शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईचे ‘उल्हासनगर’ करणार का?

By admin | Updated: October 13, 2015 04:15 IST

नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे अधिकृत करण्यासाठी धोरण आखण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने कडवट टीका करत नवी मुंबईचेही दुसरे उल्हासनगर करायचे आहे

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे अधिकृत करण्यासाठी धोरण आखण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने कडवट टीका करत नवी मुंबईचेही दुसरे उल्हासनगर करायचे आहे का, असा संतप्त सवाल केला. राज्य सरकार बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन देत असल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला.दिघा गावातील ९६ बेकायदेशीर इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीला दिले आहेत. एमआयडीसीने दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी करत बांधकामांवर हातोडा चालवण्याचे काम तत्काळ हाती घेतले. त्यावर स्थानिक रहिवाशांनी ‘कॅम्पा कोला’साठी वेगळा न्याय आणि आपल्यासाठी वेगळा न्याय का? अशी विचारणा राज्य सरकारकडे केली. जनक्षोभ लक्षात घेता नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे अधिकृत करण्यासंदर्भात धोरण आखण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे हंगामी महाअधिवक्ता अनिल सिंग यांनी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यावर सरकारला नक्की काय हवे आहे, अशी विचारणा खंडपीठाने अ‍ॅड. सिंग यांच्याकडे केली.‘तुम्हाला आमच्या आदेशावर स्थगिती हवी आहे का?’ अशी विचारणा खंडपीठाने केल्यावर अ‍ॅड. सिंग यांनी या बांधकाम तोडण्याच्या मोहिमेमध्ये ज्या बांधकामांना सरकारचे धोरणांतर्गत संरक्षण मिळण्याची शक्यता आहे, त्या बांधकामांवरही हातोडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती हवी असल्याचे खंडपीठाला सांगितले.त्यावर खंडपीठाने संतप्त होत नवी मुंबईचेही दुसरे उल्हासनगर करायचे आहे का? अशी विचारणा राज्य सरकारकडे केली. बेकायदेशीर बांधकामे अधिकृत करण्याच्या भूमिकेचे परिणाम काय होतील, याची कल्पना सरकारने केली आहे का, असा थेट प्रश्न करत खंडपीठाने सरकारच्या भूमिकेवर कडवट टीका केली.‘अशा प्रकारे तुम्ही बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन देत आहात. भविष्यात लोक मैदानावर किंवा रस्त्यांवर बेकायदेशीर बांधकामे उभारतील. तुमचे हेच उद्दिष्ट आहे का?’ असे खंडपीठाने म्हटले.सरकारला बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन द्यायचे नाही, असे अ‍ॅड. सिंग यांनी सांगितले. ‘सरकारला बेकायदेशीर (पान ५ वर)