शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Zero Shadow Days: ठाणे -डोंबिवलीकरांना 17 मे रोजी दिसणार शून्य सावली; राज्यभरात वेगवेगळे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 07:42 IST

खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सोमवार, १६ मे रोजी  मुंबईकरांना आणि मंगळवार, १७ मे रोजी ठाणे-डोंबिवलीकरांना दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. वर्षातील दोन दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर आणि आपली सावली नेमकी आपल्या पायाशी आल्यामुळे ती दिसू शकत नाही. त्यामुळे या ठरावीक दिवशीच शून्य सावलीचा अनुभव घेता येतो, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

वर्षातील दोन दिवस हे शून्य सावलीचे दिवस असतात. मे महिन्यात आकाश निरभ्र असल्याने शून्य सावली अनुभवता येते; पण दुसरा दिवस २८ जुलै हा पावसाळ्यात येत असल्याने शून्य सावलीचा अनुभव घेता येत नाही. सूर्याची क्रांती ज्या दिवशी उत्तर १९ अंश होईल, त्या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर दिसेल. वर्षातून दोनवेळा सूर्य डोक्यावर दिसतो. त्यामुळे या दिवशी मध्यान्हाला सूर्य डोक्यावर आल्यावर आपली सावली बरोबर पायाखाली आल्यामुळे दिसू शकत नाही. म्हणून या दिवसांना शून्य सावलीचा दिवस म्हणतात, असे सोमण यांनी सांगितले. या दिवसाचा नागरिकांनी आनंद लुटावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

अशी अनुभवा शून्य सावली    शून्य सावलीच्या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायला सुरुवात करावी.     पुठ्याचे एक जाड नळकांडे तयार करून उन्हात ठेवावे, किंवा  एक जाड काठी उन्हात उभी करून ठेवावी.     तिच्या सावलीचे निरीक्षण करावे.     काठीच्या सावलीची लांबी कमी कमी होत जाईल.     ठीक १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य आकाशात डोक्यावर आला, म्हणजे सावली काठीच्या मुळाशी आल्यामुळे अदृश्य होईल.     नंतर पुन्हा काठीची सावली लांब लांब होत जाईल.     मुलांच्या एका गटाने उन्हात  गोलाकार उभे राहून एकमेकांचे हात धरून  कडे करावे.     नंतर सावलीचे निरीक्षण करावे.     आकाशात सूर्य डोक्यावर आल्यानंतर सुंदर दृश्य दिसेल.     याचा उंचावरून फोटो घेता येईल. शून्य सावलीचे निरीक्षण करण्याची संधी आपणास महाराष्ट्रात मिळू शकते, असे सोमण म्हणाले.

महाराष्ट्रातील दिवस (१) रत्नागिरी ११ मे  (२) सातारा, सोलापूर १२ मे (३) उस्मानाबाद १३ मे (४) रायगड, पुणे, लातूर १४ मे, (५) अंबेजोगाई, केज १५ मे (६) मुंबई, नगर, परभणी, नांदेड १६ मे (७) ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याण, पैठण १७ मे (८) संभाजीनगर, जालना, हिंगोली, चंद्रपूर १९ मे (९) नाशिक, वाशिम, गडचिरोली २० मे (१०) बुलडाणा, यवतमाळ २१ मे (११) वर्धा २२ मे (१२) धुळे, अकोला, अमरावती २३ मे (१३) भुसावळ , जळगाव, नागपूर २४ मे  (१४) नंदुरबार २५ मे