'तुम्ही लोक मारून आरोपी घरात लपून ठेवता', मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंविरोधात थोपटले दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 18:59 IST2025-01-04T18:42:32+5:302025-01-04T18:59:06+5:30

Manoj Jarange Patil Dhananjay Munde News: परभणी येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ झालेल्या मूक मोर्चात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना रस्त्यानेही फिरू देणार नाही, असा इशारा दिला. 

'You kill people and hide the accused in your house', Manoj Jarange slaps fine on Dhananjay Munde | 'तुम्ही लोक मारून आरोपी घरात लपून ठेवता', मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंविरोधात थोपटले दंड

'तुम्ही लोक मारून आरोपी घरात लपून ठेवता', मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंविरोधात थोपटले दंड

Manoj Jarange Patil Dhananjay Munde: संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना पोलीस टाण्यात गेल्यानंतर धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या विरोधात दंड थोपटले. यापुढे जर देशमुख कुटुंबीयांना धक्का लागला, तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

परभणीत बोलताना मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेऊन निशाणा साधला. 

"धनंजय देशमुख हे ज्यावेळी पोलीस ठाण्यात गेले, त्यावेळी त्यांना धमकी देण्यात आली. मी आतापर्यंत कधी नाव घेऊन बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे की, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कुणाच्या वाट्याला जात नाही. पण, यापुढे आमचे संतोष भैय्या तर आता गेलेत... पण यापुढे त्यांचे कुटुंबीय, धनंजय देशमुख यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धक्का लागला, तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही", असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. 

यांना घरात घुसून मारायचं -मनोज जरांगे 

मनोज जरांगे म्हणाले, "आमचा एक भाऊ गेला, तो आम्ही सहन केला. या मुंड्याचं आम्ही नावही घेतलं नाही. पण, यापुढे जर देशमुख कुटुंबीयांना यापुढे त्रास झाला, तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. आपल्या समाजाला त्रास झाला, तर यांना घरात घुसून मारायचं. मी असलं कधी बोलत नाही. पण, माणसांचे मडदे पडायला लागले, तर हे सहन होत नाही." 

"आम्हाला माज नाहीये. आम्हाला मस्ती पण नाहीये, पण जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावर पाडायला लागलात, तर... आज त्या कुटुंबाची काय अवस्था आहे. तुम्ही लोक मारून जर आरोपी घरात लपून ठेवता. पुण्यात यांना सांभाळलं कुणी? सगळे आरोपी पुण्यात कसे सापडू लागलेत? याचा अर्थ तुमच्या सरकारमधील मंत्री त्या आरोपींना सांभाळायला लागले आहेत", असे म्हणत मनोज जरांगेंनी आरोपींच्या पुण्यातील ठिकाणाबद्दल संशय व्यक्त केला.  

मंत्र्याला दगडाने मारू, जरांगेंचे धनंजय मुंडेंविरोधात थोपटले दंड 

"या खंडणीतील आणि हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सहआरोपी केले पाहिजे. आरोपपत्र जर कच्चं झालं. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर चार्जशीट कच्चं झालं आणि त्यातील एक जरी आरोपी बाहेर आला की, मंत्री गोट्यांनी (दगड) हाणलाच. तुम्हाला आता हीच भाषा कळते", असा घणाघात मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर केला.     

Web Title: 'You kill people and hide the accused in your house', Manoj Jarange slaps fine on Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.