बिंज वॉचिंग - झुकू नका, ‘ताठ' राहा! - कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 10:49 AM2022-11-12T10:49:52+5:302022-11-12T10:50:02+5:30

बिंज वॉचिंग करताना स्क्रीनसमोर 'डोळे वटारून' बसताना आपल्या आरोग्याचे कसे तीन तेरा वाजतात

Binge Watching Don't lean in stay stiff How | बिंज वॉचिंग - झुकू नका, ‘ताठ' राहा! - कसं?

बिंज वॉचिंग - झुकू नका, ‘ताठ' राहा! - कसं?

googlenewsNext

बिंज वॉचिंग करताना स्क्रीनसमोर 'डोळे वटारून' बसताना आपल्या आरोग्याचे कसे तीन तेरा वाजतात, हे आपण मागच्या भागात पाहिलं. विनाव्यत्यय एकामागोमाग एक अनेक शोज, सिरीज पाहाणं आपल्याला सोयीचं वाटत असलं, तरी हे एक प्रकारचं व्यसन आहे. त्यातून वेळीच बाहेर पडणं आपल्याला जमलं पाहिजे.

स्क्रीन पाहाण्याचं हे प्रमाण मर्यादेत असेल तर ठीक, पण बऱ्याचदा आपल्याला त्याचं भानच राहत नाही. जेव्हा आपण आपल्या जबाबदाऱ्या टाळायला लागतो, आपली कामं पुढे ढकलायला लागतो, कुटुंब आणि मित्रांबरोबर घालवण्याचा वेळही या बिंज वॉचिंगमध्ये जायला लागतो, तेव्हा समजायचं, आपलं स्क्रीन पाहाणं आता व्यसनाकडे वळू लागलं आहे. त्याच्यापुढे झुकण्याऐवजी पण 'ताठ' राहिलं पाहिजे.

बिंज वॉचिंग कसं आणाल नियंत्रणात?
१. स्वत:वर नियंत्रण ठेवा
कुठलेही शोज, सिरीज पाहण्याच्या आधीच मनाशी ठरवून ठेवा, मी आज एक किंवा दोन एपिसोड पाहणार आहे. तेवढं झालं की लगेच आपला स्क्रीन ऑफ करा आणि दुसरी कुठलीही कृती करा.

२- वेळेवर नियंत्रण ठेवा
दुसरा प्रकार म्हणजे आपण किती वेळ एपिसोड्स पाहणार आहोत, त्या वेळेवर नियंत्रण ठेवा. त्यासाठी अलार्म किंवा टायमर लावून ठेवा. बेल वाजली की स्टोरी कितीही रंगात आलेली असली, तरी स्क्रीनपासून लांब व्हा.

३. समतोल ठेवा
स्क्रीन पाहाणं आणि आपल्या इतर कृती यात समतोल राखा. तुम्ही स्क्रीन पाहत असाल तरीही वाचन, व्यायाम,
छंद, मित्र, कुटुंब यांच्यासोबतचा वेळ अवश्य राखून ठेवा.

४- स्क्रीनला 'सामाजिक' वळण द्या
आपल्याला सिरीज वगैरे पाहायच्या असतील, तर त्यासाठी शक्यतो आपले मित्र, नातेवाइक यांनाही त्यात सामील करा. वेळ ठरवून घ्या. त्यांच्यासोबतचं मनोरंजन तुम्हाला अधिक आनंद देऊन जाईल आणि स्क्रीनच्या वापरावरही मर्यादा राहील.

५. झोपेची वेळ लक्षात ठेवा
मनोरंजन करीत असताना आपल्याला झोपायचं आहे, झोपण्याची वेळही आहे, हे लक्षात ठेवा. मनोरंजनाच्या नादात झोपेला दांडी मारू नका. केव्हा झोपायचं यासाठी अलार्म लावा. त्यावेळी आपला स्क्रीनही झोपला पाहिजे.

Web Title: Binge Watching Don't lean in stay stiff How

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.