शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

‘विकिपीडिया स्वास्थ्य’मधून मराठीत उलगडणार आरोग्याच्या माहितीचा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 3:39 AM

संकेतस्थळ सुरू; रोगाची लक्षणे, उपचारासंदर्भातील तपशिलात सुधारणा करण्याची संधी

मुंबई : विसाव्या शतकातही इंटरनेटवर मराठी भाषेची योग्य प्रमाणात उपलब्धता नाही. त्यामुळे मराठी भाषेतील ज्ञानकोशाचा मार्ग अनेक वर्षे रखडला आहे. मात्र गुरुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वांद्रे येथील अमेरिका वाणिज्य दूतावासाच्या कार्यालयात अमेरिका वाणिज्य दूतावास आणि विकिपीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वास्थ्य’ या संकेतस्थळाची सुरुवात झाली. या माध्यमातून आरोग्यविषयक पूरक माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल.मराठी भाषेनंतर हे संकेतस्थळ हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, तमिळ आदी १० भारतीय भाषांमध्येही सुरू होईल. विकिपीडियाने देशात या उपक्रमाद्वारे सर्वप्रथम मराठीला प्राधान्य दिले आहे. मागील मराठी भाषादिनी त्यांनी काही मराठी व्हिडीओ प्रसारित केले होते. यानंतर आता विकिपीडिया स्वास्थ्य हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. यात आरोग्यविषयक माहिती, आजार तसेच रुग्णालये, डॉक्टर संघटना आदी माहितीचा समावेश असेल.यासंदर्भात आयोजित कार्यक्रमात विकिपीडिया स्वास्थ्यचे संचालक अभिषेक सूर्यवंशी यांनी सांगितले, प्रत्येकाला यासाठी योगदान देता येईल. अचूक माहिती संदर्भासह पोहोचविण्यास मदत होईल. शिवाय आरोग्य हे क्षेत्र सामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे ही अमूल्य माहिती सर्वांसाठी मोफत उपलब्ध होईल.रोगाची लक्षणे, उपचार यासंदर्भातील तपशिलात सुधारणा करण्याची संधीही वापरकर्त्यांना मिळेल. हा उपक्रम लोकांना आपला वाटावा व त्यात त्यांचा जास्तीतजास्त सहभाग वाढवून विकिपीडियावरील तपशील सुधारला जावा हा यामागील हेतू आहे.कार्यक्रमात सहभागी झालेले राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, विकिपीडियाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या माध्यमातून सरकारचे आरोग्यविषयक उपक्रम, योजना, शासकीय आरोग्य सेवा यांचीही माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. तर जोन्स होपकिन्स स्कूल आॅफ मेडिसिनच्या क्लिनिकल रिसर्चच्या उपसंचालिका डॉ. नीती सूर्यवंशी यांनी वैद्यकीय संज्ञा, वैद्यकीय शाखा, शास्त्रीय संज्ञांचा या उपक्रमात समावेश व्हावा अशी आशा व्यक्त केली.टप्प्याटप्प्याने वाढविणार माहितीसुरुवातीला संकेतस्थळात भारतीय उपखंडात आढळणाऱ्या आजारांची माहिती दिली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याची व्याप्ती वाढविली जाईल. यात प्रथम गर्भवती-बाळंतीण यांची काळजी, कुष्ठरोग, क्षयरोग, साथीचे रोग, ऋतूबदलामुळे होणारे विशिष्ट आजार आदींची माहिती उपलब्ध केली जाईल.

टॅग्स :Healthआरोग्य