शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

जन्मदिन भारतीय सर्कसचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 7:00 AM

२६ नोव्हेंबर १८८२ रोजी विष्णुपंत छत्रे यांच्या पहिल्या सर्कसचा शो म्हणजे भारतीय सर्कसचा जन्म होय. नुकताच भारतीय सर्कसचा हा जन्मदिन साजरा झाला. त्यानिमित्त..

प्रवीण तरवडे-  

भारतात सर्कस तुलनेने उशिरा सुरू झाली. १८८०-८१च्या सुमारास चर्नी विल्सन या इंग्रज कलाकाराने ‘हर्मिस्टन सर्कस’ मुंबईतील बोरीबंदर येथे सुरू केली. ती सर्कस बघण्यास जव्हार, कुरुंदवाड संस्थानिक सहकुटुंब मुंबईस आले होते. त्यांच्यासमवेत अश्वविद्येत पारंगत विष्णुपंत छत्रेदेखील होते. सर्कशीतील चर्नी विल्सनने केलेल्या घोड्यांवरील कसरती बघून सारेच अचंबित झाले. या वेळी काहीशा आढ्यतेने चर्नी विल्सन म्हणाले, की ‘घोड्यावरील अशा कसरती कुणाही भारतीयाला करता येणे शक्य नाही.’ हे ऐकताच प्रखर देशभक्त असणारे विष्णुपंत छत्रे यांच्यातील राष्ट्राभिमान जागा झाला आणि अवघ्या ६-७ महिन्यांत जमवाजमव करून त्यांनी मुंबईत क्रॉस मैदान येथे तंबू उभारून आपली ‘ग्रँड इंडियन सर्कस’ सुरू केली. या सर्कसमधील २ सिंंह, भारतमाता उभी असणारा रथ ओढत आणतात याला प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळायचा. स्वत: विष्पुपंत छत्रे यांच्या घोड्यांवरील कसरतीदेखील दिलखेचक होत्या. हळूहळू विष्णुपंत यांची सर्कस तुफान चालू लागली आणि काही महिन्यांतच बंद पडत चाललेली चर्नी विल्सनची सर्कस त्यांनी आपल्या सर्कसमध्ये सामावून घेतली. १८८२मध्ये २६ नोव्हेंबर रोजी विष्णुपंत छत्रे यांच्या पहिल्या सर्कसचा शो म्हणजे भारतीय सर्कसचा जन्म होय.त्यानंतर ४०-५० वर्षे सर्कसची महाराष्ट्रीय परंपरा जोमाने फोफावली. यामध्ये देवल सर्कस, भीमराव पाटील सर्कस, माळी सर्कस, कार्लेकर सर्कस, वालावलकर सर्कस, शेलार सर्कस अशा अनेक सर्कशींनी मोठे नाव कमावले. यामध्येही स्वत: सर्कस मालक व त्यांचे कुटुंबीय हे सर्कसचे कलावंत म्हणून काम करीत.  पूर्वी मराठी कलावंतांचे वर्चस्व असणाऱ्या भारतीय सर्कसमध्ये आता केरळ, नेपाळ आणि पश्चिम बंगाल येथील कलावंतांचे वर्चस्व आहे. संपूर्ण जगात सर्कसमध्ये प्राण्यांचे खेळ करण्यास प्रोत्साहन मिळत असताना १५-२० वर्षांपासून सर्कसमध्ये वाघ, सिंह, अस्वल, चिम्पांझी, हिप्पोपोटॅमस यांचा खेळ करण्यास आपल्याकडे मात्र बंदी आहे. सर्कसचं आकर्षण त्यातून एकदम कमी झालं. वास्तविक, हे फिरते प्राणिसंग्रहालायच होते; पण आता आकर्षण असणारे हे प्राणी नसल्यामुळे आणि मनोरंजनासाठी सिनेमा व टीव्ही चॅनेल्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यामुळे आपल्याकडे सर्कस रोडावत गेली.एखाद्या संगीतरजनीची तिकिटे ५ हजार रुपये असली, तरी खपतात. सर्कसचे सर्वाधिक तिकीट ४०० रुपये व सर्वांत कमी ५० रुपये असते. पगार, कलावंत व स्टाफचे नाष्टा, जेवणपाणी, औषधोपचार सारे मॅनेजमेंटला करावे लागते. वीज खंडित होऊ नये, यासाठी संपूर्ण सर्कस शो जनरेटरच्या विजेवर होतो. डिझेल महागल्याने हा खर्च व ट्रान्सपोर्टचा खर्च वाढतो. पावसाळ्यात सर्कस डबघाईला आलेली असते. म्हणजे पावसाळा सोडून उर्वरित ८ महिनेच उत्पन्न असते. खर्च मात्र १२ महिने! शहरांमध्ये मध्यवर्ती भागात माफक दरात मैदाने मिळत नाहीत. या साºयांतून छोट्या व मध्यम सर्कशी लयास जात राहिल्या. एका अंदाजानुसार आपल्या देशात सध्या २८ ते ३० मोठ्या सर्कशी आहेत. यापुढे सर्कस उद्योगाला भरभराट यावी, असे वाटत असेल तर शासकीय पातळीवर सर्कशींना मदत होणे गरजेचे आहे. शहरांमध्ये मध्यवर्ती भागात अथवा नदीपात्रे, मैदानात नाममात्र भाड्याने मैदान उपलब्ध करून देणे, एसटी व रेल्वे प्रवासात सर्कस कलावंत व स्टाफला सवलत देणे, सवलतीच्या दरात वीजपुरवठा करणे, सर्कस कलावंत व स्टाफला शासकीय पेन्शन देणे, सर्कस महोत्सव भरवणे अशा अनेक बाबी शासन करू शकते.  हे सर्व घडल्यास आपल्या देशातील सर्कसला खºया अर्थाने भरभराटीचे दिवस येतील आणि सर्कसची अशी भरभराट व्हावी, हे माझ्याप्रमाणे आपल्यालाही वाटत असेल, अशी मी अपेक्षा करतो. भारतीय सर्कसच्या जन्मदिनानिमित्त सर्कस कलावंत, स्टाफ सर्कशीतील प्राणी आणि सर्वांचा लाडका विदुषक यांना मी शुभेच्छा देतो.(लेखक पुण्यातील सर्कस मित्र मंडळाचे सचिव आहेत) 

                    

टॅग्स :Puneपुणे