शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

बोगस तिकीट निरीक्षकासह युवती गजाआड

By admin | Updated: August 17, 2014 00:18 IST

हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमधील घटना,अकोला रेल्वे स्थानकावर अटक; सोमवारपर्यंंत पोलिस कोठडी.

अकोला - मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमधील वातानुकूलित बोगीमध्ये प्रवास करीत असलेल्या बोगस तिकीट निरीक्षकास जीआरपी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. सदर तिकीट निरीक्षकाला बनावट दस्तऐवज तयार करून देणार्‍या बडनेरा येथील युवतीलाही गजाआड करण्यात आले असून दोघांनीही न्यायालयाने त्यांना १८ ऑगस्टपर्यंंंत पोलिस कोठडी सुनावली.मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस शुक्रवारी अमरावतीवरून अकोल्याकडे येत असताना या एक्स्प्रेसमधील एसी टू-टायरमध्ये तिकीट निरीक्षक प्रवाशांचे तिकीट व आरक्षणाची तपासणी करीत होते. यावेळी एका सीटवर बसलेल्या युवकास त्यांनी तिकीट मागितले असता त्याने तिकीट निरीक्षक असल्याचे सांगून सोबत असलेल्या ओळखपत्राची झेरॉक्स दाखविली. हे ओळखपत्र बनावट असल्याचे तिकीट निरीक्षकांच्या निदर्शनास आले. त्यांनी या प्रकाराची माहिती तत्काळ अकोला रेल्वे स्थानकावरील मुख्य तिकीट निरीक्षक संजय इंगळे यांना दिली. दुपारी १२ वाजून ३0 मिनिटांच्या सुमारास गितांजली एक्स्प्रेस अकोला रेल्वे स्थानकावर येताच तिकीट निरीक्षक इंगळे यांनी जीआरपी पोलिसांच्या सहाय्याने या युवकाला ताब्यात घेतले. संजय इंगळे यांनी युवकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सुजीत राहन झांझड असल्याचे सांगून झांझडपुरा बडनेरा येथील रहिवासी असल्याचे सांगितले.तिकीट निरीक्षकाचे ओळखपत्र व इतर दस्तऐवजाची तपासणी केल्यानंतर या विषयी त्याला विचारपूरस केली असता त्याने सदर दस्तऐवज बडनेरा येथील युवती मनाली प्रकाश पहुरकर हिने बनवून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने मनाली पहुरकर हिला अकोल्यात बोलावून तिची चौकशी केली असता सदर प्रकरणातील दस्तऐवज तिनेच बनविल्याचे उघड झाले. यावरून मुख्य तिकीट निरीक्षक इंगळे यांनी जीआरपी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी युवक व युवतीविरुद्ध कलम ४२0 (फसवणूक), ४६८ (बनावट दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवज उपयोगात आणणे) आणि १७0 (बनावट दस्तऐवजाद्वारे सरकारी नोकर बनण्याचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही १८ ऑगस्टपर्यंंंत पोलिस कोठडी सुनावली.