महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या प्रचंड धुसफुस सुरु असून काही वर्षांपूर्वी दिसून येणारी नाराजी पुन्हा उफाळून आली आहे. भाजपचे नेते शिवसेनेला संपवत असल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. 'महायुती'मध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले होते,
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर चर्चा केली. यावेळी, त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या चर्चेनंतर आता ग्रामीण आणि निम-शहरी भागांतील नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने अवलंबलेल्या 'एकला चलो रे' धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही तर रविंद्र चव्हानांनी एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच लावलेल्या सुरुंगावरूनही शिंदेंनी तक्रार केली आहे.
फडणवीसांच्या कार्यशैलीवर आक्षेपशिंदे गटाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपचे नेते, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक युनिट्स, शिंदे गटाच्या उमेदवारांना योग्य तो सन्मान आणि जागा सोडायला तयार नाहीत. अनेक ठिकाणी शिंदे गटाचे विद्यमान नगरसेवक असलेल्या जागांवरही भाजपने दावेदारी ठोकल्यामुळे युतीमध्ये संघर्ष वाढत आहे.
एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "मुंबईत समन्वय साधण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण नगरपरिषद स्तरावर 'महायुती धर्म' पाळला जात नाहीय. स्थानिक पातळीवर भाजपचे कार्यकर्ते केवळ स्वतःच्याच पक्षाचा विचार करत आहेत. ही बाब मुख्यमंत्र्यांनी अमित शहांना स्पष्टपणे सांगितली आहे."
या तक्रारीनंतर, अमित शाह यांनी युतीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्यासाठी आणि अंतर्गत समन्वय साधण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना त्वरित निर्देश देण्याचे आश्वासन शिंदेंना दिल्याचे वृत्त आहे. तरीही, स्थानिक स्तरावर हा तणाव महायुतीच्या आगामी निवडणुकीतील कामगिरीवर परिणाम करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Unease simmers within Maharashtra's ruling coalition as Shinde voices grievances to Amit Shah regarding seat sharing and BJP's unilateral approach in local elections. Fadanvis's style is questioned. Shah assures intervention to foster better coordination.
Web Summary : महाराष्ट्र के सत्तारूढ़ गठबंधन में अशांति, शिंदे ने अमित शाह से सीट बंटवारे और स्थानीय चुनावों में भाजपा के एकतरफा रुख पर शिकायत की। फडणवीस की शैली पर सवाल। शाह ने बेहतर समन्वय के लिए हस्तक्षेप का आश्वासन दिया।