धावत्या कारमधील चालकावर हल्ला करणारे जेरबंद
By Admin | Updated: June 28, 2016 20:48 IST2016-06-28T20:48:50+5:302016-06-28T20:48:50+5:30
वत्या कारमधील चालकावर प्राणघातक हल्ला करणा-या ५ हल्लेखोरांना गुन्हे शाखेने अटक केली. संदीप पिल्ले उर्फ सण्डी(२७), दिपक चौरसिया (२३), रुपेश लोणकर (२७) राजा देवेंद्र (४५

धावत्या कारमधील चालकावर हल्ला करणारे जेरबंद
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - धावत्या कारमधील चालकावर प्राणघातक हल्ला करणा-या ५ हल्लेखोरांना गुन्हे शाखेने अटक केली. संदीप पिल्ले उर्फ सण्डी(२७), दिपक चौरसिया (२३), रुपेश लोणकर (२७) राजा देवेंद्र (४५) आणि काली अशी अटक आरोपींची नावे आहेत. पूर्ववैमनस्यातून त्यांनी हा हल्ला चढविल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
डॉ. नवीन कुमार बिनॉय गुप्ता असे यामध्ये जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. २२ जून रोजी रात्री आठच्या सुमारास गुप्ता हे आपल्या महिला सहकारी सोबत कारने जात होते. त्याच दरम्यान पाठलाग करत असलेल्या चौकडीने त्यांच्यावर चॉपर आणि कोयत्याने वार केले. मात्र गुप्ता यांनी वेळीच वाहन सुसाट चालवून तेथून पळ काढला. रस्त्याच्या एका आडोशाला थांबून घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी गुप्ता यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला.