शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 22:52 IST

राज ठाकरे यांनी माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या प्रचारार्थ सभा घेतली.

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज माहिम मतदारसंघात मुलगा अमित ठाकरेसाठी जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, शिवसेनेच्या स्थापनेपासून ते मनसेच्या स्थापनेपर्यंत अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी त्यांनी अमित ठाकरेंसहमनसेच्या सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहनदेखील केले.

अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात कसे उतरले?अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना राज म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे किंवा माझ्या वडिलांनी कोणती गोष्ट करा अथवा करू नका, असं मला कोणीच सांगितले नाही. त्यामुळे मीही माझ्या मुलाला काही सांगत नाही. त्याला निवडणूक लढवावी वाटली, तो लढवतोय. पण निवडणुकीत उतरावे असे मला कधीच वाटत नाही. कारण, मी ज्या मुशीतून वर आलोय, त्यामुळे मला असे काही वाटत नाही.'

'अमितला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, याबाबत मला फारशी कल्पना नव्हती. पण, मीडियातून सातत्याने याबाबत बातम्या येत होत्या. एके दिवशी नेत्यांची आणि सरचिटणीसची बैठक झाली, तेव्हा अमित बोलला की, सर्व नेत्यांनी उभं राहील पाहिजे, मी पण उभा राहीन. आम्ही पण बैठक घेतली, त्यात त्याला विचारलं उभा राहणार आहेस? तो बोलला तुम्ही सांगाल तर राहीन.'

उद्धव ठाकरेंवर निशाणा

'तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळी उद्धव आजारी पडला, त्यावेळी मी पहिल्यांदा गाडी घेऊन गेलो. मी कुटुंबाच्या आड कधी राजकारण आणत नाही. गेल्यावेळी आदित्य उभा होता, तेव्हा मी मनाने उमेदवार नाही दिला. तिथे मनसेची 38 हजार मते आहेत. लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा मनात पण नव्हते अमित निवडणुकीला उभा राहणार. माझ्या काय त्याच्याही मनात नसेल. जे समोर येतील त्यांच्याशी लढू, निवडून नक्की आणणार', असा विश्वास राज ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवला.

त्यांची सगळी अंडी पिल्ली...

'मी आज तुम्हाला सांगतो, ह्याचे नाव जरी अमित राज ठाकरे असले, तरी याला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही. आज मी इथे आलोय, तुमची अपेक्षा असेल की, समोरच्या उमेदवारबद्दल बोलवं. अमितच्या विरोधात जी माणसं उभी आहेत त्यांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढू शकतो. मात्र त्या घाणीत मला हात नाही घालायचा. ह्यांच्याबद्दल काय बोलावं? बाळासाहेबांना सोडून काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा शिवसेनेत आले अन् आता एकनाथ शिंदेंकडे गेले. दुसरे उमेदवारही काँग्रेसमध्ये जाऊन पुन्हा शिवसेनेत आले, त्यांच्याबद्दल फार बोलण्याची गरज नाही.'

'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...

'तुमच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसे हवीत. मी आमच्या प्रत्येक उमेदवाराला सांगितले आहे की, तुमचा नंबर प्रत्येक नागरिकाला द्या आणि त्यांच्या समस्य्या ऐकून घ्या. आज दादर माहीम मतदारसंघात पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय. आज अमितसाठी माझी ही एकच सभा आहे. प्रत्येकासाठी मी सभा घेतोय. अमितला, संदीपला आणि महाराष्ट्रमध्ये जिथे जिथे माझे उमेदवार उभे तिथे तिथे त्यांना निवडून द्या,' असे आवाहनदेखील राज ठाकरे यांनी यावेळी केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरेMNSमनसे