आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 17:20 IST2025-09-24T17:19:01+5:302025-09-24T17:20:02+5:30
"मी काही फार चांगला पिती तर नाही. कारण मी मुलीला फार वेळ देऊ शकत नाही. मात्र, जेवढा वेळ देतो, त्यात चांगला पिता होण्याचा प्रयत्न करतो." तसेच, आमचा एक चांगला बॉन्ड आहे, असेही फडणवीस म्हणाले.

आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
मी माझ्या कुटुंबातील कुणालाही राजकारणात आणणार नाही, या आपल्या एका जुन्या मुलाखतीतील विधानाच उल्लेख करत, माझी मुलगी सध्या तर छोटी आहे. तिला वकील व्हायचे आहे. पण ती काही राजकारणात येईल, असे मला वाटत नाही आणि तिला यायचेच असेल तर यावे. पण माला नाही वाटत, ती राजकारणात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास चर्चा केली.
यावर, जर तिला यायचे असेल, तर आपण रोकाल का? असा प्रश्न केला असता, फडणवीस म्हणाले, "तिला यायचेच असेल, तर क्लास वनपासून सुरुवात करावी लागेल. माझी मुलगी म्हणून तिला राजकारणात प्रवेश मिळणार नाही. अर्थात माझी मुलगी आहे, म्हणून तिला राजकारणात प्रवेश मिळणार नाही. तिला यायचे असेल, तर तिने सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम सुरू करावे आणि ज्या पदापर्यंत तिला जाणे शक्य होईल, तेथपर्यंत तिने जावे. पण माझी मुलगी आहे, म्हणून तिला फायदा मिळणार नाही."
यावर, आपण कधी तिला यासंदर्भात विचारले? असा प्रश्न केला असता, फडणवीस म्हणाले, "ती सध्या ११ व्या वर्गात शिकत आहे. मी तिला विचारले की, तुझी काय करायची इच्छा आहे, ती म्हणाली, माझी वकील होण्याची इच्छा आहे. तर तिने चांगले वकील व्हावे."
चांगला पिता होण्याचा प्रयत्न करतो -
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, "मी काही फार चांगला पिती तर नाही. कारण मी मुलीला फार वेळ देऊ शकत नाही. मात्र, जेवढा वेळ देतो, त्यात चांगला पिता होण्याचा प्रयत्न करतो." तसेच, आमचा एक चांगला बॉन्ड आहे, असेही फडणवीस म्हणाले.