शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

Rohit Pawar on IT Raids: कालचे निकाल अन् आजचे छापे याचे लागेबांधे काय? रोहित पवारांनी व्यक्त केली वेगळीच शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 17:11 IST

IT raids on Ajit pawar's relatives: उत्तर प्रदेश येथील घटना निषेधार्ह असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना तेथे अशी वागणूक मिळत असेल तर त्याला विरोध म्हणून महाविकास आघाडी सरकार मधील सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन ११ तारखेला बंद पुकारला आहे. त्याला पाठिंबा द्यावा.

जामखेड - जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक लागला व त्यात महाविकास आघाडी सरकारला यश मिळाले व दुसऱ्याच दिवशी अशा पध्दतीने छापे मारले जातात, यामध्ये काही संबंध आहे का हे पहावे लागेल. पण जर राजकीय हेतूने अशा गोष्टी होत असतील तर लोकांना याचा कंटाळा आला आहे. या रेडच्या बाबतीत व या विषयाच्या अजून खोलात जाऊन माहिती घ्यावी लागेल. पण अशा पध्दतीने वागणूक योग्य नाही, असे माझे व सर्वसामान्य लोकांचे म्हणणे आहे, असे मत आ. रोहित पवार (Rohit pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संबंधीत कारखान्यावर पडलेल्या आयकराच्या छाप्याबाबत (IT Raid) मांडले आहे. 

 तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवी मंदिर उघडल्यानंतर आ. रोहित पवार यांनी पूजा केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील मंदिर उघडण्यासंदर्भात आ. पवार म्हणाले, मंदिर किंवा धार्मिक स्थळ येथे प्रेरणा मिळते. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर मंदिर काही काळ उघडले व दुसऱ्या लाटेत पुन्हा ती बंद करावी लागली. आता दुसरी लाट ब-यापैकी ओसरली असल्याने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडत आहे. त्यामुळे आनंद असून वेगळे वातावरण आजच्या दिवशी आहे. नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन लोकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून सुरक्षितता बाळगावी. असे आवाहन त्यांनी केले. 

  उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न होऊन व आठ जणांचा मृत्यू झाला ही घटना असंवैधानीक आहे.  शेतकरी हा शेतकरी असतो तो महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातचा असो की बिहारचा जेंव्हा आपण एका मंदिरामध्ये नतमस्तक होतो तो तालुक्यातील असो की बाहेरचा त्याचप्रमाणे शेतकऱ्याला वागणूक असावी. उत्तर प्रदेश येथील घटना निषेधार्ह असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना तेथे अशी वागणूक मिळत असेल तर त्याला विरोध म्हणून महाविकास आघाडी सरकार मधील सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन ११ तारखेला बंद पुकारला आहे. तेथे असणाऱ्या शेतकरी त्यांचे मुले, मुली व शेतीशी निगडित असलेले लोक प्रतिसाद देतील. त्यात कोणते राजकारण न समजता फक्त आपल्या युपीतील शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा विरोध म्हणून बंद पुकारला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली.यावेळी प्रा मधुकर अबा राळेभात, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, अक्षय शिंदे, सरपंच सुनिल उबाळे, प्रविण उगले, गणेश उबाळे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारIncome Taxइन्कम टॅक्स