माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:24 IST2025-12-17T10:51:30+5:302025-12-17T11:24:07+5:30
फेब्रुवारीत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली. यामुळे आता कोकाटे यांना आता क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या १० टक्के कोट्यातून लाटलेल्या चार सदनिकांच्या घोटाळ्यात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी अंतिम सुनावणीत दोषी धरले. फेब्रुवारीत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली. यामुळे आता कोकाटे यांना आता क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
मंत्री माणिकराव कोकाटे आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये त्यांच्या मंत्रिपदाचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याआधीही वादग्रस्त वक्तव्यामुळे कोकाटे चर्चेत होते. काही दिवसांपूर्वी कृषी खाते त्यांच्याकडे होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जावरुन मोठं विधान केले होते. यावेळीही त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
तर मागील अधिवेशनावेळी माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी विरोधकांनी राजिनाम्याची मागणी केली होती. यावेळी त्यांच्याकडून कृषी खाते काढून त्यांना क्रीडा खाते दिले होते. दरम्यान, आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यामुळे आता त्यांचे मंत्रिपद पुन्हा एकदा धोक्यात आले आहे.
आज मुंबईमध्ये मंत्री कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये मंत्रिपदाबाबत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आता पुन्हा एकदा त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.