शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्रातच का वाढतायत कोरोना रुग्ण? निवडणुका असलेल्या राज्यात का नाही? तपास करणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 20:29 IST

कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की मी इतर राज्यांसंदर्भात बोलणार नाही. मात्र, आम्ही वेगाने टेस्टिंग केली आहे आणि यामुळेही रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

मुंबई - देशात कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक वेग महाराष्ट्रात आहे. देशभरात आढळणाऱ्या एकूण रुग्ण संख्येपैकी जवळपास अर्धे रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात समोर येत आहेत. यातच, निवडणूक असलेल्या राज्यांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ का नाही, याचा तपास करावा, असे आम्ही आपल्या टास्क फोर्सला सांगितले असल्याचे राज्यातील उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री असलम शेख यांनी म्हटले आहे. (Why corona cases are increasing only in Maharashtra and not in states where elections are being held says aslam shaikh) 

असलम शेख म्हणाले, 'महाराष्ट्रातच कोरोना रुग्णसंख्या का वाढत आहे. अनेक मंत्री मोठ्या गर्दीत निवडणूक प्रचार करत  आहेत. असे असतानाही तेथील कोरोना रुग्ण संख्येत वाढ नाही,' याचा अभ्यास करावा, असे आम्ही कोविड टास्क फोर्सला सांगितले आहे.

राज्यात लशींचा तुटवडा, हे 'महावसुली' आघाडी निर्मित संकट; भाजपचा ठकरे सरकारवर गंभीर आरोप कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की मी इतर राज्यांसंदर्भात बोलणार नाही. मात्र, आम्ही वेगाने टेस्टिंग केली आहे आणि यामुळेही रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यांनी इतर राज्यांचा उल्लेख केला नसला तरी, अप्रत्यक्षपणे त्यांनी इतर राज्यांत कोरोना टेस्ट कमी होत आहेत असेच म्हटले होते. देशात रविवारी दीड हजारहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. ही संख्या देशातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. या मुळे चिंता अधिक वाढली आहे. तसेच अनेक राज्यांत नाइट कर्फ्यू आणि लॉकडाउनवर सारखी बंधने घातली जात आहेत.

महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार की नाही? राजेश टोपेंनी सांगितला ठाकरे सरकारचा 'इरादा'

राज्यात 120 सेंटर्सपैकी 70 सेंटर्स बंद, कारण लशी संपल्या आहेत - टोपे महाराष्‍ट्रातील लशींच्या कमतरतेवर बोलताना टोपे म्हणाले, राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग देशात सर्वात जास्त आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला 1 कोटी 60 लाख लशींची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप केवळ 1 कोटी 04 लाख लशीच दिल्या गेल्या आहेत. राज्यात 120 सेंटर्स आहेत, यांपैकी 70 बंद आहेत. कारण लशी संपल्या आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. अनेक सुविधा असूनही लोकांना लस देणे अशक्य होत आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

केंद्र सरकारकडून सर्वाधिक लशी महाराष्ट्रालाच देण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही महाराष्ट्रातूनच लशींच्या कमतरतेची तक्रार आली आहे. यावर टोपे म्हणाले, महाराष्ट्राची तुलना गुजरात अथवा राजस्थानसोबत केली जाऊ शकत नाही. लोकसंख्या अथवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राची तुलना छोट्या राज्यांशी होऊ शकत नाही. कारण सर्वाधिक केसलोड याच राज्यावर आहे. मात्र, जेव्हा देशातील एकूण कोरोनाबाधितांपैक्षा 60 टक्के कोरोनाबाधित एकट्या महाराष्ट्राचे असतील, तर लशीही त्याच प्रमाणात भेटायला हव्यात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस