शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 09:35 IST

Loksabha Election - आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील तर काही विलीनीकरण करतील असं विधान शरद पवारांनी एका मुलाखतीत केले आहे.

मुंबई - Sharad Pawar on Congress ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष एकवटतील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मोठं विधान शरद पवारांनी केलं आहे. पवारांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. नुकतेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील २ पक्ष लोप पावतील असं वक्तव्य केले होते. त्यानंतर शरद पवारांच्या या विधानामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार म्हणाले की, पुढील २ वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा त्यातील काहींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी चांगला असेल असंही वाटू शकते. तसेच काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. आमच्या दोघांचीही विचारधारा गांधी-नेहरू यावर वाटचाल करत आहे असं पवारांनी म्हटलं. इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत पवारांनी हे विधान केले. त्यामुळे भविष्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेला बळ मिळालं आहे.

तसेच माझ्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु पुढील काळातील निर्णय आणि रणनीती ही सामुहिकपणे विचार करून घेतले जातील. आम्हाला नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणे ते पचवणे कठीण आहे असंही शरद पवारांनी पुढे सांगितले. 

दरम्यान, अनेक प्रादेशिक पक्षातील नेत्यांच्या दुसऱ्या पिढीचे सत्तेकडील झुकणं पाहता पवारांनी हे विधान केले आहे. सपा, आरजेडी, एलजेपी, वायएसआरसीपी, टीडीपी, बीआरएससारखे जे पक्ष स्थापन झालेत, त्यांच्या नेत्यांच्या मुलामुलीपर्यंत कथित भ्रष्टाचार, घराणेशाहीचा आरोप होत आहेत. त्यामुळे एका व्यापक दृष्टीने ते सर्व एका छताखाली येऊन लढाया लढतील असं मत शरद पवारांनी मांडले.

उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच

उद्धव ठाकरे हेदेखील समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे ती आमच्यासारखीच आहे असंही शरद पवारांनी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस