शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

दाऊदचं 'डिप्रेशन'...दाऊद सध्या नैराश्याने ग्रासला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 5:00 AM

सुमारे चाळीस वर्षे झाली, तरी दहशत कायम असलेला दाऊद इब्राहिम सध्या नैराश्याने ग्रासला आहे. कारण? त्याच्या एकुलत्या एका मुलाने बापाच्या प्रचंड साम्राज्याकडे पाठ फिरवून विरक्ती स्वीकारली आहे. मोईन नवाज दाऊद कासकर सध्या मौलवी झाला असून, त्याने बापाशी संबंध तोडले आहेत. आधीच निद्रानाशाने ग्रासलेला दाऊद आता नैराश्याने खंगू लागला आहे. नियतीने असा विचित्र सूड उगवलेल्या दाऊदच्या उत्कर्षाची, ...आणि अवनतीची विलक्षण कहाणी!

रवींद्र राऊळ

दाऊद इब्राहिमच्या भारतासह डझनाहून अधिक देशांमध्ये पसरलेल्या अवाढव्य गुन्हेगारी साम्राज्याचा वारस कोण, या प्रश्नाने सध्या मुंबईच्याच नव्हे तर देशभरातील अंडरवर्ल्डमध्ये उलथापालथ केली आहे.दाऊद इब्राहिमबाबत कोणती ना कोणती बातमी येत नाही, असा दिवस नव्वदच्या दशकापासून आजवर उजाडलेला नाही.. कधी त्याला दुबईतून फरफटत मुंबईत आणू, असा गृहमंत्र्याचा इशारा, कधी त्याच्या मुलीचं लग्न, कधी त्याच्या मालमत्तेचा लिलाव, कधी दाऊदला भारतात आणण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची सेटलमेंट सुरू असल्याचा राज ठाकरेंचा आरोप, कधी त्याला कोणत्या राजकारण्याने फोन केले, याच्या चर्चा तर कधी मुंबईत दाऊदला पुन्हा स्फोट घडवायचेत... यासंदर्भाच्या काही ना काही बातम्या प्रसारमाध्यमातून नेहमीच येत असतात; मात्र अगदी अलीकडेच आलेल्या एका बातमीनं साºयांचंच लक्ष वेधून घेतलंय.‘दाऊदचा एकतीस वर्षीय मुलगा मोईन नवाज दाऊद कासकर आपल्या बापाच्या गुन्हेगारी कारवायांबाबत नाराज असून, तो मौलवी झाला आहे. इतकंच नाही तर कराचीतील क्लिफ्टन परिसरातील बंगल्याला रामराम ठोकून मशीद चालकांनी दिलेल्या घरात त्याने आपली पत्नी आणि तीन मुलांसह वेगळी चूल मांडलीय. धर्मग्रंथ कुराणाचं पठण करणं आणि तरुण मुलांना धार्मिक आचरणांचे धडे देणं हाच त्याचा सध्याचा दिनक्रम आहे. मुलाच्या अशा वागण्याने देशोदेशी पसरलेल्या आपल्या गुन्हेगारी साम्राज्याचा प्रचंड मोठा व्याप यापुढे कोण सांभाळणार, या विवंचनेत असलेल्या दाऊदला नैराश्यानं ग्रासलंय’, हे वृत्त मुंबईच्या अंडरवर्ल्डसाठी सध्या कमालीचं कुतुहलाचं आणि औत्सुक्य निर्माण करणारं ठरलंय. खुद्द दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर यानेच ही हकीगत पोलिसांना सांगितली आहे.वयाच्या चौदाव्या वर्षी टेमकर मोहल्ल्यात रस्त्यावर पैसे मोजत असलेल्या इसमाचे पैसे घेऊन पलायन करणाºया दाऊदने गेल्या चाळीस वर्षांत आपल्या टोळीची उलाढाल अब्जवधींच्या घरात नेत अमाप संपत्ती गोळा केली. दोन वर्षांपूर्वी दाऊदची ज्ञात मालमत्ता ६.७ दशकोटी अमेरिकन डॉलर्स इतकी होती, असं सांगण्यात येतं. केवळ कोलंबियाचा ड्रग्ज स्मगलर पाब्लो इस्कोबार हा त्याच्या पुढे होता. १९८९ साली पाब्लोची मालमत्ता होती ९ दशकोटी अमेरिकन डॉलर्स. पण माहितगारांच्या अंदाजानुसार नंतरच्या काळात दाऊदनं पाब्लोलाही मागे टाकलं असावं.चाळीस वर्षांच्या गुन्हेगारी कारकिर्दीत काळ्या कमाईचं इतकं मोठं साम्राज्य उभारणाºया दाऊदच्या मुलाने विरक्ती येऊन या साम्राज्याकडे पाठ फिरवावी, हा नियतीनेच त्याच्यावर उगवलेला सूड म्हणावं लागेल.

(लेखक संज्ञापन आणि माध्यमतज्ञ आहेत.) 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिम