आवाज कुणाचा! वर्षातील सर्वात स्फोटक, संजय राऊत घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 14:59 IST2023-07-23T14:58:31+5:302023-07-23T14:59:42+5:30

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार जाऊन वर्ष झाले आहे. या काळात सर्वोच्च न्यायालयाचा निकालही आला आहे.

Whose voice! The most explosive of the year, Shiv sena Sanjay Raut will interview Uddhav Thackeray | आवाज कुणाचा! वर्षातील सर्वात स्फोटक, संजय राऊत घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत

आवाज कुणाचा! वर्षातील सर्वात स्फोटक, संजय राऊत घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत

राज्यात राजकीय भुकंपांवर भुकंप होत असताना आणि आणखी एक भुकंप होणार असल्याचे भाकित अनेकजण करत असताना या वर्षातील सर्वात स्फोटक मुलाखत लवकरच होणार आहे. असा दावा शिवसेनेने केला आहे. तसा प्रोमो जाहीर करण्यात आला आहे. 

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार जाऊन वर्ष झाले आहे. या काळात सर्वोच्च न्यायालयाचा निकालही आला आहे. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंकडे गेला आहे, पक्ष चिन्हही शिंदेंकडे आले आहे. परंतू, कार्यकर्ते ठाकरेंसोबत असल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीच शिंदेच्या सरकारमध्ये नेऊन बसविली आहे. यावरून शिंदेचे मुख्यमंत्री पद जाणार असल्याचा दावा देखील ठाकरे सेना करत आहे. 

आता अनेक आमदार आपला मतदारसंघ कोणाला सुटणार यावरून तळ्यात मळ्यात आहेत. विधानसभा आणि लोकसभेला काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. यामुळे हे चित्र देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. शेवटी विचारधारा आणि राजकीय तडजोड या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आज जे विचारधारेला धरून असल्याचे सांगत आहेत तेच उद्या तडजोड करताना दिसणार आहेत. या साऱ्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत शिवसेनेचे खासदार संजय राऊत घेणार आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही दुसरी मुलाखत आहे. 
 

Web Title: Whose voice! The most explosive of the year, Shiv sena Sanjay Raut will interview Uddhav Thackeray