मालेगाव येथे मुख्य इदगाह मैदानावर बकरी ईदचे नमाज पठण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 13:25 IST2022-07-10T13:25:02+5:302022-07-10T13:25:40+5:30

ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे मनपाचा कायमस्वरूपी एक व चौदा तात्पुरते कत्तलखाने उभारण्यात आले होते.

Recitation of Namaz of Eid al-Adha on the main Idgah ground at Malegaon | मालेगाव येथे मुख्य इदगाह मैदानावर बकरी ईदचे नमाज पठण

मालेगाव येथे मुख्य इदगाह मैदानावर बकरी ईदचे नमाज पठण

मालेगाव (नाशिक) : ईद -उल – अजहा अर्थात बकरी ईदचा सण रविवारी (दि.१०) साजरा करण्यात आला. कॅम्प राेडवरील मुख्य इदगाह मैदानावर सकाळी आठ वाजता ईदची नमाज पठण केली गेली. शहरातील विविध इदगाह मैदान व मशिदींमध्येही नमाज पठणाचे नियाेजन करण्यात आले होते.

ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे मनपाचा कायमस्वरूपी एक व चौदा तात्पुरते कत्तलखाने उभारण्यात आले होते. जामा मशिदीचे पेश इमाम तथा आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल हे हज यात्रेला गेल्याने माैलाना इम्तियाज इकबाल मिल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत  नमाज पठण करण्यात आले.

Web Title: Recitation of Namaz of Eid al-Adha on the main Idgah ground at Malegaon