शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अश्लील टिपण्णीतून चारित्र्यहनन कशासाठी?    

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 07:00 IST

उर्मिला मातोंडकर आणि नवनीत राणा यांच्या फोटोंवर अश्लील कमेंट करून एकप्रकारे राजकीय चारित्र्यहनन करण्याचा निंदाजनक प्रकार सध्या सुरु आहे.. नेमकं कुठून येते ही मानसिकता.. वाचा सविस्तर...

ठळक मुद्देराजकारण असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र, स्वत:चे कर्तृत्व सिध्द करणाऱ्या स्त्रीवर अश्लील टिपण्णी कायद्याचा आधार घेत महिलांनी याविरोधात आवाज उठवणे गरजेचे

पुणे : एकीकडे उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याने वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे नवनीत राणा यांचे काही फोटो व्हायरल करुन अश्लील भाषेत टिपण्णी करण्यात आली आहे. राजकारण असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र, स्वत:चे कर्तृत्व सिध्द करणाऱ्या स्त्रीवर अश्लील टिपण्णी केली, चारित्र्यहनन केले की तिला मागे ओढता येईल, अशी मानसिकता आजही समाजात पाहायला मिळते. अशा घटनांमध्ये राजकीय, स्त्री-पुरुष असे भेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित लढा देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.पूर्वीपासून महिलांना समाजाकडून टीका-टिपण्णीला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ आले असताना आक्षेपार्ह वर्तन, ‘कमेंट्स’ असे प्रकारही अगदी हातातल्या मोबाईलवर येऊन ठेपले आहेत. आक्षेपार्ह घटनांकडे दुर्लक्ष न करता, कायद्याचा आधार घेत महिलांनी याविरोधात आवाज उठवणे गरजेचे असल्याचे मत विविध स्तरांतील महिलांकडून नोंदवले जात आहे.‘लोकमत’शी बोलताना अ‍ॅड. रमा सरोदे म्हणाल्या, ‘आक्षेपार्ह पोस्ट, अश्लाघ्य वर्तन याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली जाऊ शकते. निर्भया केसनंतर बलात्कार, विनयभंगाच्या कायद्यात बदल झाले आहेत. त्यानुसार, कलम ३५४ अ अंतर्गत आरोपीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. इंटरनेटवरुन केला जाणारा पाठलाग, टिपण्णी, ट्रोलिंग याविरोधात कलम ३५४ ड अंतर्गत तक्रार नोंदवता येते. त्याचप्रमाणे, आयटी अ‍ॅक्ट, सायबर लॉअंतर्गतही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.’महिला संपर्क समितीच्या सदस्या आणि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील प्रा. उज्वला मसदेकर म्हणाल्या, ‘महिलेवर अशा पध्दतीने अत्याचार होत असल्यास राजकीय पक्षाने याबाबत ठाम भूमिका घ्यायला हवी. काही वर्षांपूर्वी सेक्स वर्करवर बलात्कार झाल्यानंतर तिच्या कामावरुन शेरे ओढण्यात आले होते. महिला कोणत्याही व्यवसायात असली तरी तिच्यावर वैयक्तिक हल्ला करणे चुकीचेच आहे. आपण पुन्हा उलट्या दिशेने प्रवास करत आहोत की काय, असे वाटू लागले आहे. वैचारिक विरोध न करता वैयक्तिक शेरेबाजीमध्ये काही जण धन्यता मानतात. अशा कृत्याचा सर्वच स्तरातील महिला आणि पुरुषांनी निषेध केला पाहिजे.’......महिला पत्रकारांवर अश्लील टिपण्णी करण्यापासून अशा प्रकारांना सुरुवात झाली. केवळ राजकीय पक्षच नव्हे, तर कोणतीही महिला जेव्हा स्वत:चे मत मांडते, स्वतंत्रपणे उभी राहते, तिला बोलूच दिले जात नाही. महिला या सॉफ्ट टार्गेट असतात. सुप्रिया सुळेंनाही वाईट पध्दतीने ट्रोल केले जायचे. त्यावेळी आयटी अ‍ॅक्टअंतर्गत तक्रारी दाखल केल्या होत्या. बºयाचदा, तक्रार दाखल झाल्यावर पोलीस कारवाई करत नाहीत. गृहमंत्रालयाकडून कठोर पावले उचलली जात नाहीत, ही शोकांतिका आहे. यासाठी महिलांनीच याविरोधात बोलले पाहिजे.- अ‍ॅड. वंदना चव्हाण, खासदार........राजकीय पक्ष ही नोंदणीकृत संस्था असते. बरेचदा पक्षातले लोकच महिलेची बदनामी करण्याच्या प्रयत्न करतात. अशा वेळी, राजकीय पक्ष हे महिलेचे कामाचे ठिकाण असल्याने कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक अत्याचाराचा कायदाही लागू व्हावा. अशा घटना गांभीर्याने घेण्याची गरज आहे. - अ‍ॅड. रमा सरोदे

 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणWomenमहिलाSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी