Malegaon: मालेगावमध्ये उपमापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 11:13 IST2026-02-14T11:11:36+5:302026-02-14T11:13:07+5:30

Tipu Sultan Photo Controversy: मालेगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

Malegaon Municipal Corporation News: Eknath Shinde Group Demands Removal of Tipu Sultan Portrait from Deputy Mayor Shaan E Hind Nihal Ahmed Office | Malegaon: मालेगावमध्ये उपमापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक!

Malegaon: मालेगावमध्ये उपमापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक!

मालेगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. शिंदेसेना आणि स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला असून, हा फोटो तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे मालेगावच्या राजकीय वर्तुळात सध्या शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या दालनातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात त्यांच्यापाठी टीपू सुलतानाचा फोटो लावल्याचे दिसत आहे.  त्यानंतर, शिंदेसेनेचे गटनेते नीलेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. उपमहापौरांच्या दालनातून टिपू सुलतानाचा फोटो हटवण्यासाठी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसह आयुक्त कार्यालय गाठले. "जोपर्यंत हा फोटो हटवला जात नाही, तोपर्यंत आमचा निषेध सुरूच राहील आणि तो अधिक तीव्र केला जाईल," असा इशारा नीलेश आहेर यांनी दिला आहे.

उपमहापौरांचे स्पष्टीकरण

या वाढत्या वादावर उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी टिपू सुलतान यांचे समर्थन करताना म्हटले की, "मी पदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा युतीतील नेत्यांनी मला हा फोटो भेट दिला. टिपू सुलतान हे देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. त्यांचे कौतुक केवळ भारतानेच नाही, तर ब्रिटननेही केले आहे. ते क्षेपणास्त्राचे शोधक होते आणि त्यांच्या काळात त्यांनी प्लास्टिक सर्जरीचाही पायंडा पाडला होता. आम्ही धर्मनिरपेक्ष लोक आहोत आणि हा फोटो लावण्यात मला काहीही गैर वाटत नाही."

राजकीय वातावरण तापले

मालेगाव महानगरपालिकेत सध्या सेक्युलर फ्रंट इस्लाम पार्टी, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीची सत्ता आहे. इस्लाम पक्षाचे रशीद शेख हे महापौर असून समाजवादी पक्षाचे शान-ए-हिंद हे उपमहापौर आहेत. या वादामुळे आता महापालिकेतील सत्ताधारी युती आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. 

Web Title : मालेगांव: उप महापौर के कार्यालय में टीपू सुल्तान की तस्वीर, हिन्दू संगठन आक्रोशित!

Web Summary : मालेगांव में उप महापौर द्वारा टीपू सुल्तान की तस्वीर लगाने से विवाद। हिंदू संगठनों ने विरोध किया और हटाने की मांग की। उप महापौर ने टीपू सुल्तान के ऐतिहासिक महत्व का हवाला दिया, जिससे नगर निगम में राजनीतिक तनाव बढ़ गया।

Web Title : Malegaon Deputy Mayor's Office: Tipu Sultan Photo Sparks Hindu Outrage

Web Summary : Controversy erupted in Malegaon after the Deputy Mayor displayed Tipu Sultan's photo. Hindu groups protested, demanding its removal. The Deputy Mayor defended his action, citing Tipu Sultan's historical significance and secular values, escalating political tensions within the municipal corporation.