शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेशी कराराचा परिणाम भारताच्या शेती उत्पादनावर होणार?; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:09 IST

जागतिक पातळीवर अमेरिकेने भारतातवर जे कर आकारले होते त्यात काही प्रमाणात कर कपातीचा निर्णय घेतला आहे. मला काही गोष्टींची चिंता आहे असं शरद पवारांनी सांगितले.

बारामती - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील कराराची जागतिक पातळीवर चर्चा आहे. या कराराचे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी २ दिवस लागतील. परंतु या कराराचा परिणाम भारतीय कृषी उत्पादनावर होण्याची शक्यता आहे असं सांगत शरद पवारांनी करारावर चिंता व्यक्त केली. 

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, जागतिक पातळीवर अमेरिकेने भारतातवर जे कर आकारले होते त्यात काही प्रमाणात कर कपातीचा निर्णय घेतला आहे. मला काही गोष्टींची चिंता आहे. अमेरिका आणि भारतातील या नव्या कराराचे स्पष्ट चित्र आणखी २ दिवसांत देशासमोर येईल. त्यानंतर त्यावर सविस्तर भाष्य करणे योग्य होईल. परंतु आज जे लोकांसमोर अमेरिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यात कृषी क्षेत्रात अमेरिकेला निर्यात करता येईल अशी तरतूद आहे. ही तरतूद भारतातील कृषी क्षेत्राच्या दृष्टीने चिंता करण्यासारखी आहे. अमेरिका हा शक्तीशाली देश आहे. आर्थिक ताकद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या क्षेत्रातील उत्पादनाची निर्यात इतर देशात करायची ठरवली तर त्या देशाच्या त्या क्षेत्रातील उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. ती स्थिती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितले.

सभागृहात चर्चा व्हायला हवी होती मनोज नरवणे हे देशाचे लष्करप्रमुख होते. त्यांनी काही लिखाण केले असेल आणि त्याचा उल्लेख विरोधी पक्षनेते करत असतील तर हा त्यांचा अधिकार आहे. आज कारण नसताना देशात संशयाचे वातावरण होतंय. लष्करप्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवले आहे त्याचा अर्थ काही तरी चिंतेची स्थिती आहे. त्याची चर्चा झाली असती तर लोकांना वस्तूस्थिती कळली असती. मनोज नरवणेंचे पुस्तक प्रकाशित झाले नाही परंतु जर माझ्या हातात त्या पुस्तकाची कॉपी आहे ती मी दाखवली. अध्यक्षांनी सांगितले हे अधिकृत करा, तेही केले. तर त्यावर चर्चा व्हायला हवी होती असंही शरद पवारांनी म्हटलं. 

दरम्यान, सभागृहात जेव्हा अंदाजपत्रक जाहीर होते, तेव्हा माझी गैरहजेरी आजपर्यंत कधी झाली नव्हती. पण दुर्दैवाने कौटुंबिक आघातामुळे मी दिल्लीला जाऊ शकलो नाही. त्यामुळे सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकण्याची संधी मला यावेळी मिळाली नाही. पण जे काही वाचले त्यात २-३ गोष्टी दिसतात. सामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टी अंदाजपत्रातून जाणीवपूर्वक टाळल्या आहेत. या अंदाजपत्रकामध्ये विकासाला अधिक ठोस गती येईल असं काही नाही असं शरद पवारांनी आरोप केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : US Trade Deal May Impact Indian Agriculture: Sharad Pawar Expresses Concern

Web Summary : Sharad Pawar voiced concerns that the US trade deal might negatively impact Indian agriculture. He highlighted potential risks due to America's economic strength and export capabilities, urging caution. He also commented on defense matters and budget oversights.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAmericaअमेरिकाIndiaभारतRahul Gandhiराहुल गांधी