मालेगाव महापालिकेत युती करावी की नाही याबाबत बरेच दिवस घोळ सुरू होता. मात्र, जागा वाटपाच्या मुद्यावरून अखेर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांनी उणे-दुणे न काढता पक्षाच्या उमेदवारांसाठी कामाला लागा. लोकसभेत आपण ऐनवेळी मागे पडलो होतो आता महापालिकेत सर्वांनी एकत्रितपणे लढायचे आहे, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.
मालेगाव निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा रविवारी (दि.४) भाजपने जाहीर सभेने केला. संगमेश्वर परिसरातील माळी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या प्रचारसभेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाजन यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून पक्षातील सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. प्रचारसभेला भाजपचे सर्व उमेदवार, जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, सुनील गायकवाड, प्रमोद बच्छाव, प्रसाद हिरे, अद्वय हिरे, लकी गील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
नागरी विकासासाठी निवडणूक महत्त्वाची : चव्हाण
सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेसाठी असून त्या कोणत्याही धर्म वा जातीच्या चौकटीत अडकलेल्या नाहीत, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. भाजप सर्वसमावेशक विचारधारेवर काम करत असून, जिथे पात्र व इच्छुक उमेदवार उपलब्ध असतील, तिथे संधी देणे हेच पक्षाचे धोरण असल्याचे चव्हाण यांनी यावेळी म्हटले.
Web Summary : Girish Mahajan urges unity for Malegaon Municipal Corporation elections after past setbacks. BJP begins campaign, emphasizing inclusive development irrespective of religion or caste. Ravindra Chavan highlights party's commitment to opportunities for deserving candidates, urging collective effort.
Web Summary : गिरीश महाजन ने मालेगांव महानगरपालिका चुनाव के लिए एकजुट होने का आग्रह किया। भाजपा ने धर्म या जाति की परवाह किए बिना समावेशी विकास पर जोर देते हुए अभियान शुरू किया। रविंद्र चव्हाण ने योग्य उम्मीदवारों को अवसर देने की पार्टी की प्रतिबद्धता पर प्रकाश डाला।