शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

फटाके उडवण्याची व्यवस्था राज्य सरकार करेल का ?

By admin | Updated: June 4, 2015 04:21 IST

एखाद्या मोकळ्या सार्वजनिक जागी नागरिकांसाठी फटाके उडवण्याची व्यवस्था राज्य सरकारला करता येऊ शकेल का आणि त्यासंदर्भात धोरण ठरविता येईल का

अलिबाग : एखाद्या मोकळ्या सार्वजनिक जागी नागरिकांसाठी फटाके उडवण्याची व्यवस्था राज्य सरकारला करता येऊ शकेल का आणि त्यासंदर्भात धोरण ठरविता येईल का अशी विचारणा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या न्या.विकास किनगांवकर व डॉ.अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने गेल्या शुक्रवारी (२९ मे)राज्य शासनास केली आहे. नागपूर येथील पर्यावरणप्रेमी फटाके विरोधी आंदोलनाचे प्रणेते डॉ.रवींद्र भुसारी यांनी अ‍ॅड.असीम सरोदे यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या निमित्ताने ही विचारणा करण्यात आली आहे.पर्यावरण सचिव व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांनी राज्य शासनाचे मुख्य सचिव आणि विस्फोटक विभागाचे प्रमुख यांच्यासह संयुक्त सभा आयोजित करावी व फटाक्यांचा त्रास कमी करण्यासाठी एखादी सार्वजनिक जागा प्रत्येक शहरामध्ये निश्चित करता येईल का या बाबत आढावा घ्यावा. मुंबई शहरासाठी बृहन्मुंबई आयुक्तांनी अशा प्रकारच्या सभेचे समन्वयन करावे तसेच पुणे व राज्यातील अन्य शहरातसुद्धा अशा प्रकारच्या सभांचे आयोजन करुन धोरण ठरविण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिल्या आहेत.अनेक धार्मिक, सामाजिक उत्सवांच्या वेळी, मोठ्या लोकांच्या वाढदिवसांच्या दिवशी ते निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर, लग्न प्रसंगी फटाके उडवून होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शहरातील एकाच ठिकाणी फटाके उडवून नियंत्रण आणणे सरकारने धोरण ठरविल्याशिवाय शक्य नाही. परंतु मुंबईतील शिवाजीपार्क, चौपाटी वा इतर जागा जर लोकांना फटाके उडवून आनंद साजरा करण्यासाठी उपलब्ध करुन दिल्यास व त्यासाठी आधीच पर्यावरण कराच्या स्वरुपात लोकांचा सहभाग घेण्यात आला तर होणारा कचरा उचलून स्वच्छता करणे व इतर कामांसाठी निधी वापरता येईल, या संदर्भात धोरण ठरविण्याचा अधिकार शासनाच्या कामाचा भाग असल्याने कोणत्याही प्रकारचे विशिष्ट आदेश न देता शासनातर्फे येत्या १४ आॅगस्टला होणाऱ्या पुढील सुनावणीच्या दिवशी काय प्रतिसाद मिळतो त्यानुसार कायदेशीर विश्लेषण करता येईल, असे मत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नमूद केले आहे.(विशेष प्रतिनिधी)