शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मी पुन्हा येणार...! वादळात गेलेली सत्ता थंडी पुन्हा मिळवणार; केव्हापासून... हवामानाचा अंदाज पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 07:29 IST

Winter In Maharashtra: नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शहरांचा किमान तापमानाचा पारा १० अंशांवर आला होता, तर मुंबई १६ अंशांवर उतरली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दक्षिणेकडील चक्रीवादळने पळवून लावलेली थंडी उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुन्हा एकदा जोर पकडणार आहे. ८ ते १३ डिसेंबरदम्यान राज्यातील शहरांचा पारा १०, तर मुंबई महानगरातील शहरांचा पारा १६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. परिणामी, आठवडाभर गायब असलेली थंडी आता कमबॅक करणार आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शहरांचा किमान तापमानाचा पारा १० अंशांवर आला होता, तर मुंबई १६ अंशांवर उतरली होती. मात्र, हवामानात झालेल्या उल्लेखनीय बदलामुळे गेल्या आठवड्यात किमान तापमानात वाढ झाली. राज्याच्या बहुतांशी भागात हवामान ढगाळ नोंदविले गेले. काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद झाली. आता हवामान पालटणार असून, राज्यासह मुंबईला थंडीची मजा लुटता येणार आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील शहरांच्या किमान तापमानात बऱ्यापैकी घसरण होईल. मराठवाड्यातही तापमान खाली येईल. कमाल ३५ आणि किमान तापमान १०  ते १३ अंश नोंदविले जाईल. विदर्भातही हलक्याशा थंडीची नोंद होईल, तर मुंबईसह लगतच्या परिसरातील शहरांचे किमान तापमान १३ ते १५ अंश नोंदविली जाईल.    - अथ्रेया शेट्टी,    हवामान अभ्यासक.

टॅग्स :environmentपर्यावरण