शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये काम सुरूकरा अन्यथा भूखंड परत घेणार

By admin | Updated: November 17, 2014 01:06 IST

मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी ज्या कंपन्यांनी भूखंड घेतले पण अद्याप उद्योग सुरू केले नाही त्यांना उद्योग सुरू करण्याबाबत वारंवार विनंत्या करण्यात आल्या. त्यांनी लवकरात लवकर उद्योग सुरू

मुख्यमंत्र्यांचा कंपन्यांना इशारा : एम्स, आयआयएमसह केंद्रीय संस्थांना देणार जागानागपूर : मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी ज्या कंपन्यांनी भूखंड घेतले पण अद्याप उद्योग सुरू केले नाही त्यांना उद्योग सुरू करण्याबाबत वारंवार विनंत्या करण्यात आल्या. त्यांनी लवकरात लवकर उद्योग सुरू केले नाही तर त्यांचे भूखंड परत घेतले जातील, असा स्पष्ट इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी नागपूरमध्ये आल्यावर सर्वप्रथम मिहानचा आढावा घेतला होता. यावरून त्यांच्या प्राधान्यक्रमात ‘मिहान प्रकल्प’ असल्याचे स्पष्ट झाले होते. मिहानमध्ये भूखंड घेऊनही अनेक बड्या कंपन्यांनी अद्याप त्यांचे उद्योग सुरू केले नाहीत, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की ज्या कंपन्यांनी वारंवार सांगूनही त्यांचे उद्योग सुरू केले नाहीत त्यांचे भूखंड परत घेऊ. जागा वाटपाच्या सूत्रात बदल करून त्यात एकसूत्रता आणि पारदर्शकता आणू, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या भाडेपट्ट्याचा कालावधी वाढवून तो ९० वर्षे केला जाईल. नागपूर विमानतळाचा विकास दोन टप्प्यात केला जाईल, असे त्यांनी सांगितले. टॅक्सी-वे च्या संदर्भात जी जागा अधिग्रहित करायची आहे त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यातून मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मिहानमधील वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाल्यावर येथे अनेक कंपन्या येतील. अनेक कंपन्यांशी यासंदर्भात चर्चाही झाली आहे. विशेष आर्थिक क्षेत्रात एमएमटी (टॅक्स) उद्योजकांसाठी अडचणीचा आहे. केंद्र सरकार याचा फेरविचार करीत आहे, असे ते म्हणाले.केंद्रीय संस्थांना देणार जागाबिगर विशेष आर्थिक क्षेत्रात (नॉन एसीझेड) दोन ते अडीच हजार हेक्टर जागा शिल्लक आहे. ही जागा केंद्रीय संस्थांना देण्याचा सरकारचा विचार आहे. तशी कायद्यात दुरुस्तीसुद्धा करण्यात आली आहे. नागपूरमध्ये आयआयएम, एम्स, प्लास्टिकवर प्रक्रिया करणारी संस्था यासह चार केंद्रीय संस्थांचा समावेश आहे,असे फडणवीस म्हणाले. नॅशनल लॉ स्कूल, ट्रिपल आयटी या संस्थांना यापूर्वीच जागा देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले. अन्यथा त्यांनाही बिगर विकास आर्थिक क्षेत्रात जागा देऊन केंद्राच्या सर्व संस्था नागपूरमध्ये एकाच ठिकाणी ठेवण्याचा आपला विचार होता, असे ते म्हणाले.