शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

बाटल्या नाही रिचवणार...

By admin | Updated: December 31, 2014 01:11 IST

प्रत्येक अंत हा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा आरंभ असतो. अशा अंत आणि आरंभाचा संधीक्षण असतो ३१ डिसेंबरची मध्यरात्र! जुन्या वर्षाला ‘बाय’ आणि नव्या वर्षाला ‘हाय’ करण्यासाठी

‘न्यू ईअर’ : सामाजिक भावनेतून सेलिब्रेट करा नागपूर : प्रत्येक अंत हा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा आरंभ असतो. अशा अंत आणि आरंभाचा संधीक्षण असतो ३१ डिसेंबरची मध्यरात्र! जुन्या वर्षाला ‘बाय’ आणि नव्या वर्षाला ‘हाय’ करण्यासाठी युवाजगत अख्खी रात्रच जागून काढते. यंदाही ‘जागल्यां’चा जल्लोष उधाणणार आहेच. नागपुरातील ‘एन्जॉय स्पॉट’ आतापासूनच पार्ट्यांसाठी सज्ज होऊ लागले आहेत. युवक-युवतींचे प्लॅन्सही रेडी आहेत. आईबाबांची नजर चुकवून रात्री फिरताना पोलीसदादांनाही कसा चकमा द्यायचा, यासाठी नानातऱ्हेचे हतखंडे तरुणांनी तयार ठेवले आहेत. वाट आहे ती केवळ ३१ च्या रात्री पडणाऱ्या १२ च्या ठोक्याची! परंतु यंदा अनेक तरुणांनी मद्य प्राशन न करता नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा संकल्प केला आहे. ‘थर्टी फर्स्ट’चा आनंद तर साजरा करणार, पण विधायक पद्धतीने अशी अनेक तरुणांची भावना दिसून येत आहे.‘न्यू ईअर सेलिब्रेशन’ म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते ती सळसळता उत्साह असलेली तरुणाई. ‘न्यू ईअर’चे समीकरण जुळलेलेच आहे ते पार्टी, मज्जा आणि मस्ती यांच्याशी. यामुळे युवकांनी केवळ धांगडधिंगा करायचा एक दिवस अशी यावर टीकादेखील होते. मात्र नवीन वर्षात पदार्पण करताना समाजातील उपेक्षितांकडे मैत्रीचा हात समोर करण्याचा संकल्प अनेक तरुण-तरुणींनी केला आहे.शहरातील काही विद्यार्थ्यांनी मात्र हा दिवस समाजातील अशा लोकांसोबत साजरा करण्याचे ठरविले आहे. ज्यांना खरोखरच प्रेमाची नितांत आवश्यकता आहे, मायेचा ओलावा हवा आहे अशा बालक व वृद्धांसोबत ही मंडळी नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत.(प्रतिनिधी)व्हॉटस्अ‍ॅपवर शुभेच्छांचा पाऊस‘न्यू ईअर’च्या संपूर्ण दिवसाचा मोबाईल कंपन्यांकडून फायदा उचलल्या जातो. एका अर्थाने हा मोबाईलधारकांसाठी ब्लॅक डेच असतो. त्यामुळे अनेकांनी मंगळवारी दुपारपासूनच शुभेच्छांचे एसएमएस पाठवायला सुरुवात केली. बहुतांश लोकांनी तर ‘एसएमएस’च्या भानगडीत न पडता ‘व्हॉटस्अ‍ॅप’च्या माध्यमातूनच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे सुरू केले आहे.बाजारपेठांमध्ये उत्साह‘न्यू ईअर’ साजरा करण्यासाठी बाजारपेठांमध्ये उत्साह दिसून येत आहे. हिवाळी परीक्षा जवळपास आटोपल्यामुळे अभ्यासाचे फारसे टेन्शन नाही. हॉटेल्स, पब्ज येथेदेखील विशेष तयारी करण्यात आली आहे. सदर, रामदासपेठ, लॉ कॉलेज चौक, सीताबर्डी, धरमपेठ, महाल व लक्ष्मीनगर या भागांतील गिफ्ट शॉपींमध्येदेखील युवक-युवतींची गर्दी दिसून येत आहे.