शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अधिवास नष्ट झाल्याने इतरत्र जगतोय लांडगा ; संरक्षित क्षेत्रात मानवी हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 15:29 IST

लांडगा वाचवायचा असेल, तर त्यांचा अधिवास टिकविणे आवश्यक..

ठळक मुद्देसंरक्षित क्षेत्रात मानवी हस्तक्षेप : संवर्धनासाठी प्रयत्न

श्रीकिशन काळे -  पुणे : जिल्ह्यात अनेक ठिकाणी लांडग्याचा अधिवास असून, त्यांचा प्रजनन काळ आता सुरू होत आहे. मानवी वस्ती वाढत असल्याने त्यांचा अधिवास नष्ट होत असल्याने ते इतर भागात अधिक दिसून येत आहेत. लांडगा वाचवायचा असेल, तर त्यांचा अधिवास टिकविणे आवश्यक आहे.                लांडगा हा माळरानावरील परिसंस्थेतील सर्वोच्च घटक समजला जातो. पण सध्या कात्रज घाट परिसर, सासवड, मोरगाव, बारामती, दिवे घाट परिसरातील त्याचा अधिवास हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे त्यांना राहण्यायोग्य जागाच शिल्लक नाही. पाण्याच्या स्त्रोतांशेजारी ते आपली गुजराण करीत आहेत. नदीकाठी वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांना ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी मिळत आहे. संरक्षित जमिनीपेक्षा इतर परिसरातच आता लांडगा आपले आयुष्य जगत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेपाने त्यांच्यावर संकट येत आहे. ग्रासलॅँड संस्थेकडून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी शक्यतो लांडग्यांना त्रास न देता त्यांच्याशी जुळवून घ्यायला हवे. लांडग्यांच्या अधिवासामध्ये मानवाची ये-जा वाढल्याने त्यांना धोका निर्माण झाला आहे. भारतीय वन कायद्यानूसार लांडग्यांची प्रजाती संरक्षित करण्यात आली आहे. त्यांच्या शिकारीवर प्रतिबंध आहे. नागरिकांनी जर त्यांच्याशी जुळवून घेऊन अधिवासात अधिक हस्तक्षेप केला नाही, तर त्यांची प्रजाती वाढण्यास मदत होणार आहे, अशी माहिती ग्रासलॅँड संस्थेचे मिहिर गोडबोले यांनी दिली.

       ते जोडीजोडीने अथवा टोळ्यांनी राहतात आणि शिकार करतात. उंदीर, घुशी, ससे, हरणे इत्यादींचा त्यांच्या भक्ष्यात समावेश होतो. क्वचित प्रसंगी ते मनुष्यवस्तीत शिरून गुरांवर व पाळीव जनावरांवर हल्ला करतात, तर कधीकधी ते लहान मुलेही पळवितात.लांडग्यामध्ये नर-मादी आयुष्यभर सोबत राहतात. त्यांच्या प्रजननाचा काळ पावसाळा संपत असताना सुरू होतो. गर्भावधी ६०-६३ दिवसांचा असून पिले डिसेंबरमध्ये जन्मतात. नैसर्गिक अधिवासात लांडगा १२-१५ वर्षे जगतो.१९७२ सालच्या वन्य जीवांचे रक्षण या कायद्यानुसार भारतात लांडग्यांना संरक्षण देण्यात आले असून त्यांच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आहे. 

टॅग्स :PuneपुणेforestजंगलAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार