचे मूल्यांकन करून घेण्यात आले. ज्या शाळांमध्ये मूल्यवर्धन चालू आहे, अशा शाळांमधील विद्यार्थी व ज्या शाळांमध्ये मूल्यवर्धन चालू नाही, अशा शाळांमधील विद्यार्थी असे तुलनात्मक सर्वेक्षण उपक्रमाच्या सुरुवातीला व शेवटी करण्यात आले. मूल्यवर्धन चालू असलेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल घडल्याचे, तीनही संस्थांच्या निष्कर्षांतून आढळून आले.तसेच या संस्थांनी आपल्या अहवालांतून या कार्यक्र माला आणखी प्रभावी करण्यासाठी काही शिफारशीही केल्या, ज्यांच्या आधारे, कार्यक्रमात सुधारणा करण्यात आल्या.

भारतातील नागरिकांना मूल्यांचा खूप मोठा वारसा राज्यघटनेने दिला आहे. शांतिलाल मुथ्था फाउण्डेशनने नव्याने आखलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचाही हा गाभा आहे. भारताच्या राज्यघटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार व आकलनशक्तीनुसार संधी उपलब्ध करून देणे, हा या कार्यक्र माचा हेतू आहे. शिक्षण हक्क कायदा २९(२) मध्ये भारताच्या राज्य घटनेतील मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिलीपासून बालस्नेही, आनंददायी आणि भीतीमुक्त वातावरणात रुजावी असे म्हटले आहे. वास्तविक पाहता, २००५ सालचा ‘राष्ट्रीय अभ्यासक्र म आराखडा’ तसेच महाराष्ट्र राज्याचा २०१० सालचा अभ्यासक्र म आराखडा यांमधून ही सर्व घटनात्मक मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करीतच आहेत. याच प्रयत्नांना पूरक असा बदल, नव्या मूल्यवर्धन कार्यक्रमात करून विद्यार्थ्यांना विविध उपक्र मांद्वारे, प्रत्यक्ष अनुभव घेऊन तसेच ज्ञानरचनावादी अध्ययन पद्धतीचा उपयोग करून, मुले मूल्यांशी जवळीक साधतात. विद्यार्थिकेंद्रित शिक्षणपद्धतीमधून जोडीचर्चा, गटचर्चा, सहयोगी खेळ, सहयोगी रचना अशा नवीन संकल्पनांचा वापर करून मुख्यत: आनंदमय अनुभवांकरवी, मूल्ये रु जविण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

शांतिलाल मुथ्था फाउण्डेशनने, आपल्या सहा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवांनंतर व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या शिफारशींवर आधारित मूल्यवर्धनचा सुधारित आराखडा २०१५मध्ये तयार केला. महाराष्ट्र सरकारने मूल्यवर्धनचा सुधारित आराखडा, शिक्षक उपक्र म पुस्तिका, विद्यार्थी उपक्रम पुस्तिका, शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका या सर्व संचांचे, तज्ज्ञ व्यक्तींमार्फत अवलोकन व निरीक्षण करून, त्यांमध्ये आवश्यक ते बदल सुचवून मूल्यवर्धन हा ‘महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम’ म्हणून स्वीकारला. त्याचबरोबर खास या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या, मूल्यवर्धन आराखडा व कृती पुस्तिकांना मंजुरी देण्यात आली. मागील वर्षभरात महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यातील ६३ केंद्रांमध्ये ३७००० विद्यार्थ्यांपर्यंत, राज्य शासनाने हा उपयुक्त कार्यक्रम पोहचविला आहे. या वर्षभरात, विद्या प्राधिकरण व शांतिलाल मुथ्था फाउण्डेशन यांनी संयुक्तपणे, तज्ज्ञ व्यक्तींच्या नियुक्त्या करून, दोन वेळा सर्व जिल्ह्यांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे अवलोकन करण्यात आले. शांतिलाल मुथ्था यांनी स्वत: सर्वच्या सर्व, म्हणजे ३४ जिल्ह्यांचा दौरा करून आपल्या निरीक्षणांचा आणि अनुभवांचा स्वतंत्र अहवालही प्रसिद्ध केला आहे.

काही जिल्ह्यांत शिक्षकांनी मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकांच्या स्वखर्चाने फोटोप्रति काढून, केंद्रातील इतर शाळांमध्ये स्वप्रेरणेने मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू केल्याचे दिसून आले. मूल्यवर्धनचे उपक्रम हे सध्या तरी इयत्ता पहिली ते चौथीसाठी तयार करण्यात आले असले, तरी अनेक शिक्षकांनी मूल्यवर्धनच्या संकल्पनांचा वापर इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत तसेच इतर विषय शिकवताना, यशस्वीपणे केल्याचे दिसून आले. ठाणे जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागामध्ये गावातील लोकांनी स्वत: लोकवर्गणीतून गावातील शाळेला आतून व बाहेरून चक्क मूल्यवर्धनचा विशिष्ट असा रंग दिल्याचे दिसून आले.

नांदेड जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या ज्या शिक्षकांनी मूल्यवर्धनचे मराठीत प्रशिक्षण घेतले आहे, त्यांनी मूल्यवर्धन उपक्रमांचे उर्दूमध्ये भाषांतर करून, स्वत: उर्दू शाळेतील मुलांकडून कृती करून घेतल्या आहेत. हे सर्व पाहून मूल्यवर्धन उर्दू भाषेत असण्याची गरज, नांदेड येथील शिक्षक श्री. अब्दुल कादीर यांनी लक्षात घेतली आणि मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिका व मार्गदर्शक पुस्तिकांचे उर्दूमध्ये भाषांतर केले. श्री. कादीर यांनी केलेले उर्दूचे भाषांतर पाहून, त्यांना पुणे येथे आमंत्रित करून संपूर्ण मूल्यवर्धन उपक्रमातील प्रत्येक इयत्तेसाठी शिक्षक उपक्रम पुस्तिका, विद्यार्थी उपक्रम पुस्तिका तसेच शिक्षक संदर्भ पुस्तिका या सर्वांचे उर्दू भाषांतर त्यांचेकडून करवून घेऊन, ते विद्या प्राधिकरणाकडून मंजूर करून घेण्यात येत आहे. तसेच हे सर्व साहित्य इंग्रजीतही अनुवादित करण्यात आले आहे. म्हणजेच आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी मूल्यवर्धन सज्ज झाले आहे. शांतिलाल मुथ्था यांनी यावर्षीच्या अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करून, कार्यक्रमाला काटेकोर अशा तंत्रज्ञानाची जोड दिली आहे.

गेली सात वर्षे बीड जिल्ह्यात मूल्यवर्धन कार्यक्रमासाठी सतत कार्य करीत असलेल्या खासगी शिक्षकांना, यासंदर्भातील प्रशिक्षण देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील १०७ तालुक्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. याची संपूर्ण बांधणी व आखणी तंत्रज्ञानावर आधारित करण्यात आली असून, मोबाइल अ‍ॅपमध्ये ‘सेल्फ लर्निंग मोड्युल’ची सोय करण्यात आली आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा रचनावादी आणि त्याचबरोबर डिजिटल होत चालल्या आहेत व दुसरीकडे मूल्यवर्धनचे ‘सेल्फ लर्निंंग मोड्युल’ या दोघांचा संगम होऊन आता, शिक्षकांच्या हाताशी आले आहे.

पुढील पिढी सुशिक्षित, सुसंस्कृत व मूल्यनिष्ठ होईल, अशी मला आशा वाटत आहे. मी गेली चार वर्षे या कामी श्री. शांतिलाल मुथ्था यांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. ज्ञानप्रबोधिनीने या कार्यक्र माचे पायाभूत सर्वेक्षण केले असून, संशोधन, अनुभव व नेटके नियोजन यांवर आधारित असा हा कार्यक्रम, संपूर्ण देशाला वरदान ठरेल असा मला विश्वास वाटतो. याचे एक कारण असेही आहे की, महाराष्ट्राबाहेर गोमंतक राज्यातही हा कार्यक्रम रुजू लागला आहे.

मूल्यवर्धन ही अल्पवयीन मुलांमध्ये ज्या काळात त्यांच्या मेंदू वेगाने विकसित होत असतो, ज्या वयात नव्या गोष्टी शिकण्याच्या ऊर्मी प्रखर असतात आणि ज्या वयात नेमकेपणाने मूल्ये रुजू शकतात, त्याच वयात त्यांना मूल्यवर्धनच्या आनंदी व कृतिशील संधी प्राप्त होत आहेत. त्याचे स्वागतच केले पाहिजे.

प्रयोग देशभरात नेण्याचे स्वप्नमूल्यवर्धन कार्यक्रमाची उपयुक्तता हेरून, या वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी मूल्यवर्धनच्या विस्ताराची चांगलीच तयारी केली आहे. १०७ तालुक्यातील २० हजार शाळांमधील १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत मूल्यवर्धन घेऊन जाण्याचा निर्णय, महाराष्ट्र शासनाने घेतला. मुख्यमंत्र्यांनी स्वत: पाच मिनिटांची चित्रफीत तयार करून, मूल्यवर्धनची संकल्पना व उपयोगिता जनतेसमोर मांडली. येत्या दोन वर्षात महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन घेऊन जाण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. तसेच हा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी करून देशभरात घेऊन जाण्याचे स्वप्नही त्यांनी, या चित्रफितीमध्ये व्यक्त केले आहे. या १०७ तालुक्यांत नागपूर, पुणे, नंदुरबार व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील सर्व तालुके समाविष्ट करण्यात आले असून, उर्वरित जिल्ह्यांतील १-२-३ अशा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.