शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 06:36 IST

आ. मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पिंपरी-चिंचवडमधील बहुचर्चित वैशाली हगवणे आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असण्याची व कस्पटे कुटुंबीयांनी त्याबाबत आरोप केल्यानंतर पोलिसांनी या दिशेने स्वत:हून तपास करून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांच्या स्तरावरून अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. ही बाब अत्यंत खेदजनक, गंभीर व आक्षेपार्ह असल्याचे विधिमंडळाच्या महिला बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने म्हटले आहे.

 आ. मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते. मात्र, हा अहवाल विधानसभेत सादर होईपर्यंत कोणतीही माहिती समितीला दिली गेली नाही. हा समितीचा अवमान आहे. याची गृह विभागाने गंभीर दखल घ्यावी आणि अशा दिरंगाईसाठी दोषी असलेल्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करावी.

समितीची निरीक्षणे व शिफारशी कोणत्या ? पिंपरी-चिंचवडमधील वैशाली हगवणे आत्महत्या प्रकरणात एका ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक विभागाकडून सखोल तपासणी करण्यात यावी आणि त्यामध्ये सत्यता आढळल्यास आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्या पत्नीला सहआरोपी करावे अशी शिफारस विधिमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने केली आहे.

जालिंदर सुपेकर यांची एक ऑडिओ क्लिप माध्यमांमध्ये आलेली होती. या क्लिपची तपासणी करावी. सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यात रुखवताच्या निमित्ताने हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे दिसून येत असल्यामुळे त्या दृष्टीने तपास करून सुपेकर यांच्या पत्नीला या प्रकरणात सहआरोपी करावे.

मयुरी हगवणे या हगवणे कुटुंबातील दुसऱ्या सुनेनेही कौटुंबिक छळाची तक्रार आधीच केलेली होती. पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई केली असती तर वैशाली हगवणे यांची आत्महत्या टाळता आली असती. जालिंदर सुपेकर हे पोलिसांवर दबाव आणत होते ही शक्यता नाकारता येत नाही.

वैशाली हगवणे यांच्या बाळाची कस्टडी केवळ चार महिन्यांसाठी त्यांच्या आईवडिलांकडे दिलेली आहे. पुढेही ही कस्टडी त्यांच्याकडेच राहावी यासाठी सरकारने तातडीने कार्यवाही करावी.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाCrime Newsगुन्हेगारी