शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

यंदा होणार ‘दमदार’ पाऊस

By admin | Updated: March 22, 2015 23:47 IST

रबी पिकाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने दिलेल्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला या वर्षीचा मान्सून दिलासादायक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नवी दिल्ली : मान्सून २०१४ चे विलंबाने झालेले आगमन, त्यातच दुबार पेरणीचा आणि अखेरच्या टप्प्यात रबी पिकाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने दिलेल्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला या वर्षीचा मान्सून दिलासादायक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मान्सून २०१५ सामान्य म्हणजे १०२ टक्के तसेच देशभरात तो समप्रमाणात राहण्याची शक्यता असली तरी काही भागात पावसाचे प्रमाण किंचित कमी राहू शकते, असे असोचेम उद्योग मंडळ आणि हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था ‘स्कायवेट वेदर’ने संयुक्तरीत्या जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.अलीकडेच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बहुतांश राज्यांना फटका दिला. उभे पीक नष्ट झाले. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही असेच वातावरण राहण्याची आणि पुन्हा एकदा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषीचा वाटा १५ टक्के असून ५० टक्के लोकांना शेतीतून रोजगार मिळतो. कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने ६० टक्के क्षेत्र पावसावर निर्भर असते. ‘मान्सून २०१५ : कृषी व्यवसाय जोखीम की संधी’ अशा आशयाच्या शीर्षकाखाली अभ्यास सादर करण्यात आला.अल-निनोचा प्रभाव नाहीदरवर्षी पावसावर अल-निनो घटकाचा नकारात्मक प्रभाव दिसून येतो. पावसाचे प्रमाण कमी होऊन दुष्काळाचा फटका बसतो. या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात वातावरणावर अल-निनोचा प्रभाव दिसणार नसल्याने देशभरात सामान्य पाऊस राहण्याची शक्यता आहे, असे रावत यांनी अहवाल जारी करताना म्हटले. २०१४ मध्ये हवामानदृष्ट्या सौम्य दुष्काळाची स्थिती होती. पुन्हा तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता अवघी ३ टक्के आहे. भारतीय उपसागरात द्विध्रुवाची (आयओडी) उत्पत्ती होण्याचे संकेत नसल्यानेही पाऊस चांगला होईल, असे स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग यांनी म्हटले. अहवालानुसार प्रमाण उणे किंवा अधिक चारने चुकू शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)देशभरात पावसाचे प्रमाण जवळपास सारखेच राहणार असले तरी महाराष्ट्रातील मराठवाड्यासह तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड तसेच रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, ईशान्येकडील काही भागांतही पावसाचे प्रमाण तुलनेत कमी असेल, असे असोचेमचे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी नमूद केले. असा बरसेल मान्सून...जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता ६ टक्के आहे. तसे झाल्यास पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) तुलनेत जास्त म्हणजे ११० टक्क्यांच्या वर राहू शकतो.हंगामी पावसाचे प्रमाण एलपीएच्या १०५ ते ११० टक्के म्हणजे सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता ३६ टक्के आहे. एलपीएच्या ९६ ते १०४ टक्के म्हणजे सर्वसाधारण राहण्याची शक्यता ५२ टक्के आहे. एलपीएच्या ९० ते ९५ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता ४ टक्के, तर एलपीएच्या तुलनेत ९० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे दुष्काळाची स्थिती राहण्याची शक्यता अवघे २ टक्के असेल.