शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:11 IST

"पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या."

Sadabhau Khot On Sharad Pawar : महायुतीच्या राज्यातील विविध ठिकाणी प्रचारसभा होत आहेत. दरम्यान, आज सांगलीच्या जतमध्ये गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा झाली. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(शप) प्रमुख शरद पवारांवर (Sharad Pawar) शारीरिक व्यंगावरुन अतिशच बोचरी टीका केली. 

"शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसवाले असतील...देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागलेत माहितीय का? गायीची जी कास आहे, त्या कासला चार थानं असतात. यामधील अर्धथानं वासराला पाजायचं (म्हणजे आपल्याला) आणि साडेतीन थानातलं दूध आपणचं हाणायचं. पण, देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, गायीचं सगळं दूध वासरांचं(राज्यातील जनतेचं) आहे, मी सगळं दूध वासरांनाच देणार..मग पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या. ते म्हणाले माझ्या चिल्यापिल्यांचं कसं व्हायचं..?"

"पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या...पण पवारसाहेबांना मानावं लागेल. ते म्हणतायत की, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. तुम्हाला काय तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र पाहिजे का?" अशी बोचरी टीका सदाभाऊ खोतांनी यावेळी केली. सदाभाऊंनी शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावर टीका केल्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे. 

उद्धव ठाकरेंवर टीकायावेळी सदाभाऊंनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली. "उद्धव ठाकरे म्हणले एक जॅकेटवालं, एक दाढीवालं, पण उद्धव ठाकरे तुम्हीच दाढ्या कुरवाळत बसलात. अडीच वर्षात तुम्ही घराबाहेर निघाले नाही, शेतकऱ्याचा भाजीपाला सडला, दूध रस्त्यावर सांडलं, तुम्ही एकही रुपया शेतकऱ्याला मदत केली नाही, त्यामुळे तुम्हाला मतं मागण्याचा अधिकार नाही," असं सदाभाऊ खोत म्हणाले.    

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sadabhau Khotसदाभाउ खोत Sharad Pawarशरद पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकर