शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना दोन झाडे लावणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 12:49 IST

दुष्काळ व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांचा आदेश

ठळक मुद्दे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला २३ तर माध्यमिक विभागाला १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेउद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला दोन झाडे लावण्याची जबाबदारी देण्यात आली संंबंधित शाळेच्या प्रत्येक शिक्षकाने झाड कोठे लावणार याची माहिती दोन दिवसांत शिक्षण विभागाला कळवायची आहे

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर दुष्काळ व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी झाडे लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक शिक्षकाने शाळा परिसरात दोन झाडे लावून जगविली पाहिजेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र शासनाने दुष्काळ, पाणीटंचाई व इतर नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने सन २0१७ पासून तीन वर्षांत ५0 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. असे असताना चालू वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामुळे गेल्यावर्षी लावलेली झाडे उन्हाच्या कडाक्याने व पाणी टंचाईमुळे जगणे मुश्कील झाले आहे. यातील अनेक रोपे जळून गेली आहेत. चालू वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपाययोजना काय केल्या, याबाबत वनविभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यासाठी २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली व प्रत्येक विभागाला वृक्ष लागवड व त्यांच्या जोपासनेबाबत काळजी घेण्याबाबत सूचित केले आहे. या निर्णयामुळे वृक्षसंवर्धनाची मोहिम अधिक गतीमान होणार आहे़

३९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला २३ तर माध्यमिक विभागाला १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला दोन झाडे लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार संंबंधित शाळेच्या प्रत्येक शिक्षकाने झाड कोठे लावणार याची माहिती दोन दिवसांत शिक्षण विभागाला कळवायची आहे. तसेच शिक्षकांनी शासनाच्या माय प्लान्ट हे अ‍ॅप्लिकेशन मोबाईलवर डाऊनलोड करून आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांना सदस्य करून घ्यायचे आहे. दिलेल्या जबाबदारीप्रमाणे शिक्षकांनी ही माहिती भरून शिक्षण विभागाच्या बैठकीला सादर करावयाची आहे, असे परिपत्रक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढले़

 जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झेडपीच्या प्रत्येक शिक्षकाला दोन झाडे लावण्याची जबाबदारी दिली आहे. झाड कोठे लावणार याची त्यांच्याकडून माहिती भरून घेण्याचे काम सुरू आहे. - संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईEducationशिक्षणSchoolशाळा