शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

लोकसभेसारखे यश मिळणार का? परंपरागत मतदार राखावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:11 IST

गेल्या काही निवडणुकांमध्ये परंपरागत मतदारांनी काँग्रेसला पाठ दाखविली होती, पण लोकसभेला  त्यांनी काँग्रेसला साथ दिली. हा मतदार काँग्रेससोबतच राहील हे सिद्ध करण्यासाठीची ही लिटमस टेस्ट असेल. 

20१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अनेक दिग्गज महाराष्ट्रात हरले. फक्त एक जागा निवडून आली. पाच वर्षांनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १७ जागा लढून काँग्रेसने १३ जागा जिंकल्या आणि राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेस नेत्यांनी दाखविलेले ऐक्य, मोदी सरकारविरुद्ध महाविकास आघाडीने उठविलेले रान, कार्यकर्त्यांनी मनावर घेतलेली निवडणूक, एकमेकांच्या प्रभावक्षेत्रात ढवळाढवळ न करता आपले किल्ले शाबूत ठेवण्यावर नेत्यांनी दिलेले लक्ष यामुळे हा विजय मिळाला. ओबीसी, मराठा, दलित, मुस्लीम मतदारांनी मोठी साथ दिली हेही एक महत्त्वाचे कारण होतेच. एरवी गटबाजीचा शाप असलेली काँग्रेस गटतटमुक्त राहिली आणि त्याचा फायदा झाला. 

लोकसभेत काँग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता केंद्रामध्ये येऊ शकली नाही, पण महाराष्ट्राने या आघाडीला मोठे यश दिले. दिल्लीत इंडिया आघाडी आधीपेक्षा मजबूत होण्यात महाराष्ट्राचा आणि काँग्रेसचा मोठा वाटा राहिला. आता त्याच मार्गाने राज्यात आघाडीची सत्ता आणायची तर काँग्रेसला लोकसभेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. काँग्रेसचा विजयाचा घोडा लोकसभेला उधळला आणि  विधानसभेलाही तो उधळेल, असे चित्र असताना हरयाणात काँग्रेसचे स्वप्न भंग पावले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात काहीसे निराशेचे वातावरण असले तरी हरयाणाच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही, असे स्थानिक नेते सांगत आहेत. 

परंपरागत मतदार राखावा लागणारगेल्या काही निवडणुकांमध्ये परंपरागत मतदारांनी काँग्रेसला पाठ दाखविली होती, पण लोकसभेला  त्यांनी काँग्रेसला साथ दिली. हा मतदार काँग्रेससोबतच राहील हे सिद्ध करण्यासाठीची ही लिटमस टेस्ट असेल. महाविकास आघाडीत काँग्रेस तर महायुतीत भाजप असे दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत. मित्रपक्षांना सोबत घेऊन काँग्रेसने राज्यात सत्ता मिळविली तर देशातील अन्य राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत सरकार आणण्यासाठीचे मॉडेल म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाईल. तसे होणार की नाही, हे लवकरच ठरेल, घोडा मैदान जवळच आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस