शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार का? उगाच शहाणपणाच्या गोष्टी करू नका, चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:52 IST

जर राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची, तर मग करुणा मुंडेंचं काय करायचं? तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपना करण्याच्या गोष्टी करू नेयेत, अशा शब्दात भाजपनेत्या चित्रावाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. त्या झी २४ ताससोबत बोलत होत्या.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनाही स्थान देण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी भजप आणि शिवेसेच्या शिंदे गटाविरोधात रान उठवले आहे. यातच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी "भाजपने राठोडांना क्लिन चिट देऊन आणले आहे. यामुळे माझी संजय राठोडांच्या वतीने भाजपला विनंती आहे, की त्यांनी राठोडांची, त्यांच्या पत्नीची, त्यांच्या मुलांची आणि बंजारा समाजाची माफी मागायला हवी, असे म्हटले  होती. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. 

जर राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची, तर मग करुणा मुंडेंचं काय करायचं? तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपना करण्याच्या गोष्टी करू नेयेत, अशा शब्दात भाजपनेत्या चित्रावाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. त्या झी २४ ताससोबत बोलत होत्या.

काय म्हणाल्या चित्रा वाघयासंदर्भात बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, "सुप्रिया ताई या राज्यातील खूप मोठ्ठ्या नेत्या आहेत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या होत्या. आजही त्या तिथल्या नेत्या आहेत. मला त्यांना सांगायचे आहे, की जर राठोड यांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची, तर मग करुणा मुंडेंचं काय करायचं? महाविकास आघाडीने, मग त्यात राष्ट्रवादी आली, काँग्रेस आली, शिवसेना आली, तिची ज्या पद्धतने धिंड काढली, तिच्या गाडीत कशा पद्धतीने पिस्तुल ठेवण्यात आले, तिला कशा पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आले, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. त्यामुळे तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का? त्यामुळे उगाचच शहाणपना करण्याच्या गोष्टी करू नेयेत, अशा शब्दात भाजपनेत्या चित्रावाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

संजय राठोडांना महाविकास आघाडीने सरकारने सर्वात पहिले क्लिनचीट दिली -संजय राठोड यांच्या विरोधातील लढा चालूच राहणार. आम्ही  काल ज्या पद्धतीने आमची भूमिका मांडली होती, त्याच पद्धतीने हा लढा सुरू राहील. संजय राठोडांना महाविकास आघाडीने म्हणजेच ठाकरे सरकारने सर्वात पहिले क्लिनचीट दिली होती. यामुळ तेव्हाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गृहमंत्री, पुण्याचे पोलीस आयुक्त यांना विचारायला हवे, की त्यांना कशी क्लिनचिट मिळाली? यासंदर्भात मी पीआयएल दाखल केली आहे. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSanjay Rathodसंजय राठोड