शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी जगण्याचे तंत्र अनिताने उलगडले

By admin | Updated: March 11, 2015 00:15 IST

जिद्दीवर मात : गेली १८ वर्षे ‘ती’ खुर्चीवर बसून आहे...

रत्नागिरी : संकटाचा सामना करता आला, की आपले धाडसच आनंदी जीवन जगण्याचा नवा मार्ग दाखवते, असे आनंदी जीवनाचे तंत्र गेली १८ वर्षे खुर्चीवर काढलेल्या कणकवली कलमठ येथील अनिता साळगावकरहिने महिला दिनी आयोजित केलेल्या जाहीर प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात उलगडून दाखवले.अनिताला सहाव्या वर्षी मेंदूज्वरामुळे अपंगत्त्व आले. मानेखालील शरीरच बधीर झाल्याने ती पहिलीनंतर शिक्षणच घेऊ शकली नाही. मात्र, तिने या जगावेगळ्या आजारावर मात करत कविता करू लागली आहे. तिचा हा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा, तिची जिद्द समाजासमोर यावी, या उद्देशाने येथील रत्नागिरी टेस्टट्युब बेबी सेंटर आणि वीरश्री चॅरिटेबल ट्रस्टने महिला दिनाचे औचित्य साधून अनिता साळगावकर हिच्या जाहीर प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अनिता हिच्या पाऊस, पंख, बाप, भ्रष्टाचार, निवडणूक आदी विषयांवरील कवितांचे सादरीकरण स्मिता आंगोळकर आणि दत्तप्रसाद कुलकर्णी यांनी केले. अनिताची ही पहिलीच प्रकट मुलाखत होती. पण, तरीही ती आपल्या या प्रवासाबद्दल भरभरून बोलली. यावेळी अनिताच्या जगण्याच्या लढाईत तिच्या सोबत असणाऱ्या तिच्या आईवडिलांनी तिच्या जीवनप्रवासाबद्दल सांगितले. तिच्या शिक्षिका विदीशा पालव यांनी तिला कविता करणे, एसएमएस वा फेसबुकचा वापर करणे आदी गोष्टी शिकवून तिला आयटी क्षेत्रात साक्षर केल्याचे सांगितले. यावेळी वीरश्री चॅटिटबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे, रत्नागिरी टेस्टट्युब बेबी सेंटरच्या प्रमुख डॉ. तोरल शिंदे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा डॉ. कल्पना मेहता, माजी नगरसेविका शिल्पा पटवर्धन, विरश्री ट्रस्टच्या सचिव डॉ. निशिगंधा पोंक्षे आदी उपस्थित होते. हा ट्रस्ट अपंग मुलांच्या मदतीसाठी असून त्यांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. डॉ. मेहता यांनी अनिताबरोबरच तिच्या आई - वडिलांचेही कौतुुक केले. शिल्पा पटवर्धन यांनी अनितावर एक सुरेख कविता सादर केली. लायन्स क्लबतर्फे अनिताच्या छायाचित्रांचे कॅलेंडर दत्तप्रसाद कुलकर्णी व प्रमोद खेडेकर यांनी भेट दिले. डॉ. रश्मी आठल्ये उपस्थित होत्या. सूत्रसंचालन यशश्री पुरोहित यांनी केले. (प्रतिनिधी)कलमठच्या अनिताचे अनुभव ऐकून सारेच हेलावले.अनिताला सहाव्या वर्षीच मेंदूज्वरामुळे आले अपंगत्व.मानेखालील शरिरच बधीर झाल्याने पहिलीनंतर शिक्षणच घेऊ शकली नाही.