शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही; अकोटमधील आघाडीवर इम्तियाज जलील स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:06 IST

'आतापर्यंत आम्ही भाजपाविरोधात राजकारण केले आहे. या भूमिकेशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही.'

अकोट: अंबरनाथ आणि अकोट येथे स्थानिक पातळीवर भाजपाने काँग्रेस आणि AIMIM सोबत आघाडी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक नेत्यांच्या या कृत्यामुळे तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जाहीर नाराजी आणि  विरोध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा स्थानिक आघाड्या तोडण्याचे आदेश दिल्यानंतर, आता AIMIM नेही भाजपाबरोबर जाणार नसल्याची ठाम भूमिका मांडली आहे.

कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर जाणार नाही

AIMIMचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना अकोटमधील राजकीय परिस्थितीवर स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, अकोट शहराच्या विकासासाठी ‘अकोट विकास आघाडी’ स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीत शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस यांचा समावेश आहे. त्यामुळे AIMIMलाही सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, भाजपाच्या कोणत्याही गटात AIMIM सामील होणार नाही. 

एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले

इम्तियाज जलील पुढे म्हणाले, आतापर्यंत आम्ही भाजपाविरोधात राजकारण केले आहे. या भूमिकेशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. ज्या पक्षाने देशात जात-धर्माच्या नावावर तेढ निर्माण केला आहे, त्या पक्षासोबत आम्ही बसणार नाही. त्यामुळेच आमच्या पाचही नगरसेवकांना संबंधित आघाडीतून बाहेर पडत असल्याचे लेखी स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात कुठेही, कोणतीही आघाडी झाली तरी AIMIM भाजपाबरोबर जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

असदुद्दीन ओवैसी यांचीही नाराजी

या प्रकरणावर AIMIMचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचीही नाराजी असल्याचे जलील यांनी सांगितले. ते म्हणाले की, विदर्भाची जबाबदारी युसुफ अन्सारी यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, इतका महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी वरिष्ठांशी चर्चा व्हायला हवी होती. याबाबत त्यांच्याकडूनही आम्ही लेखी खुलासा मागवला आहे. विकासाचा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा असला, तरी भाजपाबरोबर जाणे आम्हाला मान्य नाही.

या आघाडीवर देवेंद्र फडणवीस नाराज

दुसरीकडे या आघाडीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस आणि एमआयएमसोबत भाजपची युती कधीच होऊ शकत नाही, हा प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. ही आघाडी तोडावी लागेल. जर स्थानिक पातळीवर ही गोष्ट कोणी केली असेल तर ते चुकीचे आहे. हा शिस्तभंग आहे. याच्यावर कारवाई होणार. हे चालणार नाही. मी आदेश दिले आहेत आणि 100 टक्के यावर कारवाई होणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : No alliance with BJP under any circumstances: Jalil clarifies.

Web Summary : AIMIM's Imtiaz Jalil clarified that the party will not ally with BJP. Local alliances in Akot caused controversy. Jalil emphasized prioritizing development but refusing cooperation with BJP due to ideological differences. Fadnavis expressed strong disapproval, ordering the alliance to be dissolved and promising disciplinary action.
टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाImtiaz Jalilइम्तियाज जलीलBJPभाजपाcongressकाँग्रेसakotअकोटLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर