'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 11:07 IST2025-12-14T11:07:19+5:302025-12-14T11:07:47+5:30

Prithviraj Chavan's Prediction: येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल अन मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते. असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय.

Will the biggest political earthquake happen in the country on December 19? Will the Prime Minister of India be a Marathi man? Prithviraj Chavan's prediction! | '१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!

'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!

येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचापंतप्रधान बदलेल अन मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते. असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिलेत. अमेरिकेतील नव्या कायद्याचा ही दाखला चव्हाणांनी दिला.

अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या १९ डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे. असा दावा चव्हाणांनी केला. आता यात कोणाकोणाची नावं आहेत? याची मला फारशी कल्पना नाही. असं म्हणत चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जनगणमन या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात १९ डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचं भाकीत केलं.

Web Title : 19 दिसंबर को राजनीतिक भूकंप: मराठी पीएम संभव, चव्हाण का दावा!

Web Summary : पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ने 19 दिसंबर को एक बड़े राजनीतिक बदलाव की भविष्यवाणी की है, जिससे एक मराठी व्यक्ति भारत का प्रधानमंत्री बन सकता है। उन्होंने वैश्विक घटनाओं और एक अमेरिकी कानून का हवाला दिया जो इस बदलाव के संभावित उत्प्रेरक के रूप में प्रमुख हस्तियों का खुलासा करता है।

Web Title : Political Earthquake on Dec 19: Marathi PM Possible, Says Chavan!

Web Summary : Ex-CM Prithviraj Chavan predicts a major political upheaval on December 19th, potentially leading to a Marathi individual becoming India's Prime Minister. He cites global events and a US law revealing prominent figures as potential catalysts for this change.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.