Will Shiv Sena be absent for NDA meeting in Delhi? | दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहणार?
दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहणार?

मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून निर्मण झालेल्या वादानंतर शिवसेना आणि भाजपामधील संबंध जवळपास संपुष्टात आले आहेत. अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनाभाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडल्यात जमा आहे. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक रविवारी संध्याकाळी बोलावण्यात आली आहे. मात्र राज्यात सत्तास्थापनेवरून झालेल्या वादानंतर शिवसेना भाजपापासून दुरावली असून, त्यामुळेच एनडीच्या या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

मात्र शिवसेनेशी असलेले संबंध बिघडल्यानंतर शिवसेनेला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना आणि एनडीए यांच्यातील संबंध सध्यातरी संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. 

 दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर  भाजपाचेच सरकार राज्यात येणार असून मुख्यमंत्रीदेखील भाजपचाच असेल असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत हीच भूमिका मांडल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेत पाटील म्हणाले की, राज्यात क्रमांक एकचा पक्ष भाजपच आहे. भाजपचे १०५ आमदार निवडून आले आहेत. मित्रपक्ष तसेच अपक्ष आमदार ज्यांनी भाजपला समर्थन दिले आहेत असे १४ धरून भाजपचे संख्याबळ ११९ होते.त्यामुळे भाजपला वगळता राज्यात सरकार स्थापनच होऊ शकत नाही.भाजपच्या दादर येथील कार्यालयात तीन दिवसीय चिंतन बैठक सुरू आहे. आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांना माहिती देताना पाटील म्हणाले की, भाजप ५९ जागांवर पराभूत झाला.त्यापैकी ५५ जागांवर भाजपाच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत.आम्ही इतर पक्षातून आलेल्या २६ जणांना उमेदवारी दिली.त्यापैकी १६ जण विजयी झाले आहेत. १९९० नंतर कोणत्याच पक्षाला १०० जागांवर विजय मिळालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मिळूनही १०० आमदार यावेळी आलेले नाहीत. त्यामुळे सर्वच आघाडयांवर विचार करता भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष आहे.

Web Title: Will Shiv Sena be absent for NDA meeting in Delhi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.