शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कलेजा खल्लास झाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:51 IST

पाणी-पुरी कुठे खायची याचे खवय्यांचे काही निकष आहेत. मुख्य निकष म्हणजे पाणी-पुरी कुठे खायची? तर तशी ती कुठेही खाल्ली तरी चालते पण तरी पाणी-पुरीवाल्याकडे गेल्यावर त्याने पुरी कुठून आणली? असा प्रश्न आवर्जून विचारायचा. जर पुरी तो स्वतःच बनवत असेल तर तो अस्सल पाणी-पुरीवाला आहे, असे समजावे. 

मनाेज गडनीस -आ पला मूड आनंदी असो वा खिन्न, अशा दोन्ही वेळी उत्साहाची पेरणी करणारा जर कोणता पदार्थ असेल तर फक्त पाणी-पुरी ! त्यामुळेच कलेजा खल्लास करणारी ही पाणी-पुरी खवय्यांसाठी नेहमीच पसंतीची मानकरी ठरली आहे. रंजक चवीच्या पाणी-पुरीच्या उगमाबद्दल काही वाद आहेत. मौखिक इतिहासानुसार महाभारत काळात द्रौपदीने याचा शोध लावल्याची आख्यायिका आहे. मात्र, उपलब्ध लिखित नोंदीनुसार या पदार्थाचे मूळ १९ व्या शतकाच्या शेवटी सापडते. रोजीरोटीच्या शोधार्थ एका राज्यातील लोक दुसऱ्या राज्यात जाऊ लागले, तेव्हा झालेल्या सांस्कृतिक अभीसरणात त्या लोकांनी आपल्या अन्नपदार्थांच्या विक्रीतून ते पदार्थ तिथल्या मातीत रुजविले. यात सर्वात लोकप्रिय पदार्थ ठरला तो ‘पाणी-पुरी’. पाणी-पुरी या पदार्थाचा उगम हा उत्तरप्रदेशात झाला. तेथील ‘राजकचोरी’ पदार्थातून याची उत्पत्ती झाली. कचोरी सारखीच लहानशा आकाराची पुरी अन् कचोरीसोबत दिल्या जाणाऱ्या चटण्या त्यात मिसळत सर्वप्रथम हा पदार्थ बनला. सुरुवातीला चटण्यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या पाणी-पुरीवर कालौघात असंख्य प्रयोग झाले आणि आज रगडा, उकडलेले मूग-मटकी, बटाटा, खारी बुंदी, चाट मसाला, सोबत चिंच-खजुराचे पाणी अन् मिरची-पुदिना पाणी अशा स्टँडर्ड पद्धतीवर येऊन स्थिरावला आहे. पाणी-पुरी कुठे खायची याचे खवय्यांचे काही निकष आहेत. मुख्य निकष म्हणजे पाणी-पुरी कुठे खायची? तर तशी ती कुठेही खाल्ली तरी चालते पण तरी पाणी-पुरीवाल्याकडे गेल्यावर त्याने पुरी कुठून आणली? असा प्रश्न आवर्जून विचारायचा. जर पुरी तो स्वतःच बनवत असेल तर तो अस्सल पाणी-पुरीवाला आहे, असे समजावे. 

लॉकडाऊनमधे अनेक लोकांनी आपापले आवडते स्ट्रीट फूड घरी बनविण्याचा घाट घातला. गुगलच्या सर्वेक्षणानुसार सर्वात जास्त सर्च झालेली रेसिपी होती पाणी-पुरीची.

पाणीपुरीचे अर्थकारणखाद्य-उद्योगाच्या ढोबळ गणितानुसार, सर्व खर्च वगळून होणाऱ्या नफ्याचे प्रमाण हे कमाल १०० टक्के आहे. याच गणितात पाणी-पुरीच्या नफ्याचे प्रमाण हे १०० टक्क्यांच्या श्रेणीतील आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांतील कोणत्याही प्रसिद्ध पाणी-पुरी स्टॉलवर दिवसाकाठी किमान पाचशे ते कमाल दोन हजार प्लेटपर्यंत पाणी-प्लेटची विक्री होते. स्टॉलनुसार किंमत २० रुपये ते ६० रुपयांच्या घरात आहे. चाट गाडीवरील या एका पदार्थाद्वारे विक्रेत्याचे उत्पन्न हे ६० हजार रुपयांच्या आसपास आहे. 

पदार्थ एक, नावे अनेक उत्तरीय राज्यांत ‘गोलगप्पे’, महाराष्ट्रात ‘पाणी-पुरी’, पंजाब-हरियाणामधे ‘पाणी-पताशी’, मध्यप्रदेशात ‘फुलकी’, गुजरातेत ‘पकोडी’, प. बंगाल, बिहारमधे ‘पुचका’, आसामात ‘पुष्का’, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा-आंध्रप्रदेशात ‘गुपचूप’ अशा नावाने पाणी-पुरी प्रसिद्ध आहे.  

टॅग्स :foodअन्न