शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, आदित्य येणार? फडणवीस तेव्हाही आलेले

By हेमंत बावकर | Published: June 30, 2022 5:47 PM

Eknath Shinde As new CM: ज्या उद्धव ठाकरेंच्या संयमी, विनयशील नेतृत्वाची कालपासून चर्चा आहे, ते पाहता उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहायला हवे, असे अनेकांना वाटत आहे. उद्धव ठाकरे असे करतील का? 

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज आपण नाही तर एकनाथ शिंदेमुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली आणि अवघ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या अडीच वर्षांपासून याचसाठी त्यांचा अट्टाहास होता का? असाही प्रश्न अनेकांना पडला. पण जे घडले ते आपण साऱ्यांनीच पाहिले, ऐकले. आता आणखी एक ट्विस्ट महाराष्ट्राला पहायला मिळण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी जंग जंग पछाडलेले. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने निकाल लागताच आम्हाला मुख्यमंत्री पद देण्याचा भाजपाने शब्द दिलेला याचे भांडवल करून मविआसोबत सत्ता स्थापन केली. त्यापूर्वी फडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र येत पहाटेलाच शपथविधी पार पाडला. शरद पवारांनी पक्ष सावरत अजितदादांसह साऱ्या आमदारांना परत आणले आणि मविआ सरकारमध्ये उभे केले. 

जेव्हा मविआ सरकारचा शपथविधी होता, तेव्हा दुसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची हळदही न उतरलेले परंतू मुख्यमंत्री पद गमावलेले फडणवीस खुल्या दिलाने या ठाकरेंच्या या सोहळ्याला आले होते. खरे म्हणजे आधीच्या मुख्यमंत्र्याने शपथविधीला येऊन कटुता संपविण्याची, नव्या सरकारला शुभेच्छा देण्याचा प्रघात आहे. फडणवीसांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. परंतू आता प्रश्न उरतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीला शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत का? 

देवेंद्र फडणवीसांनी आजच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण कोणाला दिलेले नाहीय, असे स्पष्ट केलेले असले तरी महत्वाचे नेते, माजी मुख्यमंत्री आदींना शपथविधीला बोलविले जाते. यामुळे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे शिंदेंच्या शपथविधीला जातील का, याचे उत्तर थोड्याच वेळात मिळेल. परंतू ज्या उद्धव ठाकरेंच्या संयमी, विनयशील नेतृत्वाची कालपासून चर्चा आहे, ते पाहता उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहायला हवे, असे अनेकांना वाटत आहे. उद्धव ठाकरे असे करतील का? 

त्या १४ आमदारांबाबत शिंदे काय म्हणाले... 

शिंदेंनी काही वेळापूर्वीच्या पत्रकार परिषदेत आपली ताकद किती याची आकडेवारी सांगितली, तेव्हा त्यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. 'आणखी किती येतील माहित नाही...' याचा अर्थ आता राजकीय लोक काढू लागले आहेत. शिंदेंचे हे वाक्य ठाकरेंसोबत राहिलेल्या १४ आमदारांबाबतचे आहे. यात आदित्य ठाकरे देखील आहेत. केसरकरांनी देखील काल आमचा व्हीप डावलला तर अपात्रतेची कारवाई करायची की नाही याचा निर्णय शिंदे घेतली असा इशारा दिला आहे. यामुळे शिंदे गटासोबत आता शिवसेनेच्या उर्वरित १४ आमदारांची फरफट होते की काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्री